व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘आपल्या उरलेल्या आयुष्यात सुज्ञ हो’

‘आपल्या उरलेल्या आयुष्यात सुज्ञ हो’

‘आपल्या उरलेल्या आयुष्यात सुज्ञ हो’

“बहुसंख्य मानवजात आपली सुरवातीची वर्षे अशा पद्धतीने घालवतात ज्यामुळे त्यांचे उर्वरित आयुष्य दुःखदायक होते.” असे झॉन डी ला ब्रुयेरे या १७ व्या शतकातील एका फ्रेंच निबंधकाराने लिहिले. खरेच, योग्य निर्णय घेऊ न शकणारा युवक, त्याच्या समोर असलेल्या निवडींच्या बाबतीत स्थिर राहत नाही आणि यामुळे त्याच्या पदरी दुःख व निराशाच पडते. आणि हट्टी युवकाने निवडलेल्या अनुचित मार्गामुळे त्याच्या उर्वरित आयुष्यातील आनंद तो गमावून बसेल. दोन्ही बाबतीत, म्हणजे जे बरोबर व योग्य आहे ते न केल्यावर किंवा गुन्हा किंवा अपराध केल्यावर दुःखच वाट्याला येते.

परंतु असे दुःखद परिणाम कशाप्रकारे टाळता येऊ शकतात? तारुण्यातील चंचलपणाविषयी ताकीद देताना देवाचे वचन तरुणांना पुढीलप्रमाणे सल्ला देते: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या [महान] निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यांत मला काही सुख नाही असे तू म्हणशील.” (उपदेशक १२:१) तुम्ही तरुण आहात तर तुमच्या या तारुण्यातच ‘तुमच्या महान निर्माणकर्त्याविषयी’ शिकण्यासाठी पावले उचला.

पण तरुण लोक त्यांच्या तरुणपणी करत असलेल्या चुका टाळण्यास बायबल त्यांना कशाप्रकारे साहाय्य करते? ते म्हणते: “सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यांत तू सुज्ञपणे वागशील.” (नीतिसूत्रे १९:२०) बायबल हेही स्पष्टपणे दाखवते, की एखाद्या व्यक्‍तीने तरुणपणी किंवा कोणत्याही वयात, ईश्‍वरी बुद्धीची उपेक्षा केली किंवा बंडखोरपणे तिला नाकारले तर तिला कालांतराने कडू फळे चाखावी लागतात. (नीतिसूत्रे १३:१८) पण, जी व्यक्‍ती ईश्‍वरी मार्गदर्शनांकडे लक्ष देते, तिला “दीर्घ आयुष्य, वयोवृद्धि व कल्याण” प्राप्त होतील; तिचे जीवन सुखी व समाधानी होईल.—नीतिसूत्रे ३:२.