व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नुकसान सोसून दान देणे

नुकसान सोसून दान देणे

नुकसान सोसून दान देणे

“तुम्ही मला भिकारी म्हटले तरी चालेल; मला काही फरक पडत नाही. मी येशूसाठी भीक मागतोय.” एका प्रोटेस्टंट सुवार्तिकाच्या या शब्दांवरून धार्मिक कार्यांसाठी मिळणाऱ्‍या आर्थिक साहाय्यासंबंधीच्या वादविषयावर प्रकाश पडतो. स्थापित धर्म केवळ मोठ्या देणग्यांवर चालू शकतो असे दिसते. पगार द्यायचे असतात, मंदिरे बांधून त्यांची देखरेख करायची असते, सुवार्ता प्रसाराच्या मोहीमांचा खर्च भागवायचा असतो. या सर्वांसाठी पैसा मिळणार कोठून?

अनेक चर्चेसमध्ये, याचे उत्तर आहे दशमांश. * “दशमांश देणे, हा पृथ्वीवरील आपल्या राज्याचा खर्च भागवण्याचा देवाचा मार्ग आहे. ही त्याची आर्थिक व्यवस्था आहे ज्याकरवी सुवार्तेचा प्रचार करणे शक्य होते,” असा दावा सुवार्तिक नॉर्मन रॉबर्टसन करतात. आपल्या अनुयायांना दान देण्याच्या जबाबदारीची आठवण करून देण्यास त्यांना कसलीही लाज वाटत नाही; उलट ते ठासून म्हणतात: ‘आपल्याकडे पैसा आहे म्हणून दशमांश दिला जात नाही. ते एकप्रकारचे आज्ञापालन आहे. दशमांश न देणे हे देवाच्या आज्ञांचे धडधडीत उल्लंघन आहे. ती लबाडी आहे.’—दशमांश देणे—देवाची आर्थिक योजना.

देणगी देणे हा ख्रिस्ती उपासनेचा भाग असला पाहिजे हे कदाचित तुम्हाला मान्य असेल. परंतु, वारंवार पैशांची मागणी करणे त्रासदायक आहे किंवा चीड आणणारे आहे असे तुम्हाला वाटते का? ब्राझीलियन थिओलॉजियन इनास्यू स्ट्रीडर हे असा आरोप लावतात की, चर्चेस आपल्या “संस्थेच्या समस्यांवर उपाय म्हणून” दशमांशाची मागणी करतात आणि ही प्रथा “बेकायदेशीर, अत्याचारी व गैर-शास्त्रीय आहे” असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते याचा परिणाम असा होतो की, “बेकार लोक, विधवा, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आणि तर्कशुद्ध विचार करू न शकणारे लोक असे समजतात की, देवाने त्यांना त्यागले आहे आणि मग स्वतःच्या कुटुंबाला उपाशी ठेवून त्यांना ‘सुवार्तिकाला’ अमुक एक रक्कम द्यावी लागते.”

तुम्ही कदाचित विचार कराल: ‘दशमांश देण्याची प्रथा आचरणारे चर्चेस शास्त्राचे अचूकपणे पालन करत आहेत का? की काही धर्म, देवाची भीती दाखवून आपल्या सदस्यांची पिळवणूक करत असावेत? एखाद्याने नुकसान सोसून दान द्यावे अशी देव खरोखर अपेक्षा करतो का?’

[तळटीप]

^ परि. 3 दशमांश म्हणजे एका व्यक्‍तीच्या एकूण मिळकतीतले १० टक्के अशी त्याची व्याख्या करण्यात आली आहे.