व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘देवा, तू असं का होऊ दिलंस?’

‘देवा, तू असं का होऊ दिलंस?’

‘देवा, तू असं का होऊ दिलंस?’

रिकार्डोला, दवाखान्यातील प्रतिक्षालयात मारियासोबत बसलेला असतानाचा तो क्षण अजूनही आठवतो. * मारियाचा नुकताच मिळालेला वैद्यकीय रिपोर्ट उघडून वाचण्याचे धैर्य दोघांनाही होत नव्हते. मग, रिकार्डोने पाकीट उघडले, आणि त्यांनी वैद्यकीय भाषेतला तो रिपोर्ट वरवर पाहिला. “कॅन्सर” हा शब्द दिसताच आणि त्याचा अर्थ काय याची जाणीव होताच ते दोघे अक्षरशः रडू लागले.

रिकार्डो आठवून सांगतो, “मारियाचे डॉक्टर फार चांगले होते, त्यांना परिस्थिती किती गंभीर होती हे निश्‍चितच समजले होते कारण ते आम्हाला देवावर भरवसा ठेवा असे सारखे म्हणत राहिले.”

रेडिएशनचा उपचार सुरू करण्याआधी डॉक्टरांच्या लक्षात आले की, मारियाला आपल्या उजव्या पायाच्या हालचालींवर काहीच नियंत्रण नाही. आणखी परीक्षण केल्यावर आढळले की, कॅन्सर तिच्या मेंदूपर्यंत पोचला होता. एकाच आठवड्याच्या उपचारानंतर रेडिएशन थांबवण्यात आले. मारिया कोमात गेली आणि दोन महिन्यांनी तिचा मृत्यू झाला. रिकार्डो म्हणतो, “तिच्या वेदनांचा अंत झाला त्यामुळे एका दृष्टीने मला बरं वाटलं, पण तिच्या जाण्याने मी इतका एकटा पडलो की आपणही मरून जावं असं मला वाटू लागलं. पुष्कळदा मी रडून देवाला म्हणायचो: ‘तू असं का घडू दिलंस?’”

दुर्घटनेपश्‍चात शंकांचे वादळ

रिकार्डोप्रमाणे, जगभरातील असंख्य लोकांना दुःखाच्या कटू वास्तविकतेला तोंड द्यावे लागते. पुष्कळदा, निष्पाप लोकांना दुःख सहन करावे लागते. अंतहीन युद्धांनी पीडित मानवजातीला किती दुःख सोसावे लागते याचा विचार करा. किंवा, बलात्कार, बाल अत्याचार, घरातील हिंसा आणि मानवांच्या इतर दुष्कृत्यांना बळी पडणाऱ्‍यांच्या अवस्थेचा विचार करा. इतिहासभरात मानव मानवावर करत असलेल्या अन्यायाला आणि दुःखाला जणू काही अंतच नाही. (उपदेशक ४:१-३) याशिवाय, नैसर्गिक आपत्ती, अथवा भावनिक, मानसिक आणि शारीरिक आजारांनी त्रस्त झालेले लोक आहेत. त्यामुळे, साहजिकच पुष्कळजण असा प्रश्‍न विचारतात की, “देव अशा दुःखाला परवानगी का देतो?”

पक्के धार्मिक विश्‍वास बाळगणाऱ्‍यांकरताही दुःखाला तोंड देणे सोपे जात नाही. तुम्ही देखील कदाचित असा विचार कराल की, एक प्रेमळ, सर्वशक्‍तिमान देव मानवांच्या दुःखाला परवानगी का देत असावा? या गोंधळविणाऱ्‍या प्रश्‍नाचे समाधानकारक आणि खरे उत्तर प्राप्त करणे आपल्याला मनःशांती मिळण्याकरता आणि देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाकरता आवश्‍यक आहे. बायबल याचे उत्तर देते. पुढील लेखात दिल्याप्रमाणे ते काय म्हणते यावर कृपया विचार करा.

[तळटीप]

^ परि. 2 नावे बदलण्यात आली आहेत.

[३ पानांवरील चित्रे]

देवावर भरवसा ठेवा, असे डॉक्टर सारखे म्हणत राहिले