व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

देवाला वाहिलेल्या सर्व शपथा कायमच्या बंधनकारक असतात का?

बायबलमध्ये, शपथ अथवा नवस म्हणजे, एखादे कार्य करण्याचे, अर्पण करण्याचे, एखाद्या कार्यात किंवा भूमिकेत पदार्पण करण्याचे किंवा बेकायदेशीर नसलेल्या गोष्टींपासूनसुद्धा स्वतःला दूर ठेवण्याचे देवाला दिलेले वचन. बायबलमध्ये, शपथांचे किंवा नवसांचे अनेक अहवाल आहेत ज्यांत, आपल्या काही अटी पुऱ्‍या झाल्या तर आपण एखादे कृत्य करू अशी शपथ घेणे समाविष्ट होते. उदाहरणार्थ, संदेष्टा शमुवेलाची आई हन्‍ना हिने नवस केला; “ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्‍वरा, तू . . . आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्‍वराचा व्हावा एतदर्थ मी त्यास समर्पण करीन त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरविणार नाही.” (१ शमुवेल १:११) स्वेच्छेने देखील शपथा घेतल्या जातात, हेही बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. तेव्हा, देवाला वाहिलेल्या शपथा कितपत बंधनकारक आहेत?

प्राचीन इस्राएलचा राजा शलमोन म्हणतो: “तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नको, . . . जो नवस तू केला असेल त्याची फेड कर. नवस करावा आणि तो फेडू नये यापेक्षा तो मुळीच न करणे बरे.” (उपदेशक ५:४, ५) मोशेद्वारे इस्राएल राष्ट्राला दिलेल्या नियमशास्त्रात असे म्हटले आहे: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याला नवस करिशील तेव्हा तो फेडण्यास विलंब लावू नको; कारण तुझा देव परमेश्‍वर तुला त्याचा अवश्‍य जाब विचारील; विलंब लावल्यास तुला पाप लागेल.” (अनुवाद २३:२१) स्पष्टतः मग, देवाला शपथ वाहणे गंभीर बाब आहे. विनाकारण शपथ घेऊ नये आणि जी व्यक्‍ती देवाला शपथ वाहते तिने अमुक कार्य करण्याची जी शपथ वाहिलेली असते ते कार्य आपण पूर्ण करू की नाही याबाबत साशंक असू नये. त्यापेक्षा, शपथ न वाहणेच उत्तम आहे. परंतु वाहिलेल्या सर्वच शपथा बंधनकारक आहेत का?

समजा, एखाद्याने एखाद्या कार्याची शपथ घेतली आहे पण नंतर त्या व्यक्‍तीला कळते, की ते कार्य देवाच्या इच्छेच्या अनुसार नाही; मग काय? समजा ती शपथ, कोणत्या तरी मार्गाने अनैतिकतेला खऱ्‍या उपासनेशी जोडत असेल तर? (अनुवाद २३:१८) अर्थातच अशी शपथ बंधनकारक नाही. शिवाय, मोशेच्या नियमशास्त्रानुसार, एखाद्या स्त्रीने केलेला नवस तिचे वडील किंवा तिचा पती रद्द करू शकत होता.—गणना ३०:३-१५.

अशाही व्यक्‍तीचा विचार करा, जिने, विवाह न करण्याची देवाला शपथ वाहिलेली असते परंतु आता ती दुविधेत आहे. शपथेमुळे तिच्या समोर अशी परिस्थिती येते जेथे तिला वाटते, की या शपथेला चिकटून राहिल्याने नैतिकतेविषयी असलेल्या देवाच्या आज्ञांचे कदाचित तिच्या हातून उल्लंघन होईल. अशा वेळीसुद्धा त्या व्यक्‍तीने शपथ न मोडण्याचा विचार करावा का? शपथेला चिकटून राहून पाप करून मग क्षमेसाठी देवाकडे याचना करण्यापेक्षा शपथ मोडून स्वतःला अनैतिकतेच्या अपराधापासून वाचवणे जास्त उत्तम ठरणार नाही का? परंतु याबाबतीत केवळ त्या व्यक्‍तीनेच निर्णय घेतला पाहिजे. इतर कोणीही तिच्यासाठी निर्णय घेऊ शकत नाही.

पण एखाद्याने एक शपथ घेतली आणि नंतर त्याला कळते की त्याने अविचारीपणे ती शपथ घेतली होती, मग? तरीपण त्याने ती शपथ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे का? इफ्ताहाला, त्याने परमेश्‍वराला केलेला नवस पूर्ण करायला सोपे गेले नाही पण तरीसुद्धा त्याने तो नवस जाणीवपूर्वक पूर्ण केला. (शास्ते ११:३०-४०) एखाद्याने देवाला वाहिलेली शपथ पूर्ण न केल्यामुळे देवाला “राग” येऊ शकतो आणि तो त्या व्यक्‍तीच्या हातची कामे नष्ट करू शकतो. (उपदेशक ५:६) शपथ पूर्ण करण्याची बाब हलकी समजणारी व्यक्‍ती देवाच्या मर्जीतून उतरू शकते.

येशू ख्रिस्ताने म्हटले: “तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे; ह्‍याहून जे अधिक ते वाइटापासून आहे.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय ५:३७) ख्रिश्‍चन व्यक्‍तीला फक्‍तच देवाला दिलेल्या शपथा पूर्ण करण्याची काळजी असू नये तर तिने आपल्या सर्व बोलण्यातून—मग ते देवासमोर असो अथवा मानवांसमोर असो—विश्‍वसनीय असल्याचे शाबीत करून दाखवण्याची काळजी असली पाहिजे. पण समजा, त्याने एखाद्या व्यक्‍तीबरोबर एक करार केला आणि सुरवातीला त्याला तो उचित वाटला परंतु नंतर काळजीपूर्वक पाहिल्यावर अविचारीपणाचा वाटला तर काय? अशा गोष्टींना त्याने हलके समजू नये. परंतु ज्या व्यक्‍तीबरोबर त्याने करार केला होता त्याच्याशी मोकळ्या मनाने चर्चा केल्यामुळे कदाचित ती व्यक्‍ती त्याला त्याच्या करारापासून मुक्‍त करेल.—स्तोत्र १५:४; नीतिसूत्रे ६:२, ३.

शपथा आणि इतर गोष्टींच्या संबंधाने आपल्याला सर्वात जास्त चिंता कशाची असली पाहिजे? यहोवा देवाबरोबर असलेला आपला चांगला नातेसंबंध टिकवून ठेवण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे.

[३०, ३१ पानांवरील चित्रे]

हन्‍नाने आपले वचन पूर्ण करण्यासाठी कुचराई केली नाही

[३०, ३१ पानांवरील चित्रे]

इफ्ताहाला आपले वचन पूर्ण करण्यास जड जात होते तरीसुद्धा त्याने ते पूर्ण केले