व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुझं म्हणणं बरोबर आहे, जीवन खरंच सुखद आहे!”

“तुझं म्हणणं बरोबर आहे, जीवन खरंच सुखद आहे!”

“तुझं म्हणणं बरोबर आहे, जीवन खरंच सुखद आहे!”

तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ शिकून घ्यायला आवडेल का? पोलंडमधील श्‍चेत्सिन शहरात राहणारी यहोवाची साक्षीदार असलेली अठरा वर्षीय मग्दालिना हिने, आपल्या माध्यमिक शाळेतील एका मैत्रिणीला, कॅटरझीनाला असे करायला मदत केली. कॅटरझीना स्वतःला नास्तिक म्हणायची; पण मग्दालिनाने तिला बायबलविषयी सांगितले तेव्हा ती मनापासून आवड दाखवू लागली.

मग्दालिनाने बायबलमधून सांगितलेल्या गोष्टी कॅटरझीनाला आवडत असल्या तरीसुद्धा ती त्या पूर्णपणे स्वीकारत नव्हती. खऱ्‍या मित्रांविषयी मग्दालिनाला सांगताना एकदा कॅटरझीना तिला म्हणाली: “तुझ्याजवळ बायबल आहे, कोणत्या तत्त्वांचं पालन करायचं आणि मित्र कुठे शोधायचे हे तुला माहीत आहे. पण अशा लोकांविषयी काय ज्यांना निदान आतातरी तुझ्या तत्त्वांचा स्वीकार करता येत नाही?”

कॅटरझीना इंग्लंडमधल्या लंडनला गेली तेव्हा तिच्या जीवनाला कलाटणी देणारा क्षण आला. तिने तेथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला भेट दिली आणि तिला दाखवण्यात आलेले प्रेम पाहून ती प्रभावीत झाली. तिच्यासाठी दार उघडणे, ती बोलत असताना तिचे बोलणे मनापासून ऐकणे या लहानसहान गोष्टींनी ती प्रभावीत झाली.

सप्टेंबर २००१ साली शाळेचे नवे वर्ष सुरू झाले तेव्हा, कॅटरझीना नियमित बायबल अभ्यासाला तयार झाली. बायबल तत्त्वांबद्दलची तिची गुणग्राहकता ती वाढवत आहे आणि आपल्या दररोजच्या जीवनात तिने या तत्त्वांचा अवलंब करण्यास सुरू केले आहे. अलीकडेच तिने मग्दालिनाला आपल्या मनातली गोष्ट सांगितली: “मला जणू नव्यानं जीवन सुरू केल्यासारखं वाटू लागलं आहे.” आणि तिला सेल्युलर फोनवर हा छोटासा संदेश तिनं पाठवला: “आजच्या अभ्यासाबद्दल तुझे आभार मानते. तुझं म्हणणं बरोबर आहे, जीवन खरंच सुखद आहे! यासाठी आपण कुणाचे आभार मानले पाहिजेत हे माहीत असणे किती दिलासा देणारे आहे.”