व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दुष्ट शक्‍तींचे कार्य सुरू आहे का?

दुष्ट शक्‍तींचे कार्य सुरू आहे का?

दुष्ट शक्‍तींचे कार्य सुरू आहे का?

“जगात खळबळ माजली आहे; दुष्ट शक्‍ती जणू सर्व तातडीची प्रवेश द्वारे बंद करायचा प्रयत्न करत आहेत.”—झॉ-क्लोड सुलेरी, वार्ताहार.

‘वैयक्‍तिक पातळीवर लोकांना वाटत असलेला असहायपणा, दुष्ट शक्‍तींचे कार्य सुरू असल्याचा आभास निर्माण करतो.”—जोसफ बार्टन, इतिहासकार.

सप्टेंबर ११, २००१ रोजी झालेल्या भीषण अतिरेकी हल्ल्यांनी लोकांना गांभीर्याने विचार करायला भाग पाडले. इंग्लंडच्या फायनॅन्शियल टाईम्स यात लेखन करणारे मायकल प्राउस म्हणाले: “एखाद्या श्‍वापदानेही इतके अघोरी कृत्य केले नसते किंवा करणार नाही.” न्यू यॉर्क टाईम्स यातील एका अग्रलेखात म्हटले होते की, त्या हल्ल्यासाठी करण्यात आलेल्या योजनेव्यतिरिक्‍त, “तो पूर्णत्वास आणायला त्यांच्या मनात किती भयंकर द्वेष असेल याचा विचार करणे देखील महत्त्वाचे आहे. युद्धांतील द्वेषापेक्षाही तो तीव्र स्वरूपाचा होता; मर्यादा नसलेला, कशालाही न जुमानणारा द्वेष.”

भिन्‍न धर्माच्या लोकांनी ही शक्यता व्यक्‍त केली की, कदाचित एखादी दुष्ट शक्‍ती यामागे असावी. बॉस्नियातील जातीय द्वेषामुळे घडलेल्या भीषण गोष्टी पाहिलेल्या सारायेवोतील एका व्यापाऱ्‍याने म्हटले: “बॉस्नियात एक वर्ष युद्ध पाहिल्यावर माझा विश्‍वास पक्का झाला आहे की, सैतानाचे पूर्ण नियंत्रण आहे. लोक पिसाळल्यासारखे वागत आहेत.”

दियाबलावर तुमचा विश्‍वास आहे का, हा प्रश्‍न इतिहासकार झॉ दल्युमो यांना विचारल्यावर ते म्हणाले: “जे घडत आहे आणि जन्मल्यापासून जे घडत आले आहे—दुसरे महायुद्ध आणि त्यात बळी पडलेले चार कोटींहून अधिक लोक; ऑश्‍विट्‌झ आणि मृत्यू छावण्या; कम्बोडियातील सामूहिक हत्या; सिउसेस्कु शासनाची क्रूरता; जगातील अनेक भागांमध्ये सरकारांची छळण्याची स्थापित पद्धत—हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिल्यावर मी दुष्ट शक्‍तींना अमान्य करूच शकत नाही. भीषण कृत्यांची यादी न संपणारी आहे. . . . त्यामुळे माझा असा विश्‍वास आहे की, ही कृत्ये ‘सैतानी’ आहेत असे म्हणण्यात काही गैर नाही; यामागे शिंगे असलेला सैतान नाही तर जगातील प्रभावाचे व दुष्ट शक्‍तीचे प्रतीक असलेला सैतान आहे.”

झॉ दल्युमोप्रमाणे अनेक लोक, आज मानवी समाजात अगदी कुटुंबापासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत घडणाऱ्‍या भयंकर गोष्टींना “सैतानी” लेखतात. पण याचा काय अर्थ होतो? या भयंकर घटनांमागे व्यक्‍तिभावरहित दुष्ट शक्‍ती आहेत की सर्वसाधारण मानवी दुष्टपणापलीकडचे अघोरी गुन्हे करण्यास मानवांवर दबाव आणणाऱ्‍या वैयक्‍तिक दुष्ट शक्‍ती आहेत? या शक्‍तींमागचा मुख्य सूत्रधार दुष्टांचा राजकुमार, दियाबल सैतान आहे का?

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

मुले: U.S. Coast Guard photo