व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तिच्या चिकाटीचे प्रतिफळ

तिच्या चिकाटीचे प्रतिफळ

तिच्या चिकाटीचे प्रतिफळ

पुष्कळ नम्र अंतःकरणाच्या लोकांना वाटते, की आपल्या प्रिय जनांनी देवाचे उद्देश शिकून घ्यावेत, आणि सर्वांनी आनंदी जीवन जगावे. एखादी व्यक्‍ती देवाला आपले जीवन समर्पित करते तेव्हा इतरांनी, मग ते तरुण असोत अथवा वृद्ध, आपल्या उत्तम आचरणाद्वारे या व्यक्‍तीला हा सुज्ञ निर्णय घेण्यास प्रेरित केलेले असते. केआरिमच्या बाबतीत असेच झाले; मेक्सिकोतील या किशोरवयीन मुलीने यहोवाच्या साक्षीदारांच्या एका खास संमेलन दिवशी बांधवांना एक चिठ्ठी दिली ज्यात पुढील मजकूर होता:

“मी तुम्हा सर्वांना माझ्या आनंदात सहभागी करू इच्छिते. मी तुम्हाला याचे कारण सांगते. अठरा वर्षांपूर्वी, जेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, तेव्हा माझ्या आईवडिलांनी सत्य शिकायला सुरू केले होते. माझ्या आईनं प्रगती केली आणि त्यानंतर माझ्या भावानं आणि मग मीसुद्धा प्रगती केली. आम्ही एकत्र मिळून यहोवाला प्रार्थना करीत असू, की आमच्या वडिलांनीसुद्धा जीवनाच्या मार्गावर यावं. आज अठरा वर्षांनंतरचा हा दिवस आमच्यासाठी खास दिवस आहे. माझ्या वडिलांचा आज बाप्तिस्मा आहे. आम्ही इतक्या दिवसांपासून ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो त्या दिवसाआधी यहोवानं अंत आणला नाही म्हणून आम्ही त्याचे आभार मानतो. मी तुझे आभारी आहे, यहोवा देवा!”

इतक्या वर्षांपर्यंत, या मुलीच्या कुटुंबाला १ पेत्र ३:१, २ मधील ईश्‍वरप्रेरित सल्ल्यातील तत्त्वाचा निश्‍चितच विसर पडला नाही; ज्यात असे म्हटले आहे: “स्त्रियांनो, तुम्हीहि आपआपल्या पतीच्या अधीन असा; ह्‍यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.” आणि केआरिमने अनुवाद ५:१६ मधील शब्दांचे पालन केले ज्यात म्हटले आहे: “तुझा देव परमेश्‍वर ह्‍याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख.” अशा तत्त्वांचा अवलंब केल्यामुळे व यहोवावर विसंबून राहिल्यामुळे केआरिम आणि तिच्या कुटुंबाला खरोखर आशीर्वाद मिळाले.