देवाच्या अचूक ज्ञानातून मिळणारे सांत्वन
देवाच्या अचूक ज्ञानातून मिळणारे सांत्वन
देवाची प्रीती आणि दया यांविषयी बायबलमध्ये जे सांगितले आहे त्यामुळे काही लोकांच्या मनात गोंधळविणारे प्रश्न निर्माण झाले आहेत. ते विचारतात: देवाला दुष्टाईचा नायनाट करायचा आहे, ते कसे करावे हे त्याला ठाऊक आहे आणि ते करण्याचे सामर्थ्यही त्याच्याकडे आहे तर मग दुष्टाई का फोफावत आहे? तीन गोष्टींचा मेळ त्यांना बसवता येत नाही: (१) देव सर्वशक्तिमान आहे; (२) देव प्रेमळ आणि चांगला आहे; आणि (३) दुःखद घटना घडत राहतात. ते म्हणतात की, सर्वात शेवटली गोष्ट कोणीही अमान्य करू शकत नाही त्यामुळे बाकीच्या दोन गोष्टींपैकी कोणतीही एक गोष्ट खरी असू शकत नाही. त्यांच्या मते, एकतर देवाकडे दुष्टाई थांबवण्याचे सामर्थ्य नाही किंवा त्याला कसलीही काळजी नाही.
न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर नष्ट झाल्याच्या कित्येक दिवसांनंतर अमेरिकेतील एका सुप्रसिद्ध धार्मिक पुढाऱ्याने म्हटले: ‘देव संकटाला आणि दुःखाला अनुमती का देतो हा प्रश्न माझ्या आयुष्यात मला शेकडो वेळा विचारण्यात आला आहे. मला हे मान्य करावे लागेल की, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मला स्वतःलाही खरोखर ठाऊक नाही.’
हे ऐकून थिओलॉजीच्या एका प्राध्यापकांनी लिहिले की, त्या धार्मिक पुढाऱ्याच्या “उत्तम थिओलॉजीने” ते फार प्रभावित झाले. एका विद्वानाच्या दृष्टिकोनालाही त्याने दुजोरा दिला, ज्याने असे लिहिले: “दुःख समजून घेण्याची अक्षमता हा देवाला समजून घेण्याच्या अक्षमतेचा भाग आहे.” परंतु, देवाने दुष्टाईला अनुमती का दिली हे समजून घेणे खरोखर अशक्य आहे का?
दुष्टाईचे मूळ
धार्मिक पुढाऱ्यांच्या म्हणण्याच्या विरोधात, देवाने दुष्टाईला अनुमती का दिली आहे ही गोष्ट समजून घेता येत नाही असे बायबलमध्ये दाखवलेले नाही. दुष्टाईचा हा विषय समजून घ्यायचा असेल तर यहोवाने दुष्ट जगाची निर्मिती केली नाही ही गोष्ट समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्याने पहिल्या मानवी दंपत्तीला परिपूर्ण, पापरहित असे निर्माण केले होते. यहोवाने आपल्या निर्मिती कार्याकडे पाहिले व त्याला ते “फार चांगले” वाटले. (उत्पत्ति १:२६, ३१) आदाम आणि हव्वेने एदेन परादीसचा विस्तार संपूर्ण पृथ्वीवर करावा आणि आनंदी लोकांनी त्याच्या प्रेमळ सार्वभौमत्वाच्या संरक्षणाखाली ते व्यापून टाकावे हा त्याचा उद्देश होता.—यशया ४५:१८.
पण दुष्टाईची सुरवात एका आत्मिक प्राण्याकरवी झाली; तो प्रथम देवाला विश्वासू होता परंतु सर्वांनी आपली उपासना करावी अशी इच्छा त्याच्यात निर्माण झाली. (याकोब १:१४, १५) त्याने पहिल्या मानवी दांपत्याला देवाचा विरोध करण्यामध्ये त्याची साथ देण्यास भडकवले तेव्हा पृथ्वीवरही त्याची बंडाळी प्रदर्शित झाली. बऱ्यावाईटाचे ज्ञान देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नये किंवा त्याला स्पर्श करू नये ही देवाची स्पष्ट आज्ञा मानण्याऐवजी आदाम हव्वेने ते फळ काढून खाल्ले. (उत्पत्ति ३:१-६) असे करण्याद्वारे, त्यांनी केवळ देवाची अवज्ञा केली नाही तर त्याच्यापासून त्यांना स्वातंत्र्य हवे होते हे देखील दाखवून दिले.
एक नैतिक वादविषय उपस्थित झाला
एदेनमधील बंडखोरीमुळे एक नैतिक वादविषय उपस्थित झाला; ते विश्वव्यापी महत्त्वाचे एक आव्हान होते. यहोवा आपल्या निर्मित प्राण्यांवर गाजवत असलेला अधिकार योग्य आहे का नाही यासंबंधी मानवी बंडखोरांनी प्रश्न उपस्थित केला. निर्माणकर्त्याला मानवजातीकडून संपूर्ण आज्ञाधारकतेची अपेक्षा करण्याचा अधिकार होता का? लोकांना स्वातंत्र्य मिळाल्यावर ते अधिक चांगल्या स्थितीत असतील का?
आपल्या अधिकाराला केलेल्या या आव्हानाला यहोवाने अशा पद्धतीने हाताळले ज्यातून प्रीती, न्याय, बुद्धी आणि शक्ती या त्याच्या गुणांचा अचूक समतोल दिसून आला. त्याला आपल्या शक्तीचा उपयोग करून ती बंडाळी तेव्हाच मिटवता आली असती. ते न्याय्य देखील ठरले असते कारण त्याला तसे करण्याचा अधिकार होता. परंतु असे केल्याने उपस्थित झालेल्या नैतिक प्रश्नांची उत्तरे मिळाली नसती. दुसऱ्या बाजूला, आदाम व हव्वेने केलेल्या पापाकडे देव पूर्णपणे दुर्लक्ष करू शकला असता. आज काहींच्या मते, हे प्रेमळपणाचे कृत्य ठरले असते. परंतु, असे केल्याने मानवांना शासन करण्याचा अधिकार दिल्यास बरे झाले असते या सैतानाच्या दाव्याची शहानिशा झाली नसती. त्याचप्रमाणे, यामुळे इतरांनाही यहोवाच्या मार्गापासून भटकण्याचे उत्तेजन मिळाले नसते का? याचा परिणाम, अंतहीन दुःखात झाला असता.
आपल्या बुद्धीनुरूप यहोवाने मानवांना काही काळासाठी स्वातंत्र्य दिले आहे. याकरता दुष्टाईला तात्पुरती अनुमती द्यावी लागली असली तरी, मानवांना देवापासून स्वतंत्र होऊन, बऱ्यावाईटाच्या स्वतःच्या दर्जांनुसार जगून यशस्वीपणे राज्य करता येते का हे दाखवण्याची संधी मिळाली आहे. याचा परिणाम काय दिसून येतो? मानवी इतिहासाची पाने युद्ध, अन्याय, जुलूम आणि दुःख यांनी रंगलेली आहेत. यहोवाविरुद्ध केलेल्या बंडाळीच्या अपयशाने एदेनमध्ये उपस्थित झालेले वादविषय कायमचे मिटवण्यात येतील.
दरम्यान, यहोवाने आपली प्रीती दाखवून आपला पुत्र, येशू ख्रिस्त याला दिले ज्याने खंडणी बलिदानाच्या रूपात आपले मानवी जीवन देऊ केले. यामुळे आदामाच्या अवज्ञेचा परिणाम असलेल्या पाप व मृत्यूच्या दंडापासून मुक्त योहान ३:१६.
होण्यास आज्ञाधारक मानवांना शक्य झाले आहे. खंडणीमुळे येशूवर विश्वास करणाऱ्या सर्वांकरता सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा झाला आहे.—आपल्याला यहोवाकडून ही सांत्वनदायक शाश्वती आहे की, मानवी दुःख तात्पुरते आहे. “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल,” असे स्तोत्रकर्त्याने लिहिले. “तू त्याचे ठिकाण शोधिशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही; पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उंदड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:१०, ११.
सुरक्षित, आनंदी भवितव्य
बायबलच्या भविष्यवाण्यांची पूर्णता दाखवून देते की, आजारपण, दुःख आणि मृत्यू यांचा नायनाट करण्याची देवाची वेळ अगदी जवळ आली आहे. प्रेषित योहानाला एका दृष्टान्तात, भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची अद्भुत पूर्वझलक देण्यात आली होती याकडे लक्ष द्या. त्याने लिहिले: “मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रहि राहिला नाही. . . . देव स्वतः [मानवांबरोबर] राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” या अभिवचनांची विश्वसनीयता पटवून देण्यासाठी योहानाला सांगण्यात आले, “लिही; कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.”—प्रकटीकरण २१:१-५.
एदेनमध्ये बंडाळी झाली तेव्हापासून मृत्यूमुखी पडलेल्या अब्जावधी निष्पाप लोकांबद्दल काय? यहोवाने अभिवचन दिले आहे की, सध्या मृत असलेल्या लोकांना तो पुन्हा जिवंत करील. प्रेषित पौलाने म्हटले: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी . . . आशा मी देवाकडे पाहून धरितो.” (प्रेषितांची कृत्ये २४:१५) या लोकांना “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते” अशा जगात राहण्याची प्रत्याशा असेल.—२ पेत्र ३:१३.
ज्याप्रमाणे एखादा प्रेमळ पिता चिरस्थायी फायद्यासाठी आपल्या मुलावर त्रासदायक शस्त्रक्रिया करू देण्याची अनुमती देतो त्याचप्रमाणे यहोवाने मानवांना पृथ्वीवरील दुष्टाईचे तात्पुरते अस्तित्व अनुभवण्यास अनुमती दिली आहे. परंतु, देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी अनंतकाळचे फायदे राखून ठेवले आहेत. पौलाने म्हटले: “सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. सृष्टीहि स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते.”—रोमकर ८:२०, २१.
याला खरी बातमी म्हणता येईल; ती टीव्हीवर किंवा वृत्तपत्रातील बातमीसारखी नाही तर आनंदाची बातमी आहे. “सर्व सांत्वनदाता देव” ज्याला आपली खरोखर काळजी आहे त्याच्याकडून मिळणारी ही सर्वात उत्तम बातमी आहे.—२ करिंथकर १:३.
[६ पानांवरील चित्रे]
काळाने हे सिद्ध केले आहे की, मानवजात देवापासून स्वतंत्र होऊन यशस्वीपणे शासन करू शकत नाही
[चित्राचे श्रेय]
सोमालियन कुटुंब: UN PHOTO १५९८४९/M. GRANT; अणू बॉम्ब: USAF photo; बंधनागृह: U.S. National Archives photo