व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संकटकाळी सांत्वन

संकटकाळी सांत्वन

संकटकाळी सांत्वन

आजकालच्या बातम्यांनी सांत्वन मिळत नाही. एका व्यक्‍तीने लिहिले: “आजकाल इतक्या भयंकर घटना घडत आहेत की सहा वाजताच्या बातम्या पाहायला भीती वाटते.” जिकडे तिकडे युद्धे, दहशतवादी घटना, दुःख, गुन्हेगारी आणि रोगराई याविषयीच ऐकायला मिळते; आज न उद्या या घटना आपल्यावरही येण्याची शक्यता आहे.

बायबलमध्ये या परिस्थितीचे भाकीत अगदी अचूकपणे करण्यात आले होते. आपल्या काळाचे वर्णन करताना येशूने म्हटले की, मोठमोठी युद्धे, मऱ्‍या, दुष्काळ आणि भूमिकंप होतील. (लूक २१:१०, ११) त्याचप्रमाणे, प्रेषित पौलाने ‘कठीण दिवसांविषयी’ लिहिले की तेव्हा लोक क्रूर, धनलोभी आणि चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी असतील. त्या काळाला त्याने ‘शेवटला काळ’ म्हटले.—२ तीमथ्य ३:१-५.

अशाप्रकारे, जगाच्या परिस्थितीचे वर्णन करताना आजच्या बातम्या आणि बायबलमध्ये भाकीत केलेल्या घटना यांच्यात साम्य आहे. पण बाकी कशातही साम्यता नाही. कारण बायबलमध्ये दिलेला दृष्टिकोन बातम्यांमध्ये आढळत नाही. देवाच्या प्रेरित वचनाद्वारे आपल्याला इतकी दुष्टाई का आहे एवढेच नव्हे तर भविष्य काय असेल याचीही समज प्राप्त होऊ शकते.

दुष्टाईबद्दल देवाचा दृष्टिकोन

आपल्या दिवसातील त्रस्त परिस्थितीबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे याचे स्पष्टीकरण बायबलमध्ये दिले आहे. सद्य काळातील दुःख त्याने अगोदरच ताडले असले तरी या दुःखद परिस्थितीला त्याने मान्यता दिलेली नाही आणि तो ती सर्वकाळ सहनही करणार नाही. प्रेषित योहानाने लिहिले, “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) यहोवाला लोकांची अत्यंत काळजी आहे आणि त्याला दुष्टाईचा वीट आहे. त्यामुळे सांत्वन प्राप्त करण्यासाठी देवाकडे वळणे हे योग्यच आहे कारण तो चांगला आणि करुणामय आहे आणि पृथ्वीवरील दुष्टाई मिटवण्याची त्याची इच्छा आहे आणि ते करण्याचे त्याच्याजवळ सामर्थ्यही आहे. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्‍यांना [देवाचा नियुक्‍त स्वर्गीय राजा] सोडवील. दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर तो दया करील, दरिद्रयांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्‍त अमोल ठरेल.”—स्तोत्र ७२:१२-१४.

जे दुःखात आहेत त्यांचा तुम्हाला कळवळा येतो का? कदाचित येत असेल. सहानुभूतीची भावना यहोवाने आपल्यात घातली कारण आपल्याला त्याच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले आहे. (उत्पत्ति १:२६, २७) त्यामुळे, आपण ही शाश्‍वती बाळगू शकतो की, यहोवा मानवी दुःखाप्रती संवेदनारहित नाही. इतर कोणाहीपेक्षा येशू यहोवाला सर्वात जास्त जवळून जाणत होता; त्याने शिकवले की, यहोवाला आपल्यामध्ये खूप आस्था आहे आणि तो करुणामय आहे.—मत्तय १०:२९, ३१.

देवाला मानवांची काळजी आहे याचा पुरावा निर्मितीत मिळतो. येशूने म्हटले की, देव “वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” (मत्तय ५:४५) लुस्त्रातील शहरवासियांना प्रेषित पौल म्हणाला: “[देवाने] स्वतःस साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतु तुम्हाला दिले, आणि अन्‍नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले.”—प्रेषितांची कृत्ये १४:१७.

कोण जबाबदार?

लक्ष द्या की, पौल लुस्त्रातील लोकांना म्हणाला: “[देवाने] गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपआपल्या मार्गांनी चालू दिले.” त्यामुळे, लोकांवर ओढवणाऱ्‍या दशेसाठी राष्ट्रे—अर्थात स्वतः लोकच—जबाबदार आहेत. त्याला देव जबाबदार नाही.—प्रेषितांची कृत्ये १४:१६.

यहोवा वाईटाला अनुमती का देतो? तो याविषयी काही करेल का? या प्रश्‍नांची उत्तरे केवळ देवाच्या वचनात मिळू शकतात. कारण या उत्तराचा संबंध आणखी एका आत्मिक व्यक्‍तीशी आणि त्याने अदृश्‍य आत्मिक जगात उठवलेल्या एका वादविषयाशी आहे.

[४ पानांवरील चित्रे]

मानवांना सहानुभूती वाटते. तर मग मानवांच्या दुःखाबद्दल देव संवेदनारहित असू शकतो का?

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

मुखपृष्ठ: Tank: UN PHOTO १५८१८१/J. Isaac; earthquake: San Hong R-C Picture Company

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

वर डावीकडे: क्रोएशिया: UN PHOTO १५९२०८/S. व्हाईटहाऊस; उपाशी मूल: UN PHOTO १४६१५० BY O. MONSEN