व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निर्वासितांच्या छावणीतले जीवन

निर्वासितांच्या छावणीतले जीवन

निर्वासितांच्या छावणीतले जीवन

“निर्वासितांची छावणी” म्हटल्यावर तुमच्या डोळ्यांसमोर कसले चित्र उभे राहते? तुम्ही अशी छावणी कधी पाहिली आहे का? ती कशी असते?

हा लेख लिहिला जात होता तेव्हा टान्झानियाच्या पश्‍चिम भागात निर्वासितांच्या १३ विविध छावण्या निर्माण झाल्या होत्या. युनायटेड नेशन्स हाय कमिशनर ऑफ रेफ्यूजीझ (यूएनएचसीआर) यांच्या सहकार्याने टान्झानियाचे सरकार मुलकी युद्धांनी बेघर झालेल्या इतर आफ्रिकन देशांमधील सुमारे ५,००,००० निर्वासित लोकांना साहाय्य करत होते. छावणीतले जीवन कसे असते?

छावणीत प्रवेश

काही वर्षांआधी कान्डीडा नावाची एक किशोरवयीन आपल्या कुटुंबासोबत अशा एका छावणीत आली तेव्हा काय घडले याचे ती वर्णन करते: “त्यांनी आम्हाला एक रेशन कार्ड दिलं आणि त्यासोबत एक आयडी नंबर होता; आमच्या कुटुंबाला निआरुगुसू निर्वासितांच्या छावणीत राहायला सांगण्यात आलं. तेथे आम्हाला एक प्लॉट नंबर आणि मार्ग नंबर देण्यात आला. आमचं स्वतःचं घर बांधायला झाडे कोठून कापायची आणि गवत कोठून आणायचे हे आम्हाला दाखवलं गेलं. आम्ही मातीच्या विटा तयार केल्या. यूएनएचसीआरने आम्हाला एक मोठं प्लॅस्टिक दिलं आणि ते आम्ही घराच्या छतावर घातलं. हे सगळं करायला खूप मेहनत करावी लागली पण आमचं ते छोटंसं घर तयार झाल्यावर आम्ही आनंदी झालो.”

एकआड बुधवारी रेशन कार्डाचा उपयोग करता येतो. “आम्ही कॅन्टीनसमोर रांगेत उभे राहून यूएनएचसीआरतर्फे वाटप केले जाणारे मूलभूत अन्‍नधान्य गोळा करायचो,” असे कान्डीडा पुढे म्हणते.

एका व्यक्‍तीला दररोज काय मिळते?

“तीन कप मक्क्याचे पीठ, एक कप मटर, २० ग्रॅम सोयाबीनचे पीठ, २ टेबलस्पून गोडे तेल आणि १० ग्रॅम मीठ. कधीकधी आम्हाला एक साबण मिळतो आणि तो पूर्ण महिनाभर वापरायचा असतो.”

स्वच्छ पाण्याचे काय? ते उपलब्ध असते का? रिझिकी नावाची एक तरुण स्त्री म्हणते: “होय, आसपासच्या नद्यांमधले पाणी पंपाने मोठ्या तलावात गोळा केले जाते. या पाण्यात क्लोरिन घालून मग ते प्रत्येक छावणीतल्या नळांमध्ये सोडले जाते. आजारी पडू नये म्हणून आम्ही पाणी उकळून पिण्याचा प्रयत्न करतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचा पुष्कळ वेळ पाणी भरण्यात आणि नळावर जाऊन कपडे धुण्यातच जातो. दररोज आम्हाला फक्‍त दीड बादली पाणी मिळू शकते.”

छावणीतून जाताना तुम्हाला बालवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा दिसतील. छावणीत काही वेळा प्रौढ शिक्षण केंद्रे देखील असतात. छावणीच्या लागलीच बाहेर एक पोलिस चौकी आणि सरकारी दफ्तर असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था असते. एक मोठा बाजार आहे ज्यात लहान लहान दुकाने असतात आणि तेथे निर्वासितांना भाज्या, फळे, मच्छी, चिकन आणि इतर गरजेच्या वस्तू मिळतात. आजूबाजूच्या परिसरातले काही लोक बाजारात येऊन व्यापार करतात. पण, वस्तू विकत घ्यायला या निर्वासितांना पैसा कोठून मिळतो? काहीजण लहानशी भाजीपाल्याची बाग करतात आणि त्यातला भाजीपाला बाजारात आणून विकतात. इतरजण त्यांच्या वाट्याचे पीठ किंवा मटर विकून त्या पैशांतून मांस किंवा फळे विकत घेतात. ही छावणी एखाद्या मोठ्या गावासारखीच दिसते. बाजारात लोक हसताना, मजा करतानाही दिसतात जसे काय ते आपल्या स्वतःच्याच गावात आहेत.

इस्पितळात गेल्यावर डॉक्टरांकडून तुम्हाला कळेल की, छावणीतल्या दोन-चार लहान दवाखान्यांमध्ये साध्यासुध्या दुखण्याखुपण्यांवर औषधपाणी दिले जाते पण गंभीर केसेस इस्पितळात पाहिल्या जातात. इस्पितळातला मॅटरनिटी विभाग आणि डिलिव्हरी रूम सर्वात महत्त्वाची ठिकाणे आहेत कारण ४८,००० निर्वासितांच्या छावणीत दर महिन्याला किमान २५० बालकांचा जन्म होतो.

आध्यात्मिकरित्या पोषित

जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांना टान्झानियाच्या छावण्यांमधील आपल्या आध्यात्मिक बांधवांची चिंता असेल. तेथे एकूण १,२०० साक्षीदार आहेत आणि त्यांच्या १४ मंडळ्या व ३ गट आहेत. त्यांचे कसे चालले आहे?

या समर्पित ख्रिश्‍चनांनी छावण्यांमध्ये येताच राज्य सभागृहासाठी प्रथम जागेची विनंती केली. यामुळे निर्वासितांना, साक्षीदारांना कोठे भेटायचे आणि त्यांच्या होणाऱ्‍या साप्ताहिक सभांना कोठे उपस्थित राहायचे ते समजले. लुगुफू छावणीत, ७ मंडळ्या आहेत आणि एकूण ६५९ सक्रिय ख्रिस्ती आहेत. त्यांच्या रविवारच्या सभांमध्ये, या ७ मंडळ्यांची एकूण उपस्थिती सुमारे १,७०० इतकी असते.

सर्व छावण्यांतील साक्षीदारांना ख्रिस्ती संमेलने आणि अधिवेशने यांचाही फायदा होतो. लुगुफू छावणीत पहिले प्रांतीय अधिवेशन भरवण्यात आले तेव्हा २,३६३ जण उपस्थित होते. साक्षीदारांनी अधिवेशनाच्या ठिकाणाशेजारीच बाप्तिस्म्यासाठी एक तलाव तयार केला होता. त्यांनी आधी जमिनीत खड्डा खणला, मग पाणी झिरपू नये म्हणून त्यात प्लॅस्टिक टाकले आणि अशाप्रकारे तलाव तयार केला. बांधवांनी दोन किलोमीटर दूरहून एका नदीतून सायकलींवर पाणी आणले. प्रत्येक खेपेला २० लिटर पाणी आणले जात होते—याचा अर्थ त्यांना पुष्कळ खेपा कराव्या लागल्या. सभ्य पेहरावातील बाप्तिस्म्याचे उमेदवार बाप्तिस्म्यासाठी रांगेत उभे राहिले. एकूण ५६ लोकांचा पाण्यात पूर्णपणे बुडून बाप्तिस्मा झाला. अधिवेशनात मुलाखत घेतलेल्या एका पूर्ण-वेळेच्या सेवकाने म्हटले की, त्याने ४० वेगवेगळ्या व्यक्‍तींचा बायबल अभ्यास घेतला. त्या अधिवेशनात त्याच्या चार विद्यार्थ्यांचा बाप्तिस्मा झाला.

यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराने प्रवासी पर्यवेक्षकांच्या नियमित भेटींची योजना केली आहे. त्यांच्यापैकी एक म्हणतो: “आपले बांधव सेवाकार्यात आवेशी आहेत. त्यांच्या प्रचाराचे क्षेत्र फार मोठे आहे आणि एका मंडळीत प्रत्येक साक्षीदार सेवाकार्यात महिन्याला सुमारे ३४ तास खर्च करतो. अनेकांचे आस्थेवाईक लोकांसोबत पाच किंवा अधिक बायबल अभ्यास आहेत. एका पायनियरने [पूर्ण-वेळेची सेविका] म्हटले की, तिला यापेक्षा उत्तम क्षेत्र कोठेही सापडणार नाही. छावणीतल्या लोकांना आपली प्रकाशने खूप आवडतात.”

बायबल साहित्य छावण्यांमध्ये कसे पोहंचते? शाखेतून हे साहित्य ट्रेनने तांगानयिका तलावाच्या पूर्व किनाऱ्‍यावरील किगोमा शहरापर्यंत पाठवले जाते. तेथून बांधव हे साहित्य गोळा करून मंडळ्यांना पोहंचवण्याची व्यवस्था करतात. काही वेळा ते पिक-अप ट्रक भाड्याने घेऊन स्वतःच सगळ्या छावण्यांमध्ये जाऊन साहित्याचे वाटप करतात. अत्यंत खडबडीत रस्त्यांवरून या वाटपाला तीन ते चार दिवस लागतात.

आर्थिक साहाय्य

फ्रान्स, बेल्जियम आणि स्वीत्झर्लंड येथील यहोवाच्या साक्षीदारांनी खासकरून या छावण्यांमधील निर्वासितांना फार मदत दिली आहे. काहींनी गृहकारभार मंत्रालयाकडून आणि यूएनएचसीआरकडून संमती प्राप्त करून टान्झानियातील या छावण्यांना भेटी दिल्या आहेत. युरोपमधील साक्षीदारांनी सोया दूध, कपडालत्ता, बूट, शाळेची पुस्तके आणि साबण अशा वस्तू टनाच्या हिशेबाने गोळा केल्या आहेत. बायबलमधील तत्त्वाच्या अनुषंगाने सर्व निर्वासितांना देण्यासाठी या वस्तू दान करण्यात आल्या आहेत; हे तत्त्व पुढीलप्रमाणे आहे: “तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.”—गलतीकर ६:१०.

या माणुसकीच्या प्रयत्नांमुळे फार चांगले परिणाम मिळाले असून अनेक निर्वासितांना मदत मिळाली आहे. एका छावणीतल्या निर्वासित समाज समितीने या शब्दांमध्ये आपली कदर व्यक्‍त केली: “आमच्या संपूर्ण समाजाच्या वतीने तुमच्या संघटनेने तीन वेळा केलेल्या मदतकार्याबद्दल आभार मानण्याचा सन्मान आम्हाला लाभला आहे . . . तुम्ही दिलेला कपडालत्ता १२,६५४ गरजू पुरुषांच्या, स्त्रियांच्या आणि मुलांच्या तसेच नवजात बालकांच्या उपयोगी पडला आहे . . . मुयोवोझी निर्वासितांच्या छावणीत सध्या ३७,००० रहिवासी आहेत. एकूण १२,६५४ लोकांना, किंवा ३४.२ टक्के निर्वासितांना मदत देण्यात आली.”

आणखी एका छावणीत, १२,३८२ निर्वासितांना प्रत्येकी तीन कपडे देण्यात आले, आणि दुसऱ्‍या एका छावणीला माध्यामिक आणि प्राथमिक शाळांकरता तसेच बालवाडीकरता हजारो शाळेची पुस्तके मिळाली. एका प्रदेशातील युएनएचसीआरच्या पुरवठा अधिकाऱ्‍याने एकदा म्हटले: “तुम्ही केलेल्या देणगीबद्दल तुमचे फार आभारी आहोत, [यामुळे] निर्वासितांच्या छावणीतील लोकांच्या पुष्कळ गरजा पूर्ण करता आल्या. सर्वात अलीकडे आम्हाला पुस्तकांचे ५ कंटेनर मिळाले आणि त्यांचे वाटप आमच्या समाज सेवा गटांनी निर्वासित लोकांमध्ये केले आहे. . . . तुमचे खरोखर आभारी आहोत.”

स्थानीय बातमीपत्रांनी देखील दिलेल्या साहाय्याविषयी टिप्पणी केली आहे. मे २०, २००१, संडे न्यूज यात ठळक बातमी अशी आली होती: “टान्झानियातील निर्वासितांकरता कपडे मार्गावर.” फेब्रुवारी १०, २००२ च्या त्याच्या अंकात म्हटले होते: “निर्वासितांच्या समाजाला या देणगीबद्दल कदर वाटते कारण कपडे नसल्यामुळे शाळेला जाऊ न शकणारी मुले आता नियमितपणे वर्गात येऊ लागली आहेत.”

कोंडमारा झाला तरी निराशा झाली नाही

पुष्कळशा निर्वासितांना छावणीतल्या नवीन जीवनाशी जुळवून घ्यायला कमीत कमी एक वर्ष तरी लागते. त्यांचे राहणीमान अगदी साधे असते. या छावणीतले यहोवाचे साक्षीदार, देवाच्या वचनातील अर्थात बायबलमधील सांत्वनदायी सुवार्ता आपल्या निर्वासित शेजाऱ्‍यांना सांगण्यात पुष्कळ वेळ खर्च करतात. ते एका नवीन जगाविषयी सांगतात ज्यामध्ये सर्वजण “आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” मग “सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही; कारण सेनाधीश परमेश्‍वराच्या तोंडची ही वाणी आहे.” स्पष्टतः, देवाच्या आशीर्वादाने त्या जगात निर्वासितांच्या छावण्या नसतील.—मीखा ४:३, ४; स्तोत्र ४६:९.

[८ पानांवरील चित्र]

 ड्यूटा छावणीतील घरे

[१० पानांवरील चित्रे]

लुकोल राज्य सभागृह (उजवीकडे) लुगुफू येथे बाप्तिस्मा (खाली)

[१० पानांवरील चित्र]

लुगुफू छावणीत प्रांतीय अधिवेशन