व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जिवंत राहण्याचा उत्तम समय

जिवंत राहण्याचा उत्तम समय

जिवंत राहण्याचा उत्तम समय

बिकट परिस्थिती असताना आपल्याला, ‘पूर्वीच्या चांगल्या दिवसांची’ आठवण येऊन ते दिवस पुन्हा यावेसे वाटतात का? मग, सुज्ञ राजा शलमोन याच्या शब्दांचा विचार करा: “सांप्रतच्यापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का? असे म्हणू नको; हे तुझे विचारणे शहाणपणाचे नव्हे.”—उपदेशक ७:१०.

शलमोनाने असा सल्ला का दिला? कारण, त्याला माहीत होते, की गतकाळाविषयी समंजस दृष्टिकोन बाळगल्याने, सद्यकाळातील दुःखदायक परिस्थितींचा यशस्वीरीत्या सामना करण्यास खूप मदत होऊ शकते. ‘पूर्वीचे चांगले दिवस’ यावेत अशी मनिषा बाळगणारे खरे तर हे विसरून जातात, की ते दिवससुद्धा समस्या आणि क्लेश यांनी भरलेले होते; जीवन खरोखरच सुखी नव्हते. गत काळांतील काही दिवस सुखात गेले असतील परंतु इतर दिवस कदाचित तसे नव्हते. शलमोनाने म्हटल्याप्रमाणे, सरलेल्या गोष्टींवर विचार करणे शहाणपणाचे नाही कारण निघून गेलेला वेळ आपण पुन्हा आणू शकत नाहीत.

परंतु सरलेल्या दिवसांची लालसा करण्यात काही धोका आहे का? होय; यामुळे आपण लवचिक राहत नाही, सद्य परिस्थितीशी जुळवून घेत नाही किंवा अशा मनोवृत्तीमुळे आपण ज्या काळात राहात आहोत त्याकडे कृतज्ञतेने पाहत नाही व आपल्याला मिळू शकणाऱ्‍या आशेकडे पाहत नाही.

खरे तर, आपण सध्या ज्या काळात जगत आहोत तो काळ, जगात अनेक वाढत्या समस्या असूनसुद्धा जिवंत असण्याकरता उत्तम काळ आहे. का बरे? कारण, पृथ्वीबद्दल असलेल्या देवाच्या उद्देशांची व त्याच्या राज्याच्या शांतीमय शासनकाळाच्या आशीर्वादांची पूर्णता लवकरच होणार आहे. “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या,” असे बायबल वचन देते. (प्रकटीकरण २१:४) तेव्हा अशा उत्तम परिस्थितीत कोणालाही ‘पूर्वीचे चांगले दिवस’ हवेसे वाटणार नाहीत.