‘खंबीर व्हा व हिंमत धरा!’
‘खंबीर व्हा व हिंमत धरा!’
“धीर धरा! मी जगाला जिंकले आहे.”—योहान १६:३३.
१. कनानमध्ये इस्राएलांना ज्या गोष्टींना तोंड द्यायचे होते त्याच्या अनुषंगाने त्यांना कोणते प्रोत्साहन मिळाले?
इस्राएल लोक यार्देन नदी पार करून प्रतिज्ञात देशात जाण्याच्या बेतात असताना मोशेने त्यांना सांगितले: ‘खंबीर व्हा, हिंमत धरा. त्यांना भिऊ नका, त्यांना घाबरू नका कारण तुमच्याबरोबर चालणारा तुमचा देव यहोवा हा आहे.’ मग मोशेने इस्राएलांना कनान देशापर्यंत नेण्यास नियुक्त करण्यात आलेल्या यहोशवाला बोलावले आणि त्याला देखील हिंमत धरण्याचा सल्ला दिला. (अनुवाद ३१:६, ७) नंतर यहोवानेही स्वतः यहोशवाला प्रोत्साहन देऊन म्हटले: “खंबीर हो, हिंमत धर . . . मात्र तू खंबीर हो व खूप हिंमत धर.” (यहोशवा १:६, ७, ९) हे शब्द अगदी समयोचित होते. इस्राएल लोकांना यार्देन नदीच्या पलीकडे राहणाऱ्या त्यांच्या शक्तिशाली शत्रूंना तोंड देण्याकरता साहजिकच धैर्याची आवश्यकता होती.
२. आज आपण कोणत्या परिस्थितीत आहोत आणि आपल्याला कशाची गरज आहे?
२ आज खरे ख्रिस्ती प्रतिज्ञात नव्या जगात प्रवेश करण्याच्या बेतात आहेत आणि यहोशवाप्रमाणे त्यांनाही धीर धरण्याची गरज आहे. (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण ७:१४) पण आपली परिस्थिती यहोशवापेक्षा वेगळी आहे. यहोशवा तरवार व भाले घेऊन लढायचा. पण आपली लढाई आत्मिक आहे आणि खरोखरचे शस्त्र आपण कधीही हाती घेत नाही. (यशया २:२-४; इफिसकर ६:११-१७) शिवाय, यहोशवाला प्रतिज्ञात देशात प्रवेश केल्यानंतरही अनेक भयंकर युद्धे लढावी लागली होती. पण आपली सर्वात भयंकर लढाई आताच—नव्या जगात प्रवेश करण्याआधीच सुरू आहे. अशा काही प्रसंगांविषयी चर्चा करू या, की ज्यांत आपल्याला हिंमत धरावी लागेल.
आपल्याला का लढावे लागते?
३. आपल्या मुख्य विरोधकाबद्दल बायबल काय प्रकट करते?
३ प्रेषित योहानाने लिहिले: “आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे; सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) ख्रिस्ती लोकांना आपला विश्वास कायम ठेवण्याकरता संघर्ष का करावा लागतो याचे मुख्य कारण या वचनातून कळून येते. एक ख्रिस्ती व्यक्ती यहोवाला विश्वासू राहते तेव्हा काही प्रमाणात का होईना, पण हा सैतानाचा पराजय असतो. म्हणूनच सैतान “गर्जणाऱ्या सिंहासारखा” विश्वासू ख्रिश्चनांना घाबरवून त्यांना गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात फिरतो. (१ पेत्र ५:८) अभिषिक्त ख्रिस्ती व त्यांच्या सोबत्यांबरोबर तो अक्षरशः युद्ध करतो. (प्रकटीकरण १२:१७) या संघर्षात तो जाणूनबुजून अथवा नकळत त्याचे उद्देश साध्य करणाऱ्या मानवांचा उपयोग करतो. सैतानाच्या व त्याच्या सर्व हस्तकांच्या विरोधात खंबीर उभे राहण्याकरता खरोखर हिंमत धरण्याची आवश्यकता आहे.
४. येशूने काय ताकीद दिली पण खऱ्या ख्रिश्चनांनी कोणता गुण दाखवला आहे?
४ सैतान व त्याचे हस्तक पूर्ण शक्तीनिशी सुवार्तेचा विरोध करतील हे येशूला माहीत असल्यामुळेच त्याने आपल्या अनुयायांना अशी ताकीद दिली: “तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करितील.” (मत्तय २४:९) हे शब्द पहिल्या शतकात खरे ठरले आणि आजही ते खरे ठरत आहेत. किंबहुना, आधुनिक काळातील काही यहोवाच्या साक्षीदारांना सहन करावा लागलेला छळ सबंध इतिहासात घडला नव्हता इतका भयंकर होता. तरीसुद्धा खरे ख्रिस्ती अशा दबावातही हिंमत धरतात. “मनुष्याची भीति पाशरूप होते” याची त्यांना जाणीव आहे आणि या पाशात ते पडू इच्छित नाहीत.—नीतिसूत्रे २९:२५.
५, ६. (अ) कोणत्या परिस्थितीत आपल्याला धैर्य दाखवावे लागते? (ब) विश्वासू ख्रिश्चनांच्या धैर्याची परीक्षा पाहणारे प्रसंग येतात तेव्हा ते कशी प्रतिक्रिया दाखवतात?
५ छळाव्यतिरिक्त अशी इतर अनेक आव्हाने आहेत ज्यांना तोंड देताना आपल्याला हिंमत धरावी लागते. काही जणांना अनोळखी लोकांशी सुवार्तेबद्दल बोलणे एक आव्हान वाटते. काही शाळकरी मुलांवर, देशाला किंवा ध्वजाला एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा म्हणण्याचा दबाव आणला जातो तेव्हा त्यांनाही हिंमत दाखवावी लागते. ही प्रतिज्ञा धार्मिक प्रार्थनेसारखीच असल्यामुळे ख्रिस्ती मुलांनी आपल्या वागण्यातून देवाला संतुष्ट करण्याचा धैर्यवान निर्धार केला आहे आणि त्यांच्या या उत्तम भूमिकेमुळे खरोखर आनंद वाटतो.
६ विरोधक जेव्हा प्रसिद्धी माध्यमांचा गैरफायदा घेऊन देवाच्या सेवकांबद्दल प्रतिकूल माहिती पसरवण्याचा प्रयत्न करतात किंवा “न्याय करण्याच्या मिषाने उपद्रव योजून” खऱ्या उपासनेवर प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा देखील आपण हिंमत धरण्याची आवश्यकता आहे. (स्तोत्र ९४:२०) उदाहरणार्थ, वृत्तपत्रांत, रेडिओ किंवा टीव्हीवर यहोवाच्या साक्षीदारांबद्दल विपर्यस्त किंवा धडधडीत खोटे वृत्त प्रसिद्ध केले जाते तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असावी? आपल्याला धक्का बसण्याचे कारण आहे का? नाही. अशा गोष्टी आपल्याला अपेक्षितच आहेत. (स्तोत्र १०९:२) आणि काहीजण अशा या खोट्या व विपर्यस्त बातम्यांवर विश्वास ठेवतात याचेही आपल्याला नवल वाटत नाही कारण “भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवितो.” (नीतिसूत्रे १४:१५) तरीपण, निष्ठावान ख्रिस्ती त्यांच्या बांधवांबद्दल केलेल्या कोणत्याही विधानावर लगेच विश्वास ठेवत नाहीत; आणि अशा या प्रतिकूल वृत्तांमुळे निश्चितच ते ख्रिस्ती सभा बुडवत नाहीत, क्षेत्र सेवेत निरुत्साही होत नाहीत किंवा विश्वासात डगमगत नाहीत. उलट ते ‘देवाचे सेवक म्हणून आपली लायकी पटवून देतात; गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने; [विरोधकांच्या लेखी] फसविणारे मानलेले तरी [वास्तवात] खरे’ ठरतात.—२ करिंथकर ६:४, ८.
७. कोणते प्रश्न विचारून आपण स्वतःची कसून परीक्षा घेऊ शकतो?
७ तीमथ्याला लिहिताना पौलाने म्हटले: “देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा . . . आत्मा दिला आहे; म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची . . . तू लाज धरू नये.” (२ तीमथ्य १:७, ८; मार्क ८:३८) हे शब्द वाचल्यावर आपण स्वतःला विचारू शकतो: ‘मला माझ्या विश्वासाची लाज वाटते का, की मी धैर्यवान आहे? कामाच्या ठिकाणी (किंवा शाळेत) माझ्या बरोबर असलेल्यांना मी यहोवाचा साक्षीदार आहे हे कळू देतो का, की मी हे लपवण्याचा प्रयत्न करतो? इतरांपेक्षा वेगळे वागण्याची मला लाज वाटते का, की यहोवासोबतच्या नातेसंबंधामुळे इतरांपेक्षा वेगळे दिसून येण्याचा मला अभिमान वाटतो?’ सुवार्तेचा प्रचार करण्याबद्दल किंवा लोकांना न पटणारे विश्वास धारण करण्यासंबंधी कोणालाही नकारात्मक भावना असल्यास यहोवाने यहोशवाला दिलेला सल्ला त्यांनी आठवणीत ठेवावा: “खंबीर हो, हिंमत धर.” कधीही विसरू नका, की आपल्या सहकर्मचाऱ्यांचे किंवा आपल्या शाळासोबत्यांचे मत नव्हे तर यहोवाचे व येशू ख्रिस्ताचे आपल्याविषयी काय मत आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे.—गलतीकर १:१०.
आपण कशाप्रकारे अधिक धैर्यवान होऊ शकतो?
८, ९. (अ) सुरवातीच्या ख्रिश्चनांच्या धैर्याची एके प्रसंगी कशाप्रकारे परीक्षा झाली? (ब) धमकावण्यात आले तेव्हा पेत्र व योहान यांची कशी प्रतिक्रिया होती आणि त्यांनी व इतर बांधवांनी काय अनुभवले?
८ या कठीण काळात आपली सचोटी कायम राखण्यास प्रेषितांची कृत्ये ४:१३-३०) या प्रार्थनेनुसार यहोवाने त्यांना पवित्र आत्म्याच्या साहाय्याने बळकट केले आणि यहुदी नेत्यांनी नंतर ग्वाही दिल्याप्रमाणे त्यांनी आपल्या शिकवणीने “यरुशलेम भरून टाकले.”—प्रेषितांची कृत्ये ५:२८.
आपल्याला मदत करेल अशाप्रकारचे धैर्य आपण कसे संपादन करू शकतो? यासाठी, सुरवातीच्या ख्रिस्ती लोकांनी कशाप्रकारे धैर्य मिळवले याचा विचार करू. जेरूसलेमच्या महायाजकांनी आणि वडीलजनांनी पेत्र व योहान यांना येशूच्या नावाने प्रचार करण्याचे थांबवण्यास सांगितले तेव्हा काय घडले? शिष्यांनी नकार दिला, त्यांना धमकावण्यात आले आणि मग सोडून देण्यात आले. तेव्हा ते बांधवांकडे परत गेले आणि त्या सर्वांनी मिळून अशी प्रार्थना केली: “हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा आणि . . . आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर.” (९ त्या प्रसंगी काय घडले याचे आपण बारकाईने परीक्षण करू या. यहुदी नेत्यांनी शिष्यांना धमकावण्यास सुरवात केली तेव्हा त्यांनी या दबावापुढे हात टेकण्याचा विचार केला नाही. उलट, त्यांनी प्रचार करत राहण्याकरता धैर्य मिळावे अशी प्रार्थना केली. मग त्यांनी आपल्या प्रार्थनेनुसार कार्य केले आणि यहोवाने त्यांना त्याच्या आत्म्याच्या साहाय्याने बळकट केले. त्यांच्या अनुभवावरून हे दिसून येते की पौलाने काही वर्षांनंतर एका वेगळ्या संदर्भात लिहिलेले पुढील शब्द सर्व छळ सोसणाऱ्या ख्रिश्चनांना लागू होतात. पौलाने म्हटले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.”—फिलिप्पैकर ४:१३.
१०. स्वभावाने बुजरे असलेल्यांना यिर्मयाच्या अनुभवावरून काय शिकायला मिळते?
१० पण एखादी व्यक्ती स्वभावानेच लाजरी असेल तर? अशी व्यक्तीसुद्धा विरोधाला धैर्याने तोंड देऊन यहोवाची सेवा करत राहू शकते का? निश्चितच! यहोवाने यिर्मयाला संदेष्टा म्हणून नेमले तेव्हा यिर्मयाची काय प्रतिक्रिया होती हे तुम्हाला आठवते का? तरुण यिर्मयाने असे उत्तर दिले: “मी केवळ बाळ आहे.” देवाने दिलेल्या कामाकरता आपण लायक नाही असे यिर्मयाला वाटत होते हे त्याच्या या शब्दांवरून स्पष्ट दिसते. पण तरीसुद्धा, यहोवाने त्याला पुढील शब्दांत प्रोत्साहन दिले: “‘मी बाळ आहे’ असे म्हणू नको; ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याजकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल. त्यांस तू भिऊ नको; ‘तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे.’” (यिर्मया १:६-१०) यिर्मयाला यहोवावर पूर्ण विश्वास होता आणि त्यामुळे यहोवाच्या सामर्थ्याने त्याने आपल्या घाबऱ्या प्रवृत्तीवर मात केली आणि इस्राएल राष्ट्रात अत्यंत धैर्यवान असा साक्षी तो बनला.
११. आज ख्रिश्चनांना यिर्मयासारखे होण्यात कशामुळे मदत मिळते?
११ आज अभिषिक्त ख्रिश्चनांनाही यिर्मयासारखेच कार्य करण्याकरता नेमण्यात आले आहे. लोक त्यांच्या संदेशाबद्दल उदासीन आहेत, त्यांची थट्टा करतात आणि त्यांचा छळ करतात तरीसुद्धा ‘दुसऱ्या मेंढरांतील’ ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ पाठबळाने हे अभिषिक्त जन यहोवाच्या उद्देशांची अविरत घोषणा करत आहेत. (प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६) “तू भिऊ नको,” या यहोवाने यिर्मयाला दिलेल्या प्रोत्साहनाच्या शब्दांतून त्यांनाही दिलासा मिळतो. देवानेच आपल्याला नियुक्त केले आहे आणि आपण त्याचा संदेश घोषित करत आहोत हे ते कधीही विसरत नाहीत.—२ करिंथकर २:१७.
धैर्याची अनुकरणीय उदाहरणे
१२. येशूने धैर्य दाखवण्यासंबंधी कशाप्रकारे उत्तम उदाहरण ठेवले आणि आपल्या अनुयायांना त्याने कशाप्रकारे धीर दिला?
१२ धैर्यवान होण्याचा प्रयत्न करत असताना, यिर्मयाप्रमाणेच धैर्याने कार्य केलेल्या इतरांच्या उदाहरणांवर मनन करणे आपल्याकरता अत्यंत मदतदायी ठरेल. (स्तोत्र ७७:१२) उदाहरणार्थ, येशूच्या सेवाकार्याचे परीक्षण करत असता, त्याने सैतानाच्या मोहांचा प्रतिकार करताना आणि यहुदी धर्मपुढाऱ्यांच्या कड्या विरोधाला तोंड देताना धैर्यवान वृत्ती दाखवली हे पाहून आपण त्याची प्रशंसा करण्यास प्रवृत्त होतो. (लूक ४:१-१३; २०:१९-४७) यहोवाच्या सामर्थ्याने येशू अटळ राहिला आणि आपल्या मृत्यूच्या केवळ काही काळाआधी त्याने आपल्या शिष्यांना म्हटले: “जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा! मी जगाला जिंकले आहे.” (योहान १६:३३; १७:१६) येशूच्या शिष्यांनी त्याच्या उदाहरणाचे अनुकरण केल्यास ते देखील विजयी होणार होते. (१ योहान २:६; प्रकटीकरण २:७, ११, १७, २६) पण त्यांना ‘धीर धरण्याची’ आवश्यकता होती.
१३. पौलाने फिलिप्पैकरांना कशाप्रकारे प्रोत्साहन दिले?
१३ येशूचा मृत्यू झाल्यावर काही वर्षांनंतर पौल व सिला यांना फिलिप्पै येथील तुरुंगात टाकण्यात आले. नंतर पौलाने फिलिप्पैकर मंडळीला असे म्हणून उत्तेजन दिले, की ‘तुम्ही एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहा. आणि विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयीहि भयभीत होऊ नका.’ त्यांना धीर देण्याकरता पौलाने म्हटले: “हे [ख्रिस्ती लोकांचा छळ होणे] त्यांना [छळ करणाऱ्यांना] त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे, आणि ते देवापासून आहे; कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखहि सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.”—फिलिप्पैकर १:२७-२९.
१४. पौलाच्या निडरतेमुळे रोममधील बांधवांवर काय परिणाम झाला?
१४ पौलाने फिलिप्पैकर मंडळीला लिहिले तेव्हा पुन्हा एकदा तो तुरुंगात होता आणि या वेळी रोममध्ये बंदिवान होता. पण असे असूनही तो निडरपणे इतरांना प्रचार करतच होता. यामुळे काय परिणाम झाला? त्याने लिहिले: “कैसराच्या हुजरातीच्या सर्व सैनिकात व इतर सर्व जणात, माझी बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धि झाली; आणि त्यांची खातरी पटून बहुतेक बंधूंनी माझ्या बंधनांनी प्रभूच्या ठायी देवाचे वचन निर्भयपणे सांगावयास अधिक धाडस केले.”—फिलिप्पैकर १:१३, १४.
१५. धैर्यवान होण्याचा आपला निर्धार अधिक पक्का करतील अशी उत्तम विश्वासू उदाहरणे आपल्याला कोठे सापडतील?
१५ पौलाचे उदाहरण आपल्याला धीर देते. तसेच हुकुमशाही किंवा ख्रिस्ती धर्मनेत्यांच्या अंमलाखाली असलेल्या देशांत छळाला तोंड देऊन, टिकून राहिलेल्या आधुनिक काळातील ख्रिश्चनांची उत्तम उदाहरणेही आपल्याला धीर देतात. यांपैकी कित्येकांच्या जीवनकथा टेहळणी बुरूज व सावध राहा! आणि यहोवाच्या साक्षीदारांची वार्षिक पुस्तके (इंग्रजी) यांत प्रकाशित करण्यात आल्या आहेत. हे वास्तविक अहवाल वाचताना हे आठवणीत असू द्या, की आपले अनुभव सांगणारे हे लोक देखील तुमच्या-आमच्यासारखेच सर्वसाधारण लोक होते पण अत्यंत कठीण परिस्थिती त्यांच्यावर आली तेव्हा यहोवाने त्यांना असामान्य सामर्थ्य दिले आणि त्यामुळे ते टिकून राहू शकले. आपल्यावर कधी अशी परिस्थिती आली तर यहोवा आपल्यालाही ते सामर्थ्य देईल याची आपण खात्री बाळगू शकतो.
आपल्या धैर्यवान भूमिकेमुळे यहोवाचे गौरव होते
१६, १७. आपण धैर्यवान वृत्ती कशी विकसित करू शकतो?
१६ एखादा ख्रिस्ती सत्य व धार्मिकता यांकरता खंबीर भूमिका घेतो तेव्हा तो धैर्यवान आहे असे आपण म्हणू शकतो. मनातल्या मनात भीती वाटत असूनही एखादा खंबीर राहतो १ योहान २:५; ४:१८.
तेव्हा तो अधिकच धैर्यवान आहे असे म्हणता येईल. किंबहुना कोणताही ख्रिस्ती, ज्याला यहोवाची इच्छा करण्याची खरोखर इच्छा आहे, ज्याने विश्वासू राहण्याचा निर्धार केला आहे, जो सदैव देवावर विसंबून राहतो आणि यहोवाने आपल्याआधी आपल्यासारख्याच असंख्य व्यक्तींना सामर्थ्य दिले आहे हे जो आठवणीत ठेवतो तो धैर्यवान होऊ शकतो. शिवाय, आपल्या धैर्यवान भूमिकेमुळे यहोवा संतुष्ट होतो आणि त्याचे गौरव होते याची जाणीव ठेवल्यास आपोआपच आपण कमजोर न होण्याचा अधिक पक्का निर्धार करतो. त्याच्यावर मनःपूर्वक प्रेम असल्यामुळे आपण थट्टा किंवा त्याहूनही वाईट प्रकारचा छळ सोसण्यास तयार असतो.—१७ आपण नेहमी हे आठवणीत ठेवले पाहिजे की आपल्या विश्वासाकरता आपल्याला दुःख सोसावे लागते तेव्हा आपले काहीतरी चुकल्यामुळे असे घडत नसते. (१ पेत्र ३:१७) आपण यहोवाच्या सार्वभौमत्वाला समर्थन देत असल्यामुळे, चांगले करत असल्यामुळे आणि या जगाचे नसल्यामुळे दुःख सोसत असतो. या बाबतीत प्रेषित पेत्राने म्हटले: “चांगले करूनहि तुम्ही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली, तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे.” पेत्राने असेही म्हटले: “देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्ये करीत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावे.” (१ पेत्र २:२०; ४:१९) होय आपला विश्वास आपल्या प्रेमळ पित्या यहोवाला आनंदित करतो आणि यामुळे त्याचे गौरव होते. धैर्यवान राहण्याकरता हे किती महत्त्वाचे कारण आहे!
अधिकाऱ्यांसमोर बोलणे
१८, १९. एखाद्या न्यायाधीशासमोर आपण धैर्याने उभे राहतो तेव्हा आपण एका अर्थाने कोणता संदेश त्यांना सांगत असतो?
१८ येशूने जेव्हा आपल्या शिष्यांना सांगितले की त्यांचा छळ केला जाईल तेव्हा त्याने असेही म्हटले: “[माणसे] तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानांत तुम्हाला फटके मारतील, आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यात येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल.” (मत्तय १०:१७, १८) खोट्या आरोपांवरून एखाद्या न्यायाधीशापुढे किंवा शासकापुढे उभे राहण्यास धैर्य लागते. पण या प्रसंगाचा आपण त्या व्यक्तींना निडरतेने साक्ष देण्याकरता उपयोग करतो तेव्हा आपण एका कठीण परिस्थितीला काहीतरी महत्त्वाचे साध्य करण्याची संधी बनवत असतो. एका अर्थाने, आपण २ ऱ्या स्तोत्रातील यहोवाचे शब्द आपला न्याय करणाऱ्यांना कळवत असतो: “राजांनो, आता शहाणे व्हा, पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या. भीड धरून परमेश्वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा.” (स्तोत्र २:१०, ११) कित्येकदा, यहोवाच्या साक्षीदारांवर न्यायालयात खोटे आरोप करण्यात आले तेव्हा न्यायाधीशांनी उपासनेच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले आणि याबद्दल आपण कृतज्ञ आहोत. पण काही न्यायाधीश विरोधकांच्या कह्यात येतात. अशांना शास्त्रवचनांत असे सांगण्यात आले आहे, की “बोध घ्या.”
१९ या न्यायाधीशांनी आठवणीत ठेवले पाहिजे की सर्वात श्रेष्ठ कायदा यहोवा देवाचा आहे. त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की न्यायाधीशांसहित सर्व मानवांना यहोवा देवाला व येशू ख्रिस्ताला हिशेब द्यायचा आहे. (रोमकर १४:१०) आपल्या बाबतीत पाहू जाता, मानवी न्यायाधीशाकडून आपल्याला न्याय मिळो वा ना मिळो पण तरीसुद्धा आपण धैर्यवान राहू शकतो कारण यहोवा आपल्या पाठीशी आहे. बायबल म्हणते: “त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत.”—स्तोत्र २:१२.
२०. छळ व खोटे आरोप केले जातात तेव्हाही आपण आनंदी का असू शकतो?
मत्तय ५:११, १२) अर्थात छळ मुळात आनंददायक असू शकत नाही, पण छळ होतो किंवा प्रसिद्धी माध्यमांद्वारे खोटी वृत्ते पसरवली जातात तेव्हाही आपले या परिस्थितीत दृढ राहणे आनंददायक ठरू शकते. कारण याचा अर्थ असा होतो की आपण यहोवाला संतुष्ट करत आहोत आणि याचे प्रतिफळ आपल्याला मिळेल. आपली धैर्यवान भूमिका दाखवते की आपला विश्वास खरा आहे आणि यामुळे देवाची संमती आपल्याला अवश्य मिळेल. खरे तर आपण हे दाखवत असतो की आपला यहोवावर पूर्ण भरवसा आहे. असा भरवसा असणे ख्रिस्ती व्यक्तीकरता अत्यावश्यक आहे. याविषयीच पुढील लेखात चर्चा केली जाईल.
२० डोंगरावरील प्रवचनात येशूने म्हटले: “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.” (तुम्ही काय शिकलात?
• आज कोणत्या प्रकारचे प्रसंग धैर्याची मागणी करतात?
• आपण धैर्य कसे संपादन करू शकतो?
• धैर्याची काही उत्तम उदाहरणे कोणती आहेत?
• आपण धैर्यवान भूमिका का घेऊ इच्छितो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[९ पानांवरील चित्रे]
जर्मनीत सीमोन आर्नल्ड (आता लीबस्टर) यांनी, मलावीत विडस मॅडोना यांनी आणि युक्रेनमध्ये लिडिया आणि ओलेक्सी कुरदास यांनी धैर्य दाखवून दुष्ट सैतानाचा प्रतिकार केला
[१० पानांवरील चित्रे]
आपल्याला सुवार्तेची लाज वाटत नाही
[११ पानांवरील चित्र]
तुरुंगात पौलाच्या धैर्यवान भूमिकेमुळे सुवार्तेकरता बरेच काही साध्य झाले
[१२ पानांवरील चित्र]
आपण शास्त्रवचनांवर आधारित असलेली आपली भूमिका एखाद्या न्यायाधीशाला समजावून सांगतो तेव्हा आपण एक महत्त्वाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोचता करत असतो