तुमचा विश्वास किती मजबूत आहे?
तुमचा विश्वास किती मजबूत आहे?
“तुमची स्थिति आहे ती विश्वासाने आहे.”—२ करिंथकर १:२४.
१, २. आपल्याठायी विश्वास असणे का महत्त्वाचे आहे आणि तो अधिक बळकट कसा होईल?
यहोवाच्या सेवकांना विश्वास अत्यावश्यक असल्याचे माहीत आहे. कारण “विश्वासावाचून [देवाला] संतोषविणे अशक्य आहे.” (इब्री लोकांस ११:६) म्हणूनच आपण सुज्ञतेने पवित्र आत्म्याकरता आणि त्याच्या मोहक फळात समाविष्ट असलेल्या विश्वासाकरता प्रार्थना करतो. (लूक ११:१३; गलतीकर ५:२२, २३) सहविश्वासू बांधवांच्या विश्वासाचे अनुकरण केल्यानेही आपला विश्वास दृढ होतो.—२ तीमथ्य १:५; इब्री लोकांस १३:७.
२ देवाच्या वचनात सर्व ख्रिश्चनांकरता आखून दिलेल्या मार्गांवर चालत राहिल्यानेही आपला विश्वास अधिकाधिक मजबूत होईल. दररोज बायबल वाचणे आणि ‘विश्वासू कारभाऱ्याने’ पुरवलेल्या प्रकाशनांच्या माध्यमाने शास्त्रवचनांचा मनःपूर्वक अभ्यास केल्यानेही आपला विश्वास बळकट होऊ शकतो. (लूक १२:४२-४४; यहोशवा १:७, ८) ख्रिस्ती सभा, संमेलने आणि अधिवेशने यांत नियमित स्वरूपाने उपस्थित राहिल्यानेही आपल्याला एकमेकांच्या विश्वासामुळे उत्तेजन मिळते. (रोमकर १:११, १२; इब्री लोकांस १०:२४, २५) तसेच, सेवाकार्यात आपण इतरांशी बोलतो तेव्हाही आपला विश्वास मजबूत होतो.—स्तोत्र १४५:१०-१३; रोमकर १०:११-१५.
३. विश्वासाच्या संबंधाने प्रेमळ ख्रिस्ती वडिलांकडून आपल्याला कोणती मदत मिळते?
२ करिंथकर १:२३, २४) दुसऱ्या एका भाषांतरानुसार: “आम्ही केवळ तुमच्या आनंदाकरता तुमच्यासोबत कार्य करत आहोत कारण तुमचा विश्वास तर आधीच मजबूत आहे.” (कंटेम्प्ररी इंग्लिश व्हर्शन) धार्मिक विश्वासायोगे जगतात. अर्थात, इतर कोणी आपल्यावतीने विश्वास धरू शकत नाही, किंवा आपल्याला एकनिष्ठपणे सचोटी राखण्यास भाग पाडू शकत नाही. या बाबतीत ‘आपण स्वतःचा भार वाहिला पाहिजे.’—गलतीकर ३:११; ६:५.
३ शास्त्रवचनांतून मार्गदर्शन व उत्तेजन देऊन प्रेमळ ख्रिस्ती वडील, विश्वास मजबूत करण्यास आपली मदत करू शकतात. त्यांची मनोवृत्ती प्रेषित पौलासारखी आहे ज्याने ख्रिस्ती लोकांना असे सांगितले: “आम्ही . . . तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहो; तुमची स्थिती आहे ती विश्वासाने आहे.” (४. देवाच्या विश्वासू सेवकांची शास्त्रवचनांतील उदाहरणे आपला विश्वास कशाप्रकारे मजबूत करू शकतील?
४ शास्त्रवचनांत विश्वासूपणे जगलेल्या अनेकांची उदाहरणे आहेत. आपल्याला त्यांच्या कित्येक उल्लेखनीय कृत्यांविषयी माहीत असेल, पण दररोजच्या जीवनात, कदाचित त्यांच्या दीर्घ आयुष्यात शेवटपर्यंत त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय? आपल्यासारख्याच परिस्थितीत त्यांनी हा विश्वास कशाप्रकारे प्रकट केला यावर विचार केल्याने आपला विश्वास देखील मजबूत होण्यास मदत मिळेल.
विश्वास धैर्य उत्पन्न करतो
५. विश्वास आपल्याला देवाचे वचन धैर्याने सांगण्यास मदत करतो याकरता बायबलमधील कोणते उदाहरण देता येईल?
५ विश्वास आपल्याला देवाचे वचन धैर्याने घोषित करण्याकरता सज्ज करतो. हनोख याने देवाच्या न्यायाविषयी धैर्याने भाकीत केले. त्याने म्हटले: “पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास, आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन पापी जनांनी त्यांच्याविरुद्ध सांगितल्या त्यांवरून, त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभु आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.” (यहूदा १४, १५) हे ऐकल्यावर हनोखाच्या अधार्मिक शत्रूंना नक्कीच त्याला ठार मारावेसे वाटले असेल. तरीसुद्धा तो पूर्ण विश्वासाने धैर्यपूर्वक हा संदेश घोषित करत राहिला आणि पीडादायक मृत्यू सोसू न देता देवाने “त्याला नेले.” (उत्पत्ति ५:२४; इब्री लोकांस ११:५) आपल्याला अशा चमत्कारांचा अनुभव येत नसला तरी, आपल्याला यहोवाचे वचन विश्वासाने व धैर्याने सांगता यावे म्हणून तो आपल्या प्रार्थनांचे उत्तर अवश्य देतो.—प्रेषितांची कृत्ये ४:२४-३१.
६. देवाने दिलेला विश्वास व धैर्य यामुळे नोहाला कशाप्रकारे मदत मिळाली?
६ नोहाने विश्वासाच्या द्वारे ‘आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी तारू तयार केले.’ (इब्री लोकांस ११:७; उत्पत्ति ६:१३-२२) नोहा ‘नीतिमत्त्वाचा उपदेशक’ देखील होता व त्याने आपल्या काळातील लोकांना देवाचा इशारेवजा संदेश धैर्याने सांगितला. (२ पेत्र २:५) लोकांनी कदाचित जलप्रलय येणार असल्याचा त्याचा संदेश ऐकून त्याची थट्टा केली असेल. आजही आपण सध्याचे व्यवस्थीकरण लवकरच नाश केले जाईल असे बायबलमधून दाखवतो तेव्हा लोक उपहास करतात. (२ पेत्र ३:३-१२) पण, हनोख व नोहा यांच्याप्रमाणे देवाने दिलेल्या विश्वासाच्या व धैर्याच्या माध्यमाने आपणही हा संदेश घोषित करू शकतो.
विश्वास आपल्याला धीरोदात्त बनवतो
७. अब्राहाम व इतरांनी विश्वास व धीर कसा प्रदर्शित केला?
७ या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंताची वाट पाहत असताना विशेषतः, आपल्याला विश्वास व धीराची गरज आहे. इब्री लोकांस ६:११, १२) विश्वासामुळेच अब्राहामाने सर्व सुखसोयींनी युक्त असे ऊर नगर सोडले आणि देवाने त्याला प्रतिज्ञा केलेल्या एका परक्या देशात तो उपरी म्हणून राहिला. इसहाक व याकोब देखील त्याच प्रतिज्ञेचे वतनदार होते. पण ‘हे सर्व जण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ति झाली नव्हती.’ विश्वासाने त्यांनी ‘अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरली.’ त्यानुसार देवाने “त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे.” (इब्री लोकांस ११:८-१६) होय, अब्राहाम, इसहाक व याकोब आणि त्यांच्या देवभीरू पत्नी यांनी देवाच्या स्वर्गीय राज्याची धीरोदात्तपणे वाट पाहिली, ज्या राज्याच्या शासनाखाली त्यांचे या पृथ्वीवर पुनरुत्थान केले जाईल.
“विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात” यांत देवभीरू कुलपिता अब्राहाम याचाही समावेश आहे. (८. अब्राहाम, इसहाक व याकोब यांनी कोणत्या परिस्थितीतही धीर व विश्वास प्रदर्शित केला?
८ अब्राहाम, इसहाक व याकोब यांनी आपला विश्वास गमावला नाही. प्रतिज्ञात देश त्यांच्या ताब्यात आला नाही आणि अब्राहामाच्या वंशाद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित झालेलीही त्यांनी पाहिली नाहीत. (उत्पत्ति १५:५-७; उत्पत्ति २२:१५-१८) ‘देवाने बांधलेले नगर’ कित्येक शतकांनंतरच वास्तवात उतरणार होते तरीसुद्धा या सर्वांनी आपल्या सबंध जीवनभर विश्वास व धीर प्रदर्शित केला. आज मशीही राज्य स्वर्गात खरोखर सुरू झाले असताना नक्कीच आपणही असेच केले पाहिजे.—स्तोत्र ४२:५, ११; ४३:५.
विश्वास आपल्याला उदात्त ध्येय राखण्यास प्रेरित करतो
९. विश्वासाचा आपल्या ध्येयांवर कोणता परिणाम होतो?
९ विश्वासू कुलपित्यांनी कधीही कनानी लोकांच्या निकृष्ट जीवन शैलीचे अनुकरण केले नाही कारण त्यांची ध्येये यापेक्षा उदात्त होती. त्याचप्रकारे आज विश्वास आपल्याला अशी आध्यात्मिक ध्येये राखण्यास मदत करतो जेणेकरून आपण दुष्टाला अर्थात दियाबल सैतानाला वश झालेल्या या जगासोबत समरूप होण्याचे टाळू शकतो.—१ योहान २:१५-१७; ५:१९.
१०. जगातील मोठेपणापेक्षा योसेफापुढे अधिक उदात्त ध्येय होते हे आपल्याला कसे समजते?
१० देवाच्या मार्गदर्शनाने याकोबाचा पुत्र योसेफ हा ईजिप्तचा खाद्य मंत्री म्हणून कार्य करू लागला पण जगात मोठे नाव कमवण्याचे त्याचे ध्येय नव्हते. यहोवाच्या प्रतिज्ञांच्या पूर्तीवर विश्वास ठेवून ११० वर्षांच्या योसेफाने त्याच्या बांधवांना असे सांगितले: “मी आता मरणार; देव खरोखर तुमची भेट घेईल व जो देश अब्राहाम, इसहाक, व याकोब यांस त्याने शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुम्हाला या देशातून घेऊन जाईल.” योसेफाने प्रतिज्ञात देशात आपणास पुरले जावे अशी इच्छा व्यक्त केली. त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीरावर सुवासिक पदार्थ लावून ते एका शवपेटीत ईजिप्तमध्ये ठेवण्यात आले. पण इस्राएल लोकांना ईजिप्तच्या दास्यातून मुक्ती मिळाल्यावर संदेष्टा मोशे याने योसेफाच्या अस्थी प्रतिज्ञात देशात पुरण्याकरता त्या सोबत नेण्यास सांगितले. (उत्पत्ति ५०:२२-२६; निर्गम १३:१९) योसेफासारखा आपला विश्वास असेल तर त्याने आपल्याला जगातील मोठेपणाऐवजी अधिक उदात्त ध्येयांकरता कार्य करण्याची प्रेरणा दिली पाहिजे.—१ करिंथकर ७:२९-३१.
११. आपण आध्यात्मिक ध्येये डोळ्यापुढे ठेवली असल्याचे मोशेने कशाप्रकारे दाखवले?
इब्री लोकांस ११:२३-२६; प्रेषितांची कृत्ये ७:२०-२२) यामुळे त्याला जगिक प्रतिष्ठा गमवावी लागली; मृत्यूनंतर कदाचित शाही पद्धतीने त्याची अंतक्रिया करून त्याला ईजिप्तच्या कोणत्यातरी मशहूर ठिकाणी भव्य व सुशोभित शवपेटीत ठेवण्यात आले असते. पण “देवाचा माणूस,” नियमशास्त्राच्या कराराचा मध्यस्थ, यहोवाचा संदेष्टा आणि बायबल लेखक होण्याच्या विशेषाधिकारापुढे त्या सर्व गोष्टींना काय महत्त्व होते? (एज्रा ३:२) तुम्हाला जगिक प्रतिष्ठा, मानसन्मानाची व उन्नतीची उत्कंठा आहे का, की विश्वासाने तुम्हाला यापेक्षा उदात्त अशी आध्यात्मिक ध्येये राखण्यास प्रेरित केले आहे?
११ मोशेने ईजिप्तच्या शाही घराण्यातील ज्ञानी सदस्याच्या रूपात ‘पापाचे क्षणिक सुख भोगण्याऐवजी देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे पसंत केले.’ (विश्वासामुळे जीवनात समाधान मिळते
१२. राहाबच्या जीवनावर विश्वासाचा काय परिणाम झाला?
१२ विश्वास केवळ उदात्त ध्येयेच नव्हे तर जीवनात समाधान देखील देतो. यरीहोच्या राहाब नावाच्या स्त्रीला एका वेश्येचे जीवन जगताना ते साहजिकच निरर्थक वाटले असेल. पण तिने विश्वास प्रदर्शित केल्यावर तिची परिस्थिती किती बदलली! तिने कनानी शत्रूंना चुकवणाऱ्या इस्राएली “जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्या वाटेने लावून दिले; ह्यांत ती [विश्वासाच्या] क्रियांनी नीतिमान ठरली.” (याकोब २:२४-२६) यहोवाच खरा देव आहे हे ओळखून, राहाबने वेश्यागमन सोडून दिले, व याद्वारेही तिने विश्वास प्रदर्शित केला. (यहोशवा २:९-११; इब्री लोकांस ११:३०, ३१) तिने अविश्वासी कनानी पुरुषाशी नव्हे तर यहोवाच्या एका सेवकाशी लग्न केले. (अनुवाद ७:३, ४; १ करिंथकर ७:३९) राहाबला मशीहाच्या पूर्वजांपैकी एक होण्याचा महान विशेषाधिकार प्राप्त झाला. (१ इतिहास २:३-१५; रूथ ४:२०-२२; मत्तय १:५, ६) तिला इतरांप्रमाणेच, ज्यांपैकी काहींनी अनैतिक जीवन त्यागले आहे, आणखी एक प्रतिफळ मिळेल—परादीस पृथ्वीवरील जीवनाकरता पुनरुत्थान.
१३. बथशीबासोबत दाविदाने कोणते पाप केले पण त्याने कशी मनोवृत्ती दाखवली?
१३ आपले पापी जीवन सोडून दिल्यावर राहाबने नीतिमान जीवन व्यतीत केले. पण काहींनी अनेक वर्षे यहोवाला समर्पित राहिल्यानंतर गंभीर पाप केले आहे. राजा दाविदाने बथशीबा हिच्याबरोबर जारकर्म केले, तिच्या पतीचा युद्धात मृत्यू घडवून आणला आणि मग तिच्याशी लग्न केले. (२ शमुवेल ११:१-२७) आपल्या या कृत्याचा पश्चात्ताप वाटून दाविदाने अतिशय दुःखाने यहोवाला याचना केली: “आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको.” दाविदाने देवाचा आत्मा गमावला नाही. त्याला यहोवावर, त्याच्या दयेवर विश्वास होता; पापामुळे ‘भग्न व अनुतप्त झालेले हृदय’ तो तुच्छ लेखणार नाही याविषयी त्याला भरवसा होता. (स्तोत्र ५१:११, १७; १०३:१०-१४) दावीद व बथशीबा यांच्या विश्वासामुळे त्यांना मशीहाच्या वंशावळीत स्थान मिळण्याचे समाधानदायक प्रतिफळ लाभले.—१ इतिहास ३:५; मत्तय १:६, १६; लूक ३:२३, ३१.
देवाच्या आश्वासनाने विश्वास अधिक मजबूत होतो
१४. गिदोनाला कोणती आश्वासने मिळाली आणि या अहवालाचा आपल्या विश्वासावर कसा परिणाम होऊ शकतो?
१४ आपण विश्वासाने चालत असलो तरीसुद्धा कधीकधी आपल्याला देवाच्या मदतीच्या आश्वासनाची गरज भासते. यासंदर्भात एक उदाहरण म्हणजे, ‘विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकणारा’ गिदोन. (इब्री लोकांस ११:३२, ३३) मिद्यानी लोकांनी इतर काही राष्ट्रांसोबत इस्राएलवर आक्रमण केले तेव्हा देवाच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला. यहोवा आपल्यासोबत आहे याची खात्री करण्यासाठी गिदोनाने एका खळ्यात रात्रभर लोकर ठेवून परीक्षा घेण्याचे ठरवले. पहिल्यांदा, लोकरीवर दहिवर पडून बाकीची जमीन कोरडी राहिली. दुसऱ्यांदा परीक्षा घेताना याउलट परिस्थिती होती. या आश्वासनांमुळे गिदोनाचा आत्मविश्वास वाढला आणि अशारितीने सावध वृत्तीच्या गिदोनाने विश्वासाने कार्य करून इस्राएलच्या शत्रूला हरवले. (शास्ते ६:३३-४०; शास्ते ७:१९-२५) एखादा निर्णय घेताना आपण यहोवाकडून आश्वासन मागतो, याचा अर्थ आपण विश्वासात कमी पडतो असे नाही. किंबहुना, निर्णय घेताना बायबल व ख्रिस्ती प्रकाशनांतून मार्गदर्शन घेऊन, तसेच पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाकरता प्रार्थना करून आपण आपला विश्वास दाखवत असतो.—रोमकर ८:२६, २७.
१५. बाराकच्या विश्वासाविषयी विचार केल्यामुळे आपल्याला कशाप्रकारे मदत मिळू शकते?
१५ बाराक नावाच्या शास्त्याचा विश्वास प्रोत्साहनाच्या रूपात मिळालेल्या आश्वासनामुळे बळकट झाला. कनानी राजा याबीन याच्या जुलमी शासनातून इस्राएल लोकांना सोडवण्यात पुढाकार घेण्याकरता संदेष्ट्री दबोरा हिने त्याला प्रोत्साहन दिले. विश्वासाने व देवाच्या साहाय्याचे आश्वासन मिळाल्यामुळे बाराकने युद्धात निपुण नसलेल्या १०,००० माणसांना लढाईला नेले आणि सिसेराच्या नेतृत्वाखालील याबीनच्या मोठ्या सैन्यावर विजय मिळवला. दबोरा व बाराकने मग गीत गाऊन या विजयाचा आनंद साजरा केला. (शास्ते ४:१–५:३१) दबोराने बाराकला देवाने नियुक्त केलेला इस्राएलचा पुढारी म्हणून कार्य करण्याचे उत्तेजन दिले आणि तो विश्वासाच्या द्वारे ‘परक्यांची सैन्ये पळविलेल्या’ यहोवाच्या सेवकांपैकी एक होता. (इब्री लोकांस ११:३४) यहोवाच्या सेवेत एखादी कठीण कामगिरी पूर्ण करण्याविषयी आपल्याला पुरेसा आत्मविश्वास नसल्यास बाराकला देवाने विश्वासाच्याद्वारे कार्य केल्याबद्दल कशाप्रकारे आशीर्वादित केले यावर आपण विचार करू शकतो. यामुळे आपल्याला या कार्याकरता लागणारी प्रेरणा मिळू शकते.
विश्वास शांतीला पोषक ठरतो
१६. अब्राहामने लोटासोबत शांतीपूर्ण संबंध ठेवण्याच्या बाबतीत कोणते उदाहरण ठेवले?
१६ देवाच्या सेवेतील कठीण कामे पूर्ण करण्याकरता मदत करण्याव्यतिरिक्त विश्वास शांती व सलोखा कायम राखण्यातही सहायक ठरतो. अब्राहाम व लोट यांच्या गुराख्यांमध्ये तंटा होऊ लागला आणि त्यांचे एकमेकांपासून वेगळे होणे अनिवार्य झाले, तेव्हा वयस्क अब्राहामने आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या लोटाला सर्वात चांगली कुरणे निवडून घेण्याची संधी दिली. (उत्पत्ति १३:७-१२) ही समस्या सोडवण्याकरता निश्चितच अब्राहामने देवाच्या मदतीकरता प्रार्थना केली असावी. स्वतःचा स्वार्थ पुढे ठेवण्याऐवजी त्याने शांतीपूर्ण रितीने प्रश्न सोडवला. आपल्या एखाद्या ख्रिस्ती बांधवासोबत आपले बिनसल्यास, प्रेमळ विचारशीलता दाखवणाऱ्या अब्राहामाचे उदाहरण लक्षात ठेवून आपण विश्वासाने प्रार्थना करू आणि ‘शांतीच्या प्राप्तीसाठी झटू.’—१ पेत्र ३:१०-१२.
१७. पौल, बर्णबा व मार्क यांच्यात झालेला मतभेद शांतीपूर्ण पद्धतीने मिटला असे आपण का म्हणू शकतो?
१७ विश्वासाने ख्रिस्ती तत्त्वांचे पालन केल्याने कशाप्रकारे शांतीला बढावा मिळतो ते पाहा. दुसऱ्या प्रचार यात्रेला निघताना, पौलाने कुप्र व आशिया मायनर येथील मंडळ्यांना पुन्हा भेट देण्याचे सुचवले आणि बर्णबा याकरता तयार झाला. पण बर्णबाला आपला भाऊबंद मार्क यालाही सोबत नेण्याची इच्छा होती. पौलाला मात्र इच्छा नव्हती कारण मार्क पूर्वी एकदा पंफुल्याहून त्यांना सोडून गेला होता. यावरून पौल व बर्णबा यांच्यात “तीव्र मतभेद” झाला आणि ते वेगळे झाले. बर्णबा मार्कला घेऊन कुप्रला गेला आणि पौलाने सीला यास आपला सोबती म्हणून निवडले आणि तो “मंडळ्यांना प्रेषितांची कृत्ये १५:३६-४१) कालांतराने त्यांच्यातील मतभेद दूर झाला कारण रोममध्ये मार्क पौलासोबत होता आणि प्रेषित पौलाने त्याच्याविषयी प्रशंसेचे उद्गार देखील काढले. (कलस्सैकर ४:१०; फिलेमोन २३, २४) सा.यु. ६५ सालादरम्यान पौल रोममध्ये बंदिवासात होता तेव्हा त्याने तीमथ्याला सांगितले: “मार्काला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ४:११) साहजिकच पौलाने बर्णबा व मार्क यांच्यासोबतच्या आपल्या संबंधांविषयी प्रार्थना केली असेल आणि यामुळे ‘देवाने दिलेल्या शांतीमुळे’ सलोखा घडून आला.—फिलिप्पैकर ४:६, ७.
स्थैर्य देत देत सूरिया व किलकिया” येथे गेला. (१८. युवदीया व सुंतुखे यांच्या बाबतीत काय घडले असावे?
१८ अपरिपूर्ण असल्यामुळे अर्थातच “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो.” (याकोब ३:२) दोन ख्रिस्ती स्त्रियांमध्ये काहीतरी बिनसले; त्यांच्याविषयी पौलाने लिहिले: “मी युवदीयेला विनंती करितो व सुंतुखेला विनंति करितो की तुम्ही प्रभूच्या ठायी एकचित्त व्हा. . . . ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर . . . सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना साहय्य कर.” (फिलिप्पैकर ४:१-३) कदाचित या देवभीरू स्त्रियांनी मत्तय ५:२३, २४ येथे दिलेल्या सल्ल्याचे पालन करण्याद्वारे आपली समस्या शांतीपूर्ण रितीने सोडवली असावी. शास्त्रवचनांतील तत्त्वांचे विश्वासाने पालन करण्याद्वारे आपणही आज शांतीला बढावा देऊ शकतो.
विश्वास आपल्याला टिकून राहण्यास शक्ती देतो
१९. कोणत्या कठीण परिस्थितीने इसहाक व रिबेका यांचा विश्वास कमकुवत झाला नाही?
१९ विश्वासाच्या योगे आपण संकटालाही तोंड देऊ शकतो. कदाचित आपल्या कुटुंबातील एका बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्तीने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करून एखाद्या अविश्वासी व्यक्तीशी विवाह केल्यामुळे आपण दुःखी असू. (१ करिंथकर ७:३९) इसहाक व रिबेका यांनाही त्यांचा पुत्र एसाव याने अधार्मिक स्त्रियांशी लग्न केल्यामुळे बराच मनःस्ताप झाला. एसावच्या हित्ती पत्नी त्यांच्या “मनास दुःखदायक झाल्या.” एकदा तर रिबेकाने म्हटले: “या हेथींच्या मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे; यांच्यासारखी हेथींच्या मुलींतली ह्या देशाच्या मुलींतली एखादी याकोबाने वरिली तर मला जगून काय लाभ?” (उत्पत्ति २६:३४, ३५; २७:४६) तरीपण या परीक्षाप्रसंगामुळे इसहाक व रिबेका यांचा विश्वास कमकुवत झाला नाही. कठीण परिस्थिती आपल्यासमोर आव्हानासारख्या उभ्या राहतात तेव्हा आपणही विश्वासात खंबीर राहू या.
२०. नामी व रूथ यांच्या विश्वासावरून आपण काय शिकतो?
२० वृद्ध विधवा नामी यहुदी होती आणि तिला माहीत होते की यहुदातील काही स्त्रिया मशीहाच्या पूर्वजांना जन्म देतील. तिचे पुत्र तर मुले न होताच मरण पावले होते आणि तिचे मुलांना जन्म देण्याचे वय निघून गेले होते; त्यामुळे तिच्या कुटुंबातून मशीहाच्या वंशावळीतील कोणाचा जन्म होण्याची शक्यता तशी नव्हतीच. तरीसुद्धा तिची विधवा सून रूथ, वयस्क बवाजाची पत्नी बनली, तिने पुत्राला जन्म दिला आणि मशीहा अर्थात येशूची ती पूर्वज बनली! (उत्पत्ति ४९:१०, ३३; रूथ १:३-५; ४:१३-२२; मत्तय १:१, ५) नामी व रूथ यांचा विश्वास संकटावर बलवत्तर ठरला आणि त्यामुळे त्यांना मोठा आनंद मिळाला. आपणही संकटाला तोंड देताना विश्वास टिकवून ठेवल्यास आनंदी होऊ शकतो.
२१. विश्वास आपल्याला कोणते फायदे मिळवून देतो आणि आपला काय संकल्प असावा?
२१ कोणता दिवस आपल्याकरता काय घेऊन येईल हे कोणीही सांगू शकत नाही पण विश्वासाच्या साहाय्याने आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. विश्वास आपल्याला धैर्यवान व सहनशील बनवतो. तो आपल्याला जीवनात उदात्त ध्येये ठेवण्यास मदत करतो आणि जीवनात समाधान मिळवून देतो. विश्वासामुळे इतरांसोबतचे आपले संबंध सुधारतात आणि संकटातही तो आपल्याला टिकून राहण्यास मदत करतो. तेव्हा “जिवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी” आपण होऊ या. (इब्री लोकांस १०:३९) आपला प्रेमळ देव यहोवा याच्या मदतीने आणि त्याच्याच गौरवाकरता आपण पुढेही मजबूत विश्वास ठेवून चालू या.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• विश्वास आपल्याला धैर्यवान बनवतो हे बायबलमधील कोणत्या उदाहरणावरून सिद्ध होते?
• विश्वासामुळे आपल्याला जीवनात समाधान मिळते असे आपण का म्हणू शकतो?
• विश्वास कशाप्रकारे शांतीला बढावा देतो?
• विश्वास संकटात टिकून राहण्यास आपली मदत करतो याकरता काय पुरावा आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१६ पानांवरील चित्रे]
विश्वासामुळे नोहा व हनोख यांनी यहोवाचे संदेश धैर्याने घोषित केले
[१७ पानांवरील चित्रे]
मोशेसारखा विश्वास आपल्याला आध्यात्मिक ध्येयांकरता झटण्याची प्रेरणा देतो
[१८ पानांवरील चित्रे]
देवाच्या मदतीचे आश्वासन मिळाल्याने बाराक, दबोरा व गिदोन यांचा विश्वास बळकट झाला