आपल्या अगदी मनापासून यहोवावर भाव ठेवा
आपल्या अगदी मनापासून यहोवावर भाव ठेवा
“ज्यांस तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवितील.”—स्तोत्र ९:१०.
१, २. सुरक्षिततेकरता लोक कोणत्या काही गोष्टींवर व्यर्थ भरवसा ठेवतात?
आजच्या काळात, आनंदी जीवनाला उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या अनेक गोष्टी असल्यामुळे सुरक्षितता देऊ शकेल अशा कोणत्या व्यक्तीकडे किंवा गोष्टीकडे अपेक्षेने पाहणे साहजिक आहे. काही लोकांना वाटते की माणसाजवळ बक्कळ पैसा असेल तर भविष्याची चिंता करण्याची गरज नाही, पण वास्तविकतेत पैसा अत्यंत चंचल स्वरूपाची सुरक्षा देतो. बायबल म्हणते: “जो आपल्या धनावर भरवसा ठेवितो तो पडेल.” (नीतिसूत्रे ११:२८) इतरजण मानवी नेत्यांकडे आशेने पाहतात पण चांगल्यातला चांगला नेता देखील चुका करतोच. आणि आज न उद्या ते मरतात. म्हणूनच बायबलमध्ये हा सुज्ञ सल्ला देण्यात आला आहे की “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.” (स्तोत्र १४६:३) हे प्रेरित शब्द आपल्याला स्वतःच्या स्वतंत्र प्रयत्नांवरही भरवसा ठेवण्याविरुद्ध ताकीद देतात. शेवटी आपण देखील केवळ ‘मनुष्य’ आहोत.
२ यशया संदेष्ट्याने त्याच्या काळातल्या इस्राएल राष्ट्राच्या नेत्यांना दोषी ठरवले कारण त्यांनी “लबाडीचा आश्रय” घेतला होता. (यशया २८:१५-१७) सुरक्षितता शोधताना त्यांनी आसपासच्या राष्ट्रांशी मैत्री केली. ही मैत्री भरवसालायक नव्हती—लबाडी होती. त्याचप्रकारे, आज बरेच धार्मिक नेते राजकीय पुढाऱ्यांशी सलगी करतात. ही सलगी देखील एक ‘लबाडीच’ असल्याचे शाबीत होईल. (प्रकटीकरण १७:१६, १७) ते कायमची सुरक्षितता मिळवून देणार नाहीत.
यहोशवा व कालेब यांची उत्तम उदाहरणे
३, ४. यहोशवा व कालेब व इतर दहा हेरांनी प्रतिज्ञात देशातून परतल्यानंतर कोणते वेगवेगळे वृत्त दिले?
३ मग आपण सुरक्षिततेकरता कोणाकडे पाहावे? मोशेच्या काळात यहोशवा व कालेब यांनी ज्याच्याकडे पाहिले त्याच्याचकडे. इस्राएलची ईजिप्तमधून सुटका झाल्यानंतर हे गणना १३:२७, २८, ३१.
राष्ट्र प्रतिज्ञात देशात अर्थात कनानमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते. बारा हेरांना या देशाविषयी माहिती काढण्याकरता पाठवण्यात आले आणि चाळीस दिवसांनंतर ते आपापला निवाडा देण्यास परतले. केवळ दोन हेरांनी म्हणजे यहोशवा व कालेब यांनीच कनान देशांत इस्राएल यशस्वीरित्या प्रवेश करील असा विश्वास व्यक्त केला. बाकीच्या हेरांनी तो देश चांगला असल्याचे सांगितले खरे पण त्यांनी असेही म्हटले: “त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत. . . . त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपणाहून बलाढ्य आहेत.”—४ इस्राएलांनी दहा हेरांवर विश्वास ठेवला आणि ते भयभीत झाले, इतकेच काय तर ते मोशेविरुद्ध कुरकूर करू लागले. शेवटी यहोशवा व कालेब यांनी त्यांना कळकळीने विनवले: “चहूकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे. परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला देईल. तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका. आणि त्या देशाच्या लोकांची भीति बाळगू नका कारण ते आमचे भक्ष्य होतील; त्यांचा आधार तुटला आहे पण आमच्याबरोबर परमेश्वर आहे; त्यांची भीति बाळगू नका.” (गणना १४:६-९) तरीपण इस्राएल लोकांनी त्यांचे ऐकले नाही आणि यामुळे त्यांना त्या वेळी प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्यास अनुमती देण्यात आली नाही.
५. यहोशवा व कालेब यांनी अनुकूल वृत्त का दिले?
५ दहा हेरांनी वाईट बातमी दिली तरीसुद्धा, यहोशवा व कालेब यांनी प्रतिज्ञात देशाबद्दल उत्तम बातमी का दिली? बाराही जणांनी तीच शक्तिशाली नगरे आणि बलाढ्य राष्ट्रे पाहिली होती. आणि इस्राएल त्या देशावर स्वारी करण्यास समर्थ नाही असे जे दहा हेरांनी म्हटले तेही खरे होते. यहोशवा व कालेब यांनाही हे माहीत होते. पण दहा हेरांनी मानवी दृष्टीकोनातून परिस्थितीकडे पाहिले. परंतु दुसरीकडे पाहता यहोशवा व कालेब यांनी यहोवावर भरवसा ठेवला. त्यांनी ईजिप्तमध्ये, तांबड्या समुद्राजवळ आणि सिनाय पर्वताच्या पायथ्याशी यहोवाची महत्कृत्ये पाहिली होती. कित्येक दशकांनंतर या महत्कृत्यांविषयी केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर यरीहो देशात राहणाऱ्या राहाबने यहोवाच्या लोकांकरता आपला जीव धोक्यात घातला होता! (यहोशवा २:१-२४; ६:२२-२५) यहोशवा व कालेब यहोवाच्या या महत्कृत्यांचे प्रत्यक्ष साक्षीदार होते आणि त्यांना पूर्ण विश्वास होता की देव पुढेही त्याच्या लोकांच्या बाजूने लढेल. चाळीस वर्षांनंतर, इस्राएल लोकांची एक नवी पिढी यहोशवाच्या नेतृत्वाखाली कनान देशात चालून गेली आणि त्यांनी त्या राष्ट्राला काबीज केले तेव्हा त्यांचा हा विश्वास खरा असल्याचे शाबीत झाले.
आपण यहोवावर संपूर्ण भरवसा का ठेवावा
६. आज ख्रिस्ती लोकांवर दबाव का येत आहेत आणि त्यांनी कोणावर भरवसा ठेवावा?
६ या ‘कठीण दिवसांत’ इस्राएल लोकांप्रमाणे आपल्यालाही आपल्यापेक्षा शक्तिशाली असलेल्या शत्रूंना तोंड द्यावे लागते. (२ तीमथ्य ३:१) आपल्यावर नैतिक, आध्यात्मिक आणि कधीकधी तर शारीरिक दृष्ट्याही दबाव येतो. स्वतःहून आपण या दबावांना तोंड देऊ शकत नाही कारण ते मुळात मानवांपेक्षा श्रेष्ठ अशा व्यक्तीकडून अर्थात दियाबल सैतानाकडून येतात. (इफिसकर ६:१२; १ योहान ५:१९) मग आपल्याला कोठून मदत मिळू शकते? पुरातन काळात एका विश्वासू पुरुषाने यहोवाला अशी प्रार्थना केली: “ज्यांस तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवितील.” (स्तोत्र ९:१०) आपल्याला खरोखर यहोवाची ओळख झाली असल्यास आणि त्याच्या नावाची अर्थसूचकता आपल्याला खरोखर कळली असल्यास आपण यहोशवा व कालेबप्रमाणेच त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवू शकू.—योहान १७:३.
७, ८. (अ) सृष्टी आपल्याला यहोवावर भरवसा ठेवण्याची कशाप्रकारे प्रेरणा देते? (ब) यहोवावर भरवसा ठेवण्याकरता बायबल आपल्याला कोणती कारणे देते?
७ आपण यहोवावर भरवसा का ठेवला पाहिजे? यहोशवा व कालेबने यहोवाच्या सामर्थ्याचे प्रदर्शन प्रत्यक्ष पाहिले असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवला. आपणही यहोवाच्या सामर्थ्याचे प्रदर्शन प्रत्यक्ष पाहिले आहे. उदाहरणार्थ, यहोवाच्या निर्मितीकृत्यांचा विचार करा, ज्यात हे विश्व आणि त्यातील अब्जावधी नक्षत्रे सामील आहेत. यहोवाच्या नियंत्रणात असलेल्या भौतिक शक्ती दाखवून देतात की तो खरोखर सर्वशक्तिमान आहे. सृष्टीतील अद्भुत गोष्टींबद्दल मनन केल्यावर आपल्याला ईयोबाच्या पुढील शब्दांशी सहमत व्हावेच लागते: “त्याचा हात कोण धरील? तू हे काय करितोस, असे त्याला कोण म्हणणार?” (ईयोब ९:१२) खरे पाहता, जर यहोवा आपल्या बाजूने आहे तर आपल्याला सबंध विश्वात कोणाचीही भीती वाटण्याचे कारण नाही.—रोमकर ८:३१.
इब्री लोकांस ४:१२) बायबलच्या माध्यमातूनच आपल्याला यहोवाची त्याच्या नावाने ओळख घडली आहे आणि त्याच्या नावाची अर्थसूचकता समजून आली आहे. (निर्गम ३:१४) आपल्याला माहीत झाले आहे की यहोवा आपल्या उद्देशांची पूर्ती करण्याकरता त्याला वाटेल ती भूमिका घेऊ शकतो, कधी प्रेमळ पित्याची, कधी नीतिप्रिय न्यायाधीशाची तर कधी एका विजयी लढवैय्याची. आणि त्याचे वचन कशाप्रकारे नेहमी खरे ठरते याचाही आपल्याला प्रत्यय आला आहे. आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करतो तेव्हा स्तोत्रकर्त्याप्रमाणे, “तुझ्या वचनावर माझा भरवसा आहे,” असे आपल्यालाही म्हणण्याची प्रेरणा मिळते.—स्तोत्र ११९:४२; यशया ४०:८.
८ यहोवाचे वचन बायबल याचाही विचार करा. देवाच्या बुद्धीचा हा अथांग स्रोत अत्यंत शक्तिशाली आहे आणि तो आपल्याला वाईट चालीरिती सोडून यहोवाच्या इच्छेनुसार आपल्या जीवनात बदल करण्यास मदत करतो. (९. खंडणीची तरतूद आणि येशूचे पुनरुत्थान यहोवावर असलेला आपला भरवसा कशाप्रकारे अधिक पक्का करतात?
९ यहोवावर भरवसा ठेवण्याचे आणखी एक कारण म्हणजे खंडणीची तरतूद. (मत्तय २०:२८) आपल्याकरता खंडणी देण्यासाठी स्वतःचा जीव अर्पण करण्याकरता देवाने आपल्या प्रिय पुत्राला पाठवले हे किती अद्भुत आहे! आणि त्याने पुरवलेली खंडणी खरोखर सामर्थ्यशाली आहे. या खंडणीमार्फत, पश्चात्ताप करून प्रामाणिक अंतःकरणाने यहोवाकडे वळणाऱ्या सर्व मानवांना त्यांच्या पापांची क्षमा मिळू शकते. (योहान ३:१६; इब्री लोकांस ६:१०; १ योहान ४:१६, १९) येशूचे पुनरुत्थान देखील खंडणी पुरवण्याच्या तरतुदीत सामील आहे. हा चमत्कार घडल्याचे शेकडो प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पाहिले आणि हे यहोवावर भरवसा ठेवण्याचे आणखी एक कारण आहे. याद्वारे आपल्याला खात्री मिळते की आपल्या आशा देखील व्यर्थ ठरणार नाहीत.—प्रेषितांची कृत्ये १७:३१; रोमकर ५:५; १ करिंथकर १५:३-८.
१०. यहोवावर भरवसा ठेवण्याची कोणती वैयक्तिक कारणे आपल्याकडे आहेत?
१० यहोवावर आपण पूर्ण भरवसा का ठेवू शकतो आणि का ठेवला पाहिजे, हे दाखवणारी ही केवळ काही कारणे आहेत. यांव्यतिरिक्तही अनेक कारणे आहेत, ज्यांपैकी काही वैयक्तिक स्वरूपाची आहेत. उदाहरणार्थ, आपल्या सर्वांच्या जीवनात अधूनमधून काही कठीण प्रसंग येतात. या प्रसंगांना तोंड देत असताना आपण यहोवाला मार्गदर्शनाकरता प्रार्थना करतो आणि त्याचे मार्गदर्शन किती उपयोगी आहे याची आपल्याला प्रचिती येते. (याकोब १:५-८) आपल्या दैनंदिन जीवनात आपण यहोवावर जितके अधिक विसंबून राहू आणि असे केल्यामुळे होणारे चांगले परिणाम पाहू तितका आपला त्याच्यावर असलेला भरवसा वाढतच जाईल.
दाविदाने यहोवावर भरवसा ठेवला
११. कोणत्या परिस्थितीतही दाविदाने यहोवावर भरवसा ठेवला?
११ यहोवावर भरवसा ठेवणारा प्राचीन इस्राएलातला एक पुरुष म्हणजे दावीद. दाविदाच्या डोक्यावर सतत टांगती तलवार होती; कारण एकतर राजा शौल त्याच्या जिवावर उठला होता शिवाय, पलिष्टी लोकांचे शक्तिशाली सैन्य इस्राएलवर विजय मिळवू पाहात होते. तरीसुद्धा दावीद बचावला आणि विजयी ठरला. का? तो स्वतः याचे उत्तर देतो: “परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी कोणाची भीति बाळगू? परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू?” स्तोत्र २७:१) आपणही दाविदासारखाच यहोवावर भरवसा ठेवला तर यशस्वी होऊ शकतो.
(१२, १३. आपले विरोधी त्यांच्या जिभेचा आपल्याविरुद्ध शस्त्रांप्रमाणे वापर करतात तरीसुद्धा आपण यहोवावर भरवसा ठेवला पाहिजे हे दाविदाने कशाप्रकारे दाखवले?
१२ एकदा दाविदाने प्रार्थना केली: “हे देवा, माझी काकुळतीची वाणी ऐक; वैऱ्याच्या भयापासून माझ्या जिवाचे रक्षण कर. दुष्टांच्या कटापासून, दुष्कर्म्यांच्या गुप्त मसलतीपासून मला लपीव. त्यांनी आपली जीभ तरवारीसारखी पाजळली आहे; सात्विकाला एकांतात मारावे म्हणून त्यांनी तीरासारखा आपल्या कटु शब्दांचा नेम धरिला आहे. ते त्याच्यावर अकस्मात मारा करितात; ते भीत नाहीत.” (स्तोत्र ६४:१-४) हे शब्द लिहिण्यास दावीद का प्रवृत्त झाला हे निश्चित सांगता येत नाही. पण आजही देवाच्या सेवकांचे विरोधी ‘आपली जीभ तारवारीसारखी पाजळतात,’ म्हणजेच, आपल्या जिभेचा एखाद्या शस्त्राप्रमाणे उपयोग करतात. मौखिक किंवा लिखित स्वरूपात खोट्या माहितीच्या ‘तीरांचा’ ते निर्दोष ख्रिश्चनांवर मारा करतात. आपण यहोवावर अटळ भरवसा ठेवल्यास याचा काय परिणाम होईल?
१३ दावीद पुढे म्हणतो: “देव त्यांच्यावर तीर सोडील; ते अकस्मात घायाळ होतील. त्यांचीच जीभ त्यांस प्रतिकूल होऊन ते अडखळून पडतील. . . . परमेश्वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल व त्याचा आश्रय करील.” (स्तोत्र ६४:७-१०) होय, शत्रू त्यांच्या जिभेचा धारदार तरवारीप्रमाणे आपल्या विरुद्ध वापर करत असले तरीसुद्धा, ‘त्यांचीच जीभ त्यांस प्रतिकूल होईल.’ काळाच्या ओघात यहोवा घटनांना अशाप्रकारे वळण देतो की त्याच्यावर भरवसा ठेवणारे हर्ष पावतील.
हिज्कीयाचा भरवसा सार्थक ठरला
१४. (अ) कोणत्या आणीबाणीच्या परिस्थितीत हिज्कीयाने यहोवावर भरवसा ठेवला? (ब) अश्शुरी राजा सन्हेरीबच्या खोट्या प्रचारावर आपला विश्वास नाही हे हिज्कीयाने कशाप्रकारे दाखवले?
१४ दाविदाप्रमाणेच राजा हिज्कीयाचा यहोवावरील भरवसा देखील सार्थक ठरला. हिज्कीयाच्या राज्यादरम्यान शक्तिशाली अश्शुरी सैन्याने जेरूसलेमवर हल्ला केला. या सैन्याने इतर अनेक देशांना नेस्तनाबूत केले होते. यहुदाच्याही कित्येक शहरांना अश्शुरी सैन्याने पराजित केले होते आणि आता केवळ जेरूसलेम शहर स्वतंत्र होते; सन्हेरीब गर्विष्ठपणे दावा करत होता की या शहरालाही तो सोडणार नाही. रब-शाकेला पाठवून सन्हेरीबने असे सांगितले की ईजिप्तच्या मदतीवर विसंबून राहण्याचा काही उपयोग होणार नाही. आणि हे खरे होते. पण मग त्याने म्हटले: “ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवितोस तो, यरुशलेम अश्शुरी राजाच्या हाती लागणार नाही, असे बोलून तुला न फसवो.” (यशया ३७:१०) पण यहोवा आपल्याला फसवणार नाही हे हिज्कीयाला चांगले ठाऊक होते. म्हणून त्याने अशी प्रार्थना केली: “परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हाला सोडीव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राज्ये जाणतील की तूच काय तो परमेश्वर आहेस.” (यशया ३७:२०) यहोवाने हिज्कीयाची प्रार्थना ऐकली. एका रात्रीत एका देवदूताने १,८५,००० अश्शुरी सैनिकांना ठार मारले. जेरूसलेमवरील संकट टळले आणि सन्हेरीबने यहूदाच्या भूमीवर पुन्हा पाऊल ठेवले नाही. या घटनेविषयी ज्यांनी ऐकले होते त्यांना यहोवाची महती कळली.
१५. या अस्थिर जगात, आपल्यासमोर येणाऱ्या कोणत्याही कठीण परिस्थितीकरता स्वतःला तयार करण्यासाठी कोणती एकच गोष्ट आपल्याला मदत करेल?
१५ आज, हिज्कीयाप्रमाणे आपणही एका युद्धसदृश्य परिस्थितीत इफिसकर ६:११, १२, १७) या अस्थिर जगात परिस्थिती रातोरात बदलू शकते. अनपेक्षितपणे देशांतर्गत दंगली उसळू शकतात. धार्मिक सहिष्णुतेबद्दल नावाजलेले देश अचानक असहिष्णू होऊ शकतात. जर आपण हिज्कीयाप्रमाणे यहोवावर अटळ भरवसा संपादन केला तरच आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याकरता तयार राहू शकतो.
आहोत. आपले हे युद्ध आत्मिक आहे. पण आत्मिक योद्धे या नात्याने, आपण स्वतःचा बचाव करण्यास शिकले पाहिजे. कोणत्या प्रकारचे हल्ले होऊ शकतात याचा आधीच विचार करून त्यांना तोंड देण्याची तयारी आपण केली पाहिजे. (यहोवावर भरवसा ठेवणे म्हणजे काय?
१६, १७. आपला यहोवावर भरवसा आहे हे आपण कसे दाखवतो?
१६ यहोवावर भरवसा ठेवणे ही केवळ बोलून दाखवण्याची गोष्ट नाही. यात आपल्या हृदयातील भावनांचा समावेश आहे आणि हा भरवसा आपल्या कृतींतून दिसून येतो. आपला यहोवावर भरवसा असेल तर आपण त्याच्या वचनावर अर्थात बायबलवर पूर्ण भरवसा ठेवू. आपण दररोज ते वाचू, त्यावर मनन करू आणि त्याला आपल्या जीवनाचा मार्गदर्शक बनवू. (स्तोत्र ११९:१०५) यहोवावर भरवसा ठेवण्यात पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवणे देखील समाविष्ट आहे. पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण यहोवाला संतोषदायक वाटणारे फळ उत्पन्न करू शकतो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वात खोलवर रुजलेल्या वाईट सवयी सोडू शकतो. (१ करिंथकर ६:११; गलतीकर ५:२२-२४) अशारितीने, पवित्र आत्म्याच्या मदतीने बऱ्याच जणांनी धूम्रपान किंवा ड्रग्ससारख्या वाईट सवयी सोडून दिल्या आहेत. इतरांनी अनैतिक जीवन शैलीचा त्याग केला आहे. होय, आपण यहोवावर भरवसा ठेवला तर आपण स्वतःच्या नव्हे तर त्याच्या सामर्थ्यावर विसंबून कार्य करू.—इफिसकर ३:१४-१८.
१७ शिवाय, यहोवावर भरवसा ठेवण्याचा अर्थ त्याला ज्यांच्यावर भरवसा आहे त्यांच्यावर भरवसा ठेवणे. उदाहरणार्थ, आपल्या राज्यासंबंधीच्या पृथ्वीवरील कार्यांची देखरेख करण्यासाठी यहोवाने “विश्वासू व बुद्धिमान दासाला” नेमले आहे. (मत्तय २४:४५-४७) आपण कधीही स्वतंत्रपणे कार्य करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा यहोवाने नेमलेल्या या दासाकडे दुर्लक्ष करत नाही कारण ही यहोवाने केलेली व्यवस्था आहे यावर आपला भरवसा आहे. तसेच, स्थानिक ख्रिस्ती मंडळीत वडील सेवा करतात आणि प्रेषित पौलाने सांगितल्याप्रमाणे यांना पवित्र आत्म्याने नेमले आहे. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) मंडळीतील वडिलांच्या व्यवस्थेला सहकार्य देण्याद्वारेही आपण यहोवावर आपला भरवसा असल्याचे दाखवतो.—इब्री लोकांस १३:१७.
पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण करा
१८. आज ख्रिस्ती लोक पौलाच्या उदाहरणाचे कशाप्रकारे अनुकरण करतात, पण ते कशावर भरवसा ठेवत नाहीत?
१८ आपल्याप्रमाणेच प्रेषित पौलाला देखील त्याच्या सेवाकार्यात अनेक दबावांना तोंड द्यावे लागले. त्याच्या काळात ख्रिस्ती धर्माविषयी सरकारी अधिकाऱ्यांना खोटी माहिती देण्यात आली होती आणि कधीकधी पौल हे गैरसमज दूर करण्याचा किंवा प्रचार कार्याला कायदेशीररित्या स्थापित करण्याचा प्रयत्न करत असे. (प्रेषितांची कृत्ये २८:१९-२२; फिलिप्पैकर १:७) आज ख्रिस्ती लोक देखील त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करतात. शक्यतो, आपण इतरांना आपल्या कार्याबद्दल सुस्पष्ट माहिती देतो आणि यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमांचा उपयोग करतो. तसेच सुवार्तेचे कायदेशीर समर्थन करण्यासाठीही आपण आवश्यक पावले उचलतो. पण आपण स्वतःच्याच या प्रयत्नांवर पूर्ण भरवसा ठेवत नाही, कारण केवळ न्यायालयांत विजय मिळवण्यावर किंवा अनुकूल प्रसिद्धी मिळण्यावर आपले यश अथवा अपयश अवलंबून आहे असे आपण मानत नाही. उलट आपण यहोवावर विश्वास ठेवतो. प्राचीन इस्राएलला त्याने दिलेले प्रोत्साहन आपण नेहमी आठवणीत ठेवतो: “स्वस्थता व भरवसा यांत तुमचे सामर्थ्य होईल.”—यशया ३०:१५, पं.र.भा.
१९. छळ सोसावा लागला तरीसुद्धा आपल्या बांधवांनी यहोवावर ठेवलेला भरवसा कशाप्रकारे सार्थक ठरला आहे?
१९ या आधुनिक इतिहासात पूर्व व पश्चिम युरोपात, आशियाच्या व आफ्रिकेच्या काही भागांत तसेच दक्षिण व उत्तर अमेरिकेच्या काही देशांत आपल्या कार्यावर प्रतिबंध घालण्यात आला किंवा त्यावर काही बंधने घालण्यात आली. याचा अर्थ आपण यहोवावर ठेवलेला भरवसा व्यर्थ ठरला असे म्हणता येईल का? नाही. कधीकधी त्याने आपल्या उद्देशाच्या पूर्तीकरता, आपल्या लोकांचा भयंकर छळ होऊ दिला तरीसुद्धा हा छळ सोसणाऱ्यांना यहोवाने प्रेमळपणे बळ दिले. छळ सोसावा लागला तरीसुद्धा बऱ्याच ख्रिश्चनांनी देवावर अतूट विश्वास व भरवसा असण्याबद्दल नाव कमावले आहे.
२०. कायदेशीर स्वातंत्र्यामुळे आपल्याला फायदा होत असला तरीसुद्धा कोणत्या बाबतीत आपण कधीही हातमिळवणी करणार नाही?
दानीएल २:४४; इब्री लोकांस १२:२८; प्रकटीकरण ६:२.
२० दुसरीकडे पाहता, बऱ्याच देशांत आपल्याला कायदेशीर मान्यता आहे आणि कधीकधी प्रसिद्धी माध्यमांतून आपल्याविषयी अनुकूल माहिती प्रकाशित केली जाते. याकरता आपण कृतज्ञ आहोत आणि हे देखील यहोवाच्या उद्देशाच्या पूर्तीला हातभार लावते याची आपल्याला जाणीव आहे. आपल्याला प्राप्त असलेल्या स्वातंत्र्याचा स्वतःची वैयक्तिक जीवनशैली सुधारण्याकरता नव्हे तर यहोवाची जाहीररित्या आणि अधिक पूर्णतः सेवा करण्याकरता आपण उपयोग करतो. पण केवळ अधिकाऱ्यांची मर्जी संपादन करण्याकरता आपण कधीही आपल्या तटस्थतेविषयी हातमिळवणी करणार नाही, आपले प्रचार कार्य कमी करणार नाही किंवा इतर कोणत्याही प्रकारे यहोवाच्या सेवेत मंदावणार नाही. आपण मशीहाच्या राज्याचे प्रजाजन आहोत आणि यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या बाजूने आपण खंबीर भूमिका घेतली आहे. आपली आशा या व्यवस्थीकरणावर नसून नव्या जगावर जेथे स्वर्गीय मशीही राज्य या पृथ्वीवर शासन करणारे एकमेव सरकार असेल. बॉम्ब, तोफा इतकेच काय तर आण्विक हल्लेसुद्धा या सरकारचे काहीही नुकसान करू शकत नाही किंवा स्वर्गातून त्याला पाडू शकत नाहीत. हे सरकार अजिंक्य आहे आणि ते यहोवाचे उद्देश पूर्ण करेल.—२१. कोणत्या मार्गावर चालत राहण्याचा आपला निर्धार आहे?
२१ पौल म्हणतो: “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही, तर जिवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहो.” (इब्री लोकांस १०:३९) हे आठवणीत ठेवून आपण सर्वजण शेवटपर्यंत यहोवाची विश्वासूपणे सेवा करत राहू या. आताच नव्हे तर सर्वकाळपर्यंत यहोवावर आपला पूर्ण भरवसा ठेवण्याकरता आपल्याकडे भरपूर कारणे आहेत.—स्तोत्र ३७:३; १२५:१.
तुम्ही काय शिकलात?
• यहोशवा व कालेब यांनी चांगले वृत्त का दिले?
• यहोवावर संपूर्ण मनाने भरवसा ठेवण्याची काही कारणे कोणती आहेत?
• यहोवावर भरवसा ठेवण्याचा काय अर्थ होतो?
• यहोवावर भरवसा ठेवून आपण कोणती भूमिका घेण्याचा निर्धार केला आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील चित्र]
यहोशवा व कालेब यांनी चांगले वृत्त का दिले?
[१६ पानांवरील चित्र]
सृष्टी आपल्याला यहोवावर भरवसा ठेवण्याकरता प्रेरित करते
[चित्राचे श्रेय]
तिन्ही चित्रे: अँग्लो-ऑस्ट्रेलियन ऑब्झर्वेटरीच्या सौजन्याने, छायाचित्रकार डेव्हिड मॅलिन
[१८ पानांवरील चित्र]
यहोवावर भरवसा ठेवण्याचा अर्थ ज्यांच्यावर त्याचा भरवसा आहे त्यांच्यावर भरवसा ठेवणे