व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कॅप्टनच्या टेबलावर

कॅप्टनच्या टेबलावर

कॅप्टनच्या टेबलावर

जहाजातून प्रवास करताना कॅप्टनच्या टेबलावर मनोवेधक व्यक्‍ती, उत्तम भोजन व आनंददायक संवाद असेल तर काय बात आहे! पण, व्हाईट स्टार लाईन जहाजावर कॅप्टन रॉबर्ट जी. स्मीथ यांच्या टेबलावर झालेली चर्चा एक आध्यात्मिक मेजवानी ठरली.—यशया २५:६.

१८९४ साली, वयाच्या २४ व्या वर्षी, आपल्या पहिल्या जग भ्रमणाच्या वेळी रॉबर्ट यांनी किनक्लून ऑफ डन्डी जहाजाचे कॅप्टनपद स्वीकारले. त्यानंतर, सेड्रिक, सेव्हिक आणि ऱ्‍यूनिक या व्हाईट स्टारच्या जहाजांवरही ते कॅप्टन होते. * अशाच एका जहाजावर, न्यूयॉर्क ते लिव्हरपूल, इंग्लंड या ॲटलँटिकवरील प्रवासात रॉबर्ट हे कॅप्टनच्या टेबलावरती चार्ल्झ टेझ रस्सल यांचे यजमान होते. रस्सल यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे रॉबर्ट यांना बायबलच्या संदेशामध्ये रस वाटू लागला आणि अधिक शिकण्याकरता त्यांनी रस्सल यांच्याकडून शास्त्रवचनांतील अभ्यास (इंग्रजी) याच्या प्रती घेतल्या.

रस्सल यांनी पत्रव्यवहाराद्वारे संपर्क ठेवला आणि परिणामस्वरूप, बायबलच्या संदेशाबद्दल रॉबर्ट यांची आस्था वाढू लागली. रॉबर्ट यांनी ही नवीन माहिती आपल्या पत्नीलाही सांगितली. आणि काही काळातच ते दोघेही सक्रिय बायबल विद्यार्थी (तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांना या नावाने ओळखले जाई) बनले. रॉबर्ट यांना नंतर बायबल आधारित भाषणे देण्याची संधी प्राप्त झाली. उदाहरणार्थ, ब्रिसबेन, ऑस्ट्रेलिया येथे त्यांनी “गिलियडचा मलम” या विषयावर भाषण देऊन देवाच्या वचनातील संदेश “पृथ्वीवरील सर्व अनर्थांकरता औषध” आहे हे दाखवले. इंग्लंडमध्ये, त्यांची पत्नी आणि मुले, “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” (इंग्रजी), या चलचित्रपटाच्या स्लाईड्‌ससोबत रस्सल यांची ध्वनीमुद्रणे सादर करत होते.

रॉबर्ट यांनी आपल्या मुलांना राज्याच्या सत्याचा वारसा दिला. आज, पाच पिढ्यांनंतर, त्यांच्या कुटुंबातले १८ सदस्य इतरांना सुवार्ता सांगण्यात व्यस्त आहेत; कॅप्टनच्या टेबलावरील भोजनाबद्दल ते कृतज्ञ आहेत.

कॅप्टन स्मीथ यांना आकर्षक वाटलेल्या बायबलमधील संदेशाविषयी यहोवाचे साक्षीदार त्यांच्या प्रकाशनांद्वारे आणि बायबल शिक्षणाच्या कार्याद्वारे जगभरातील लोकांना शिकायला मदत करत आहेत. कॅप्टनच्या टेबलावर मिळालेली ती लक्षवेधक गोष्ट कोणती होती ते तुम्ही देखील शोधू शकता.

[तळटीप]

^ परि. 3 याच प्रकारातील टायटॅनिक जहाजाच्या पहिल्याच दुर्घटनात्मक प्रवासात ई. जे. स्मीथ (नात्यातले नाही) कॅप्टन होते.

[८ पानांवरील चित्र]

रॉबर्ट जी. स्मीथ

[८ पानांवरील चित्र]

चार्ल्झ टेझ रस्सल