व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ब्राझीलमध्ये राज्य संदेश “ऐकला” जात आहे

ब्राझीलमध्ये राज्य संदेश “ऐकला” जात आहे

राज्य घोषकांचा वृत्तान्त

ब्राझीलमध्ये राज्य संदेश “ऐकला” जात आहे

कर्णबधिरांच्या समाजात राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यासाठी ब्राझीलमधल्या पुष्कळशा यहोवाच्या साक्षीदारांनी ब्राझीलियन मूकबधिरांची भाषा शिकण्याचे आव्हान स्वीकारले आहे. या त्यांच्या प्रयत्नांचा उत्तम परिणाम दिसून येत आहे; पुढील अनुभव याची प्रचिती देतात.

साऊ पाउलुमध्ये इव्हा * नावाची एक कर्णबधिर स्त्री, आपल्या तीन मुलांसह एका कर्णबधिर माणसासोबत राहायला गेल्यावर मूकबधिरांची भाषा शिकू लागली. एका शॉपिंग मॉलजवळ इव्हा आणि तिच्या या मित्राला काही कर्णबधिर साक्षीदार भेटले आणि त्यांना राज्य सभागृहात येण्याचे आमंत्रण देण्यात आले. हा एखादा सामाजिक सोहळा असावा असा विचार करून त्यांनी ते आमंत्रण स्वीकारले.

मूकबधिरांची भाषा फार येत नसल्यामुळे इव्हाला सभेत सांगितलेल्या बहुतेक गोष्टी समजल्या नाहीत. त्यानंतर, काही साक्षीदारांनी त्यांना आपल्या घरी चहापाण्यासाठी बोलावले. भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा! या माहितीपत्रकातील चित्रांद्वारे त्यांनी तिला भविष्यातील पार्थिव परादीसविषयी देवाने दिलेल्या वचनाबद्दल समजावून सांगितले. इव्हाला ते सर्व फार आवडले आणि ती नियमितपणे सभांना जाऊ लागली.

त्यानंतर लगेच, बायबलच्या तत्त्वांनुसार जीवन जगण्यासाठी इव्हाने आपल्या मित्रासोबत राहणे सोडून दिले. तिच्या कुटुंबाकडून तिला कडा विरोध असतानाही ती आध्यात्मिक प्रगती करत राहिली आणि १९९५ साली तिने बाप्तिस्मा घेतला. सहा महिन्यांनंतर, इव्हाने पायनियर किंवा पूर्ण वेळेची राज्य उद्‌घोषक बनण्यासाठी नाव दिले. तेव्हापासून तिने चार कर्णबधिरांना समर्पण व बाप्तिस्मा घ्यायला मदत केली आहे.

कार्लोस जन्मापासूनच बहिरा होता. लहानपणापासूनच त्याला अंमली पदार्थ, अनैतिक कामे आणि चोऱ्‍यामाऱ्‍या यांची सवय लागली. शत्रू टोळीतल्या गुंडांनी त्याला धमकी दिल्यावर तो साऊ पाउलुला पळून गेला आणि झ्वाउ याच्यासोबत काही काळ राहिला. कार्लोससारखा झ्वाउ दखील कर्णबधिर होता आणि तोही वाईट वळणाचा होता.

काही वर्षांनी, कार्लोसला राज्य संदेश शिकायला मिळाला आणि यामुळे त्याने आपले जीवन सुधारले व आपल्या विवाहाची कायदेशीर नोंद केली. शास्त्रवचनीय अपेक्षा पूर्ण केल्यावर, कार्लोसने यहोवाला केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेतला. दरम्यान, झ्वाउला देखील सुवार्ता कळाली होती आणि त्यानेही आपल्या जीवनात बरेच बदल केले होते; पण कार्लोसला याची कल्पना नव्हती. यहोवाला मूर्तींची उपासना केलेली चालत नाही हे कळाल्यावर झ्वाउने आपल्याजवळ असलेल्या “संतांच्या” प्रतिमा फेकून दिल्या. आपल्या पूर्वीच्या जीवनात पूर्णपणे बदल केल्यावर झ्वाउने देखील बाप्तिस्मा घेतला.

कार्लोस आणि झ्वाउ हे दोघेही एकमेकांना राज्य सभागृहात भेटले व दोघांनीही स्वतःमध्ये बदल केलेले पाहून त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही! दोघेही आता जबाबदार कुटुंब प्रमुख आणि आवेशी राज्य उद्‌घोषकही आहेत.

ब्राझीलमध्ये सध्या, मूकबधिर भाषेच्या ३० मंडळ्या आणि १५४ गट आहेत, व यांत २,५०० पेक्षा अधिक प्रचारक असून त्यातील १,५०० जण कर्णबधिर आहेत. ब्राझीलमध्ये, कर्णबधिरांसाठी आयोजित केलेल्या २००१ “देवाच्या वचनाचे शिक्षक” प्रांतीय अधिवेशनांकरता ३,००० हून अधिक लोक उपस्थित होते आणि ३६ जणांचा बाप्तिस्मा झाला. यहोवाच्या आशीर्वादाने कदाचित अधिक कर्णबधिर लोक राज्याच्या संदेशाचा स्वीकार करतील.

[तळटीप]

^ परि. 4 नावे बदलण्यात आली आहेत.