व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

लहान रक्कमेची पैज लावण्यात काही गैर आहे का?

देवाच्या वचनात जुगाराविषयीची सविस्तर माहिती दिलेली नसली तरी, कोणत्याही प्रकारचा जुगार बायबलच्या तत्त्वांच्या विरोधात आहे, हे दाखवण्यासाठी ते पुरेशी माहिती देते. * जसे की, जुगारीमुळे लोभ उत्पन्‍न होतो हे सर्रास कबूल केले जाते. हीच वस्तुस्थिती ख्रिश्‍चनांना विचार करायला पुरेशी आहे; कारण, बायबल म्हणते, की “लोभी” लोकांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही आणि लोभाचे वर्गीकरण मूर्तीपूजेत करण्यात आले आहे.—१ करिंथकर ६:९, १०; कलस्सैकर ३:५.

जुगारामुळे माणूस गर्विष्ठ होतो, अनिष्ट प्रकारचा स्पर्धात्मक आत्मा व जिंकण्याची तीव्र इच्छा अशा व्यक्‍तीत निर्माण होते. प्रेषित पौलाने अशा गोष्टींविरुद्ध ताकीद देताना लिहिले: “आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.” (गलतीकर ५:२६) शिवाय, जुगार काही लोकांना भाग्यावर अंधश्रद्धा बाळगावयाला प्रवृत्त करतो. जुगार खेळणाऱ्‍या लोकांमध्ये सर्वप्रकारच्या अंधश्रद्धा असतात, आपल्या नशीबाचे भाग्य उजळावे अशी त्यांची आशा असते. यावरून आपल्याला अविश्‍वासू इस्राएली लोकांची आठवण होते, जे ‘गादासाठी (भाग्यदेवतेसाठी) मेजवानी तयार करीत, मनीसाठी (कर्मदेवतेसाठी) मिश्रित पेयाचे प्याले भरून ठेवीत.’—यशया ६५:११.

काही जण असा तर्क करतील, की नातेवाईकांबरोबर किंवा जवळच्या मित्रांबरोबर पत्ते खेळताना किंवा पटावरचे खेळ खेळताना मजा म्हणून लहान रक्कमेची पैज लावण्यात काही चूक नाही. हे खरे आहे, की लहान रक्कमेची पैज लावणारा स्वतःला लोभी, गर्विष्ठ, स्पर्धात्मक किंवा अंधश्रद्धा बाळगणारा लेखणार नाही. तरीसुद्धा, तो ज्यांच्याबरोबर जुगार खेळतो त्यांच्यावर त्याच्या जुगाराचा काय परिणाम होऊ शकतो? जुगाराचे व्यसन लागलेल्या लोकांनी, ‘केवळ मजा म्हणून’ लहान लहान पैजा लावूनच सुरवात केलेली असते. (लूक १६:१०) त्यांच्याबाबतीत, सुरवातीला निरुपद्रवी वाटणारा खेळ घातक वळण घेऊन शेवटी अभद्र ठरलेला असतो.

ही गोष्ट मुलांच्याबाबतीत खासकरून खरी ठरते. पुष्कळ मुलांना लहान पैज जिंकण्यात मजा वाटते आणि मग त्यांना मोठ्या रक्कमेची हाव लागते. (१ तीमथ्य ६:१०) जुगाराच्या व्यसनावरील ॲरिझोना मंडळाने अमेरिकेत केलेल्या एका दीर्घ संशोधनाने याला पुष्टी दिली, की जुगाराचे व्यसन लागलेल्या अनेकांनी “लहान वयापासूनच, खेळांवर किंवा मित्रांबरोबर अथवा नातेवाईकांबरोबर पत्ते खेळताना पैज लावण्यास सुरवात केली होती.” आणखी एक रिपोर्ट म्हणतो, की “मुले सहसा, कुटुंबाबरोबर किंवा मित्रांबरोबर घरीच पत्त्यांच्या खेळांवर जुगार खेळण्यास सुरवात करतात.” रिपोर्ट पुढे म्हणतो, की “जुगार खेळणारी तीस टक्के मुले, त्यांच्या अकराव्या वाढदिवसाच्या आधीपासूनच जुगार खेळायला लागली होती.” लोक इतके जुगारी का आहेत—मनोविकृती व जुगाराचे व्यसन (इंग्रजी), या अभ्यासानुसार पुष्कळ किशोरवयीन जुगारी, गुन्हे किंवा अनैतिक कृत्ये करून आपले व्यसन पुरे करतात. सुरवातीला निरुपद्रवी वाटलेल्यांचे किती दुःखद परिणाम हे!

आपण आधीच, अनेक पाश व मोह असलेल्या जगात राहत असताना विनाकरण आणखी एका जाळ्यात का पडावे? (नीतिसूत्रे २७:१२) जुगार—मग तो मुलांबरोबर असो अथवा नसो, लहान रक्कमेचा असो अथवा मोठ्या रक्कमेचा असो—आपल्या आध्यात्मिकतेसाठी धोकाच आहे व तो टाळणेच योग्य आहे. पटावरचे खेळ किंवा पत्ते खेळायची आवड असलेल्या ख्रिश्‍चनांना सल्ला दिला जातो, की त्यांनी एखाद्या कागदावर गुण लिहिणे योग्य राहील किंवा गुण न लिहिता केवळ मनोरंजन म्हणून खेळ खेळावा. आपल्या स्वतःच्या आणि आपल्या मित्रांच्या व कुटुंबाच्या आध्यात्मिकतेची काळजी असलेले सुज्ञ ख्रिस्ती, जुगार टाळतात—मग तो लहान रक्कमेचा असला तरी!

[तळटीप]

^ परि. 3 “एखाद्या खेळाच्या निर्णयावर, घटनेवर किंवा योगायोगाने घडणाऱ्‍या घटनेवर पैज लावणे,” अशी वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ यांत जुगारीची व्याख्या देण्यात आली आहे. तो विश्‍वकोश पुढे असेही म्हणतो, की “जुगार खेळणारी व्यक्‍ती सहसा . . . लॉटरी, पत्त्यांच्या खेळांवर व फासे यांच्यावर पैज लावते.”