व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अज्ञात देवावरील विश्‍वास

अज्ञात देवावरील विश्‍वास

अज्ञात देवावरील विश्‍वास

जर्मनीत तीनपैकी दोन जणांचा देवावर विश्‍वास आहे. तरीपण, हजारहून अधिक लोकांना ज्या देवावर विश्‍वास आहे त्याचे वर्णन करायला सांगण्यात आले तेव्हा बहुतेक सर्वांनी वेगवेगळी उत्तरे दिली. “जर्मन लोक एकमेकांपासून जितके वेगळे आहेत तितक्याच त्यांच्या प्रत्येकाच्या देवाविषयी वेगळ्या संकल्पना आहेत,” असे बातमीपत्र फोकस यात म्हटले आहे. देवावर विश्‍वास असणे फार उत्तम गोष्ट आहे, पण तो कसा आहे हे न जाणता त्याच्यावर विश्‍वास करणे दुःखाची गोष्ट नाही का?

देवाच्या स्वभावाविषयी किंवा व्यक्‍तित्वाविषयी माहीत नसण्याची वस्तुस्थिती केवळ जर्मनीतच नाही; युरोपमध्ये सगळीकडे हीच स्थिती आहे. ऑस्ट्रिया, ब्रिटन आणि नेदरलंड येथे घेतलेल्या सर्वेक्षणातून हे प्रकट झाले की बहुतेक लोकांची अशी सर्वसाधारण कल्पना आहे की, देव “एक उच्च शक्‍ती आहे किंवा अवर्णनीय गूढ आहे.” खासकरून तरुणांमध्ये ही धारणा आहे; अगदी देवावर विश्‍वास करणारेही असे मानतात की तो एक रहस्य आहे.

तुम्ही देवाला व्यक्‍तिगतरित्या ओळखता का?

कोणाच्या विषयी माहीत असणे आणि कोणाला व्यक्‍ती या नात्याने ओळखणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. कोणाच्या विषयी माहीत असणे—जसे की, कोणी एक राजा, सर्वोत्तम खेळाडू किंवा फिल्म स्टार—म्हणजे तो अस्तित्वात आहे एवढेच कबूल करणे. पण व्यक्‍ती या नात्याने कोणाला ओळखण्यामध्ये यापेक्षाही अधिक समाविष्ट आहे. त्यामध्ये त्या व्यक्‍तीचे गुण, वर्तन, भावना, आवडी-निवडी आणि भविष्याबद्दलच्या योजना माहीत असण्याचा समावेश होतो. आपण एखाद्याला व्यक्‍तिगतरित्या ओळखत असलो तर त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध वाढवायला संधी मिळते.

लाखो व्यक्‍तींनी असा निष्कर्ष काढला आहे की, देवाविषयी पुसटशी कल्पना असणे—किंवा त्याची वरवर ओळख असणे—पुरेसे नाही. देवाला जवळून ओळखण्याचा प्रयत्न करून ते बरेच पुढे गेले आहेत. याचा त्यांना काही फायदा झाला आहे का? उत्तर जर्मनीत राहणाऱ्‍या पॉल नावाच्या एका मनुष्याला देवाविषयी वरवर माहिती होती; पण त्याने स्वतः त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्याचा निर्णय घेतला. पॉल म्हणतो: “देवाची चांगली ओळख करून घ्यायला वेळ आणि परिश्रम लागतो खरा पण त्याचे खूप फायदे आहेत. निर्माणकर्त्यासोबत जवळचा नातेसंबंध असल्यामुळे दररोजचे जीवन सुखकर बनते.”

देवाला जवळून जाणून घेण्यासाठी वेळ आणि परिश्रम खर्च करण्यात खरोखर अर्थ आहे का? कृपया पुढील लेख वाचा.

[३ पानांवरील संक्षिप्त आशय]

कोणाच्या विषयी माहीत असणे आणि कोणाला स्वतः ओळखणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे