व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खात्रीशीर व समाधानकारक कामाचा तुटवडा

खात्रीशीर व समाधानकारक कामाचा तुटवडा

खात्रीशीर व समाधानकारक कामाचा तुटवडा

संयुक्‍त राष्ट्रसंघाने प्रस्तुत केलेल्या मानवी हक्कांची विश्‍वव्यापी घोषणा यानुसार “काम करण्याचा हक्क” हा मूलभूत मानवी हक्क आहे. परंतु तो हक्क सर्वांना मिळतोच असे नाही. खात्रीशीर काम, स्थानीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीपासून जागतिक बाजारापर्यंतच्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते. पण, नोकरी जाते किंवा जाण्याची शक्यता असते तेव्हा लागलीच प्रदर्शने, दंगली, संप सुरू होतात. याला फार कमी देश अपवाद आहेत. एका लेखकाच्या मते, “काम हा शब्द देखील तीव्र भावना उत्पन्‍न करणारा शब्द आहे.”

काम आपल्याकरता अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे. मिळकत प्राप्त होण्याशिवाय ते आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यालाही पोषक ठरते. समाजाला उपयोगी असण्याची व उद्देशपूर्ण जीवन असण्याची मानवी इच्छा कामाने तृप्त होते. त्याने आपल्यामध्ये काही प्रमाणात आत्म-सन्मानही निर्माण होतो. म्हणूनच, आपल्या गरजा भागवण्यासाठी भरपूर पैसा असतानाही किंवा निवृत्त होण्यास पात्र असतानाही काही लोक काम करणे पसंत करतात. होय, काम इतके महत्त्वाचे आहे की, काम नसल्यामुळे सहसा गंभीर सामाजिक समस्या निर्माण होतात.

दुसऱ्‍या बाजूला असेही लोक आहेत, ज्यांच्याजवळ नोकरी तर आहे, पण कामाच्या ठिकाणी त्यांना इतक्या दबावांचा सामना करावा लागतो की त्यांना आपल्या कामातून समाधान मिळत नाही. उदाहरणार्थ, आजच्या अति स्पर्धात्मक बाजारपेठेमुळे पुष्कळ कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी आपल्या कामगारांना कामावरून काढले आहे. याचा उरलेल्या कामगारांवर जास्त दबाव पडू शकतो आणि त्यांच्यावर जादा कामाचा बोजा पडतो.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे जीवन अधिक सोपे आणि काम अधिक परिणामकारक व्हायला हवे खरे पण त्याउलट कामाच्या ठिकाणी ताणतणाव अधिक वाढले आहेत. उदाहरणार्थ, संगणक, फॅक्स मशिन आणि इंटरनेटमुळे लोक कामाची वेळ संपल्यावर घरी देखील आपले काम नेऊ शकतात पण यामुळे घर आणि दफ्तर यांतला फरक नाहीसा झाला आहे. एका कामगाराला असे वाटत होते की, कंपनीने त्याला दिलेला पेजर आणि सेल फोन त्याच्या गळ्यात घातलेल्या पट्ट्यासारखा होता ज्याचे टोक त्याच्या बॉसच्या हातात होते.

झपाट्याने बदलत चाललेल्या आर्थिक आणि रोजगार क्षेत्रातील वातावरणामुळे पुष्कळ वृद्ध लोकांना अशी भीती वाटत असते की, त्यांना वेळेआधीच निवृत्त करण्यात येईल. याबाबतीत, भूतपूर्व मानवी हक्क कमिशनर क्रिस सिडोटे म्हणाले: “अशी एक धारणा आहे की, ४० वर्षांपेक्षा कमी वय असल्याशिवाय संगणक आणि नवीन तंत्रज्ञानाचे काम तुम्हाला जमणार नाही.” त्यामुळे, एकेकाळी मेहनती समजल्या जाणाऱ्‍या पुष्कळ चांगल्या कामगारांना आजकाल निकामी समजले जाते. किती दुःखाची गोष्ट!

अलीकडील वर्षांमध्ये कामासूपणाचे आणि कंपनीला विश्‍वासू असण्याचे महत्त्व कमी झाले आहे. “शेअर बाजारात जराही बदल झाला की कंपन्या आपल्या कामगारांना कामावरून काढून टाकतात त्यामुळे कंपनीला आजकाल कोणी विश्‍वासू राहत नाही,” असे फ्रेंच नियतकालिक लिबेरास्यो यात म्हटले आहे. “काम तर करावेच लागते पण कंपनीसाठी नाही तर स्वतःसाठी ते केले जाते.”

या सर्व समस्या वाढत असतानाही, काम करण्याची मूलभूत मानवी गरज संपत नाही. त्यामुळे आपल्या बदलत्या काळात, नोकरीविषयी समतोल दृष्टिकोन राखणे तसेच सुरक्षित वाटणे आणि नोकरीतून समाधान मिळवणे कसे शक्य आहे?

[३ पानांवरील चित्र]

आधुनिक तंत्रज्ञानाने नोकरीवरील ताणतणाव वाढला असावा