मुलांच्या हृदयाचा विकास आपोआप होण्याची अपेक्षा करू नका!
मुलांच्या हृदयाचा विकास आपोआप होण्याची अपेक्षा करू नका!
निपुण कुंभार मातीच्या निरुपयोगी गोळ्याला एका आकर्षक भांड्याचे रूप देऊ शकतो. फार कमी कारागीर असे आहेत, जे इतक्या क्षुल्लक साहित्यातून इतक्या उपयोगी वस्तू बनवतात. कपबशा, प्लेट्स, मडकी, बरण्या तसेच शोभिवंत फुलदाण्या यांसारख्या असंख्य वस्तूंकरता हजारो वर्षांपासून मानवसमाज कुंभारावर अवलंबून राहिला आहे.
आईवडील देखील आपल्या अपत्याच्या चारित्र्याला व व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याद्वारे समाजाकरता अतिशय महत्त्वाचे योगदान करतात. बायबलमध्ये आपल्या सर्वांची तुलना मातीशी करण्यात आली आहे आणि देवाने आईवडिलांवर त्यांच्या मुलांच्या रूपात असलेल्या ‘मातीच्या गोळ्याला’ आकार देण्याची जबाबदारी सोपवली आहे. (ईयोब ३३:६; उत्पत्ति १८:१९) मातीचे एखादे आकर्षक भांडे तयार करण्याप्रमाणे मुलाचे परिवर्तन एका जबाबदार व संतुलित प्रौढ व्यक्तीत करणे सोपे काम नाही. हे परिवर्तन आपोआप घडून येत नाही.
आपल्या मुलांच्या हृदयांना आकार देणारे बरेच शक्तिशाली प्रभाव आहेत. यांपैकी काही प्रभाव मुलांकरता विनाशकारी असू शकतात. म्हणूनच आपल्या मुलांच्या हृदयाचा विकास आपोआप होण्याची अपेक्षा करण्याऐवजी एक सुज्ञ माता किंवा पिता ‘मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला देईल,’ या आत्मविश्वासाने की “वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.”—नीतिसूत्रे २२:६.
मुलांचे संगोपन करत असतानाच्या अनेक रोमांचक व महत्त्वपूर्ण वर्षांदरम्यान, सुज्ञ ख्रिस्ती पालकांना आपल्या मुलांचे हृदय काबीज करू पाहणारे नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागेल. मुलांना “ख्रिस्ती संस्कारांनुसार असलेले शिक्षण व ताडन” देत असताना त्यांच्या प्रेमाची बऱ्याच वेळा परीक्षा पाहिली जाईल. (इफिसकर ६:४, द न्यू इंग्लिश बायबल) अर्थात, लवकरात लवकर सुरवात केल्यास आईवडिलांचे काम सोपे होईल.
लवकरात लवकर सुरवात
कुंभारांना सहसा अशा मातीपासून भांडी बनवण्यास आवडते, की जी सहज आकार देण्याइतकी मऊ आणि आकार दिल्यानंतर तो टिकवून ठेवण्याइतकी घट्ट असेल. मातीतून सर्व मळी काढल्यानंतर सहसा सहा महिन्यांच्या आत तिचा उपयोग करतात. त्याचप्रकारे, मुलांचे हृदय सर्वात ग्रहणशील आणि
सहज वळवण्याजोगे असते तेव्हाच आईवडिलांनी त्याला आकार देण्यास सुरवात केली पाहिजे.बाल तज्ज्ञ म्हणतात की आठ महिन्यांत बाळ आपल्या मातृभाषेतील शब्द ओळखायला शिकलेले असते; याच वयात त्याचे आपल्या आईवडिलांसोबत घनिष्ट नाते जुळलेले असते, त्याची इंद्रिये अधिक तल्लख झालेली असतात आणि ते आपल्या भोवतीच्या जगाचे हळूहळू परीक्षण करू लागलेले असते. मूल अद्याप लहान असतानाच त्याच्या हृदयाला आकार देण्यास सुरवात करणे सर्वात श्रेयस्कर ठरेल. तीमथ्याप्रमाणे, तुमच्या मुलालाही ‘बालपणापासूनच पवित्र शास्त्राची माहिती मिळाल्यास’ त्याला याचा किती फायदा होईल!—२ तीमथ्य ३:१५. *
बालके आपल्या आईवडिलांची नक्कल करतात. त्यांचे आवाज, हावभाव आणि हातवाऱ्यांची नक्कल करण्याव्यतिरिक्त प्रेम, दया आणि करुणा यांसारखे गुण आईवडिलांच्या वागणुकीत पाहिल्यावर मुलांना महत्त्वाचे धडे मिळतात. आपल्याला आपल्या मुलांना यहोवाच्या नियमांनुसार वळण लावायचे असल्यास देवाच्या आज्ञा प्रथम आपल्या हृदयात असल्या पाहिजेत. आईवडिलांना देवाच्या नियमांबद्दल खरोखरच मनापासून कदर वाटत असेल तर साहजिकच ते यहोवाबद्दल आणि त्याच्या वचनाबद्दल नियमितपणे आपल्या मुलांशी बोलण्यास प्रवृत्त होतील. बायबल पालकांना प्रोत्साहन देते, की त्यांनी याविषयी ‘घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता बोलावे.’ (अनुवाद ६:६, ७) फ्रॅन्थीस्को आणि रोझा आपल्या दोन मुलांच्या बाबतीत कशाप्रकारे या सल्ल्याचे पालन करतात याविषयी ते सांगतात. *
“दररोजच्या संभाषणाव्यतिरिक्त आम्ही दररोज कमीत कमी १५ मिनिटे आमच्या दोन्ही मुलांसोबत वैयक्तिकरित्या बोलण्याचा प्रयत्न करतो. काही समस्या असल्याचे लक्षात येताच आम्ही त्यांच्यासोबत यापेक्षा जास्त वेळ खर्च करतो आणि समस्या हमखास येतात. उदाहरणार्थ, अलीकडेच आमचा पाच वर्षांचा मुलगा शाळेतून परत आला आणि म्हणाला की माझा यहोवावर विश्वास नाही. त्याच्या वर्गातल्या एकाने त्याची टिंगल केली आणि कोणी देव नाही असे त्याला सांगितले होते असे आम्हाला कळाले.”
मुलांच्या मनात आपल्या निर्माणकर्त्याच्या अस्तित्वावर हळूहळू विश्वास उत्पन्न करावा लागेल याची या आईवडिलांना जाणीव झाली. हा विश्वास मुलांना देवाच्या निर्मितीकृत्यांविषयी वाटणाऱ्या स्वाभाविक कुतूहलाच्या आधारावर उत्पन्न करता येतो. मुलांना एखाद्या प्राण्याला स्पर्श करण्यास, फुले गोळा करण्यास किंवा समुद्रकिनाऱ्यावरील वाळुत खेळण्यास मनापासून आवडते! या निर्मितीकृत्यांचा संबंध निर्माणकर्त्या देवाशी जोडण्यास आईवडील मदत करू शकतात. (स्तोत्र १००:३; १०४:२४, २५) यहोवाच्या सृष्टीबद्दल मुलांच्या मनात निर्माण झालेला अचंबा आणि आदर आयुष्यभर त्यांच्या मनात राहील. (स्तोत्र १११:२, १०) या जाणीवेमुळे त्यांच्या मनात देवाला संतुष्ट करण्याची इच्छा आणि त्याच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्याची भीती निर्माण होईल. यामुळे त्यांना ‘दुष्कर्मांपासून दूर राहण्याची’ प्रेरणा मिळेल.—नीतिसूत्रे १६:६.
बहुतेक लहान मुले जिज्ञासू असतात आणि शिकवलेले चटकन आत्मसात करतात, तरीसुद्धा आईवडिलांच्या आज्ञेत राहण्याची त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती नसते. (स्तोत्र ५१:५) कधीकधी ते स्वतःच्याच मनाप्रमाणे वागण्याचा किंवा जे मागितले ते मिळवण्याचा हट्ट धरतात. हा मुलांचा स्थायीभाव बनू नये म्हणून आईवडिलांनी खंबीर भूमिका घेणे, सहनशीलतेने वागणे व शिस्तप्रिय असणे आवश्यक आहे. (इफिसकर ६:४) पाच मुलांचे यशस्वीपणे संगोपन करणाऱ्या फिलिस व पॉल यांचा हा अनुभव राहिला आहे.
फिलिस आठवणींना उजाळा देऊन म्हणते: “आमच्या प्रत्येक मुलाचे व्यक्तिमत्त्व वेगळे असले तरीसुद्धा प्रत्येकाचा आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा अट्टहास असायचा. आम्हाला फार कठीण गेले, पण शेवटी ‘नाही’ या शब्दाचा अर्थ त्यांना कळला.” तिचे पती पॉल सांगतात: “बऱ्याचदा, त्यांचे समजण्याइतके वय असल्यास आम्ही त्यांना आमच्या निर्णयांमागे
असलेली कारणे समजावून सांगायचो. आम्ही नेहमी त्यांच्याशी प्रेमळपणे वागायचा प्रयत्न करायचो, पण देवाने आम्हाला दिलेल्या अधिकाराचा आदर करायलाही आम्ही त्यांना शिकवले.”मुलांची सुरवातीची वर्षे कठीण असली तरीही बऱ्याच आईवडिलांच्या मते किशोरावस्थेची वर्षे सर्वात कठीण आव्हानासारखी असतात कारण या काळात मुलांच्या अपरिपक्व हृदयाला अनेक परीक्षांतून जावे लागते.
किशोवयीन मुलांच्या हृदयाचा ठाव घेणे
ओली माती सुकून जाण्याआधीच कुंभाराला आपले काम उरकावे लागते. माती लवकर सुकू नये व आकार देण्यास सोपे जावे म्हणून तो त्यात पाणी मिसळून, मऊ करून ठेवू शकतो. त्याचप्रकारे किशोरांचे मन कठीण होऊ नये म्हणून आईवडिलांनी मनापासून प्रयत्न केला पाहिजे. यासाठी मुख्य साधन म्हणून ते बायबलचा उपयोग करू शकतात व त्याच्याच साहाय्याने ते “दोष दाखविणे, सुधारणूक” आणि आपल्या मुलांना “प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज” करू शकतात.—२ तीमथ्य ३:१५-१७.
पण किशोरावस्थेत आल्यानंतर मुले लहानपणी जशी आईवडिलांचे निमूटपणे ऐकायची तशी कदाचित ऐकणार नाहीत. ती कदाचित आपल्या मित्रमैत्रिणींकडे अधिक लक्ष देऊ लागतील आणि त्यामुळे आईवडिलांसोबत ते तितक्या मोकळेपणाने आणि उत्सुकतेने संवाद करणार नाहीत. या काळात आईवडील व मुले एका नवीन टप्प्यातून जात असतात आणि त्यामुळे अधिक सहनशीलतेने आणि विचारीपणाने वागण्याची गरज असते. किशोरवयीन मुलांना आपल्या शरीरात व मानसिकतेत होत असलेल्या परिवर्तनांना जुळवून घ्यावे लागते. त्यांच्या उर्वरीत जीवनावर परिणाम करतील असे निर्णय घेण्यास व विशिष्ट ध्येये डोळ्यापुढे ठेवण्यास त्यांना सुरवात करायची असते. (२ तीमथ्य २:२२) शिवाय, जीवनाच्या या कठीण वळणावर त्यांना अशा एका प्रभावाला तोंड द्यावे लागते जो त्यांच्या हृदयावर विनाशकारी परिणाम करू शकतो—समवयस्कांचा दबाव.
हा दबाब कोणत्या एका विशिष्ट घटनेतून प्रकट होत नाही. तर मनोबल खचवणाऱ्या वाक्यांतून किंवा घटनांतून तो प्रकट होतो. तरुणांना सहसा इतर तरुणांकडून झिडकारले जाण्याची भीती असते आणि मित्रमैत्रिणींची टीकाटिप्पणी तरुणांच्या मनातल्या याच नाजूक भावनेवर हल्ला करते. आधीच आत्मविश्वासाची कमी आणि त्यात इतरांनी आपल्याला स्वीकारावे ही इच्छा यामुळे एक तरुण हळूहळू इतर तरुणांच्या सांगण्यावरून ‘जगातल्या गोष्टी’ पसंत करू लागण्याची शक्यता आहे.—१ योहान २:१५-१७; रोमकर १२:२.
वाईट गोष्टी करण्याच्या मित्रांच्या प्रोत्साहनाला जोड मिळते ती अपरिपूर्ण हृदयाच्या नैसर्गिक वासनांची आणि त्यामुळे समस्या अधिकच बिकट होते. ‘मौज करा, मनात येईल तसे वागा’ या आशयाचे उत्तेजन अतिशय मोहक वाटू लागते. मारिया नावाची एक तरुणी आपला अनुभव सांगते: “माझ्या वयाच्या काही किशोवयीन मुलामुलींचे असे मत होते की तारुण्याचा मनसोक्त आनंद घेण्याचा तरुणांना हक्क आहे; त्यांनी परिणामांची पर्वा करू नये. मी त्यांचे ऐकले. शाळेतले माझे मित्र जे करायचे ते मलाही करण्याची इच्छा असल्यामुळे मी अतिशय गंभीर समस्येत अडकणार होते, पण थोडक्यात
वाचले.” पालकांच्या भूमिकेतून तुम्हाला आपल्या मुलांना अशा दबावावर मात करण्यास मदत करण्याची इच्छा निश्चितच असेल, पण तुम्ही हे कसे करू शकता?तुमच्या शब्दांतून व कृतींतून मुलांना याची खात्री पटवून द्या की तुम्हाला खरोखर त्यांची काळजी आहे. त्यांच्या भावना जाणून घेण्याचा, त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा; तुमच्या शालेय जीवनात तुम्हाला तोंड द्याव्या लागलेल्या समस्यांपेक्षा त्यांच्या समस्या जास्त कठीण असू शकतात याची जाणीव बाळगा. ज्याच्याजवळ मन मोकळे करता येईल असा एक मित्र या दृष्टीने या काळात खासकरून तुमच्या मुलाला तुमच्याकडे पाहता आले पाहिजे. (नीतिसूत्रे २०:५) मुलांच्या हालचालींवरून किंवा त्यांच्या मनःस्थितीवरून तुम्हाला त्यांचे दुःख किंवा मनात चाललेली चलबिचल समजून येईल. त्यांचा हा मूक आक्रोश समजून घ्या व त्याला प्रतिसाद द्या; त्यांच्या ‘हृदयांचे सांत्वन करा.’—कलस्सैकर २:२, पं.र.भा.
अर्थात, जे योग्य आहे त्याबद्दल खंबीर भूमिका घेणेही महत्त्वाचे आहे. बऱ्याच आईवडिलांचा असा अनुभव आहे की कधीकधी त्यांच्या व मुलांच्या मतांचा संघर्ष होतो पण आपल्या निर्णयामागे सबळ कारणे आहेत याची खात्री असल्यास त्यांना पडती बाजू घेण्याची गरज नाही. प्रेमळपणे ताडन देण्याची गरज पडल्यास आधी पूर्ण परिस्थिती नीट समजून घ्या आणि मगच हे ताडन देण्याची खरोखरच गरज आहे का आणि ते कशाप्रकारे द्यावे हे ठरवा.—नीतिसूत्रे १८:१३.
मंडळीच्या आतूनसुद्धा
मातीचे भांडे तयार झाले आहे असे आपल्याला वाटत असले तरीसुद्धा, ते भट्टीत भाजले गेले नाही तर जी द्रव्ये त्यात ठेवायची आहेत त्यांनीच ते नष्ट होऊ शकते. जीवनात येणाऱ्या परीक्षा व अडचणींची तुलना बायबलमध्ये अशा या भाजण्याच्या क्रियेशी करण्यात आली आहे; कारण आपण मुळात कशाप्रकारच्या व्यक्ती आहोत हे या परीक्षांतून दिसून येते. अर्थात, बायबलमध्ये सांगितलेल्या परीक्षा खासकरून आपल्या विश्वासासंबंधीच्या आहेत; पण तरीसुद्धा तोच मुद्दा इतर परीक्षांच्या बाबतीतही लागू होतो. (याकोब १:२-४) आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरुणांसमोर येणाऱ्या काही बिकट परीक्षा खुद्द मंडळीच्या आतूनही येऊ शकतात.
तुमच्या किशोरवयीन मुलाचे आध्यात्मिक आरोग्य उत्तम आहे असे वरवर भासत असले तरीसुद्धा मनातल्या मनात कदाचित तो दुविधेत पडला असेल. (१ राजे १८:२१) उदाहरणार्थ, मेगन नावाच्या एका मुलीवर राज्य सभागृहात येणाऱ्या इतर तरुणांकडून जगिक विचारांचा प्रभाव पडू लागला होता:
“मी अशा तरुण मुलामुलींच्या प्रभावाखाली आले, ज्यांच्या नजरेत ख्रिस्ती जीवन कंटाळवाणे आणि मौजमजेसाठी अडखळण होते. ते आपले विचार बोलूनही दाखवायचे. ‘मी १८ वर्षांचा होताच सत्य सोडेन’ किंवा ‘कधी एकदाचा बाहेर पडतो असे झाले आहे,’ अशा प्रकारच्या गोष्टी ते बोलायचे. त्यांच्याशी सहमत न होणाऱ्या तरुणांना ते टाळायचे आणि हे फारच पवित्र आहेत म्हणून त्यांना टोमणे मारायचे.
अशाप्रकारची वाईट मनोवृत्ती असलेले केवळ एक किंवा दोन तरुण इतर सर्वांना बिघडवण्यास पुरेसे आहेत. कोणत्याही गटातले सदस्य सहसा बहुतेकजण जे करतील तेच करतात. मूर्खपणा व फाजील धैर्यामुळे सुज्ञता व सभ्यता यांकडे डोळेझाक केली जाते. बऱ्याच देशांत, ख्रिस्ती युवकांनी चारचौघांच्या मागे जाऊन स्वतःवर संकट ओढवल्याच्या खेदजनक घटना घडल्या आहेत.
रोमकर १२:१३) आपल्या मुलांना काहीतरी उपयोगी छंद जोपासण्याचे प्रोत्साहन द्या, उदाहरणार्थ, एखादे वाद्य वाजवायला शिकणे किंवा एखादी नवीन भाषा किंवा कला आत्मसात करणे. सहसा या गोष्टी ते घरातल्या सुरक्षित वातावरणात करू शकतात.
अर्थात, किशोरवयीन मुलामुलींना आनंददायक संगतीची गरज आहे. पालकांच्या भूमिकेतून त्यांची ही गरज तुम्ही कशी भागवू शकता? त्यांच्या करमणुकीविषयी गांभिर्याने विचार करा आणि कुटुंबासोबत किंवा तरुण व प्रौढ अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींसोबत त्यांना खरोखर आनंददायक वाटतील असे करमणुकीचे बेत करा. तुमच्या मुलांच्या मित्रमैत्रिणींशी ओळख करून घ्या. त्यांना घरी जेवायला बोलवा किंवा त्यांच्यासोबत एखादी संध्याकाळ घालवा. (शिक्षण संरक्षण ठरू शकते
किशोरांचे शिक्षण देखील करमणुकीविषयी संतुलित राहण्यास त्यांना मदत करू शकते. एका मोठ्या शाळेत २० वर्षे प्रशासकीय पदावर राहिलेल्या लोली सांगतात: “मी कित्येक साक्षीदार मुलामुलींचे त्यांच्या शालेय जीवनात निरीक्षण केले आहे. यांपैकी बऱ्याच मुलांचे आचरण कौतुकास्पद होते, पण काही साक्षीदार मुले शाळेतल्या इतर विद्यार्थ्यांपेक्षा फार वेगळी नव्हती. चांगली मुले सहसा आपल्या अभ्यासात मनापासून रस घ्यायची. मी तर नेहमी आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी मनापासून आस्था बाळगण्याचा, त्यांच्या शिक्षकांशी ओळख करून घेण्याचा आणि चांगले गुण मिळवणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या मुलांना पटवून देण्याचा सल्ला द्यायचे. अर्थात सगळीच मुले पहिला नंबर आणणार नाहीत, पण सर्वजण समाधानकारक पातळीपर्यंत यश आणि आपल्या शिक्षकांचा आदर निश्चितच कमवू शकतात.”
शिक्षणामुळे किशोरवयीन मुलांना आध्यात्मिक प्रगती करण्यासही मदत मिळते. शिक्षणामुळेच त्यांना अभ्यासाच्या चांगल्या सवयी लागतात, मानसिक अनुशासन आणि जबाबदारीची जाणीव येते. नीट वाचण्याची व विचार समजून घेण्याची कुवत असल्यामुळे त्यांना देवाच्या वचनाचे चांगले विद्यार्थी व शिक्षक होण्याचेही अवश्य प्रोत्साहन मिळेल. (नहेम्या ८:८) शाळेतील गृहपाठ आणि आध्यात्मिक अभ्यास यामुळे आपोआपच करमणुकीला योग्य स्थान देण्यास त्यांना मदत मिळेल.
तुम्हाला व यहोवाला भूषण
प्राचीन ग्रीसमध्ये अनेक फुलदाण्यांवर घडवणाऱ्याची व सजवणाऱ्याचीही सही असे. त्याचप्रकारे कुटुंबातही मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात दोन जणांचा सहभाग असतो. मुलांच्या अंतःकरणाला घडवण्यात आई व वडील या दोघांचे योगदान असते आणि त्याअर्थी तुमच्या मुलांवर लाक्षणिकरित्या तुम्हा दोघांची “सही” असते. एका यशस्वी कुंभाराप्रमाणे आणि/किंवा सजवणाऱ्याप्रमाणे तुम्ही एका कर्तुत्ववान व सुशील व्यक्तीला घडवण्यात लावलेल्या हातभाराचा अभिमान बाळगू शकता.—नीतिसूत्रे २३:२४, २५.
या उदात्त कार्यात मिळणारे यश तुम्ही आपल्या मुलांच्या हृदयाला कितपत आकार देऊ शकला यावर अवलंबून आहे. कदाचित तुम्हालाही त्यांच्याविषयी खात्रीने असे म्हणता येईल: ‘त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात आहे; त्याचे पाय घसणार नाहीत.’ (स्तोत्र ३७:३१) मुलांच्या अंतःकरणाला आकार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ते आपोआप घडण्याची अपेक्षा कधीही करू नका.
[तळटीपा]
^ परि. 8 काही आईवडील आपल्या नवजात बालकाला बायबल वाचून दाखवतात. आईवडिलांचा प्रेमळ आवाज आणि हा आनंददायक अनुभव, मुलांच्या मनात वाचनाची आवड निर्माण करू शकतो जो कदाचित आयुष्यभर टिकेल.
^ परि. 9 काही नावे बदलण्यात आली आहेत.