खुशाल मनोवृत्ती कितपत चांगली?
खुशाल मनोवृत्ती कितपत चांगली?
खुशाल मनोवृत्तीचा, कसलीही चिंता नसलेला, खुल्या मनाचा, असे एखाद्याबद्दल म्हटलेले पुष्कळ लोकांना प्रशंसनीय वाटेल. पण, या खुशाल मनोवृत्तीची दुसरी बाजू देखील आहे. बायबल म्हणते: “मूर्खांची खुशाल मनोवृत्ती त्यांचा नाश करिते.” (नीतिसूत्रे १:३२, NW) याचा काय अर्थ होतो?
इतर बायबल आवृत्त्या, मूळ इब्री शब्दाचे भाषांतर, “निष्काळजीपणा” (अमेरिकन स्टॅन्डर्ड व्हर्शन), “आत्म-संतुष्टी” (द न्यू अमेरिकन बायबल), आणि “बेपर्वाई” (द न्यू इंग्लिश बायबल) असे करतात. या अर्थाच्या अनुषंगाने, खुशाल मनोवृत्तीचा संबंध आळशीपणा व निष्काळजीपणा याजशी आणि त्याअर्थी मूर्खता किंवा अविचारीपणाशी जोडण्यात आला असल्यामुळे ती मूर्खता आहे.
पहिल्या शतकात, लावदिकीया येथील मंडळीतील ख्रिश्चनांना आपल्या आध्यात्मिक उणिवांबद्दल कसलीही चिंता नव्हती, ते निष्काळजी होते. आपल्याला “काही उणे नाही,” अशी ते बेपर्वाईने फुशारकी मारत होते. येशू ख्रिस्ताने त्यांची कान उघाडणी केली; त्यांनी त्यांचा ख्रिस्ती आवेश पुनरुज्जीवित केला पाहिजे असे त्याने म्हटले.—प्रकटीकरण ३:१४-१९.
नोहाच्या दिवसांतील लोकांची देखील अशीच खुशाल मनोवृत्ती होती. ते आपल्या प्रपंचात, ‘खाण्यापिण्यात, लग्न करून देण्यात व लग्न करून घेण्यात’ इतके गढून गेले होते, की “जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही.” मग येशू पुढे म्हणाला: “तसेच मनुष्याच्या पुत्राचेहि येणे [“उपस्थिती,” NW] होईल.”—मत्तय २४:३७-३९.
पूर्ण झालेल्या बायबल भविष्यवाणींवरून हे सूचित होते, की आपण ‘मनुष्याच्या पुत्राच्या उपस्थितीदरम्यान’ जगत आहोत. तेव्हा आपण निष्काळजी, आत्म-संतुष्ट, बेपर्वा—खुशाल मनोवृत्तीचे केव्हाही होता कामा नये.—लूक २१:२९-३६.