व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दारिद्र्‌याचा कधी अंत होईल का?

दारिद्र्‌याचा कधी अंत होईल का?

दारिद्र्‌याचा कधी अंत होईल का?

“तो पाहा, गांजलेल्याचे अश्रु गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही, त्यांजवर जुलम करणाऱ्‍यांच्या ठायी बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही,” असे प्राचीन इस्राएलच्या सुज्ञ राजा शलमोनाने म्हटले. (उपदेशक ४:१) त्याला माहीत असलेले पुष्कळ लोक, ज्यांच्यावर जुलूम होत होता ते गरीब देखील होते.

दारिद्र्‌य, केवळ पैशाने मापता येत नाही. जून २००२ मध्ये वर्ल्ड बँकने पुरवलेल्या माहितीनुसार, “१९९८ मध्ये असा अंदाज लावला जातो, की संपूर्ण जगभरातील १.२ कोटी लोकांनी प्रतिदिवशी १ डॉलर पेक्षा कमी पैशात गुजराण केली होती . . . आणि २.८ कोटी लोकांनी प्रतिदिवशी २ डॉलर पेक्षा कमी पैशात गुजराण केली होती.” असे पाहण्यात आले होते, की हे आकडे पूर्वीच्या अंदाजांपेक्षा कमी असले तरीसुद्धा, “हालअपेष्टेच्या दृष्टीने हे आकडे अद्यापही जास्तच आहेत.”

दारिद्र्‌याचा कधी अंत होईल का? येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितले: “गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत.” (योहान १२:८) याचा अर्थ असा होतो का, की दारिद्र्‌य आणि त्याच्यामुळे येणारे कटू परिणाम नेहमीच राहतील? नाही. कारण, येशूने आपल्या अनुयायांना, ते सर्वजण भौतिकरीत्या श्रीमंत होतील असे अभिवचन दिलेले नसले तरीसुद्धा आपण असा निष्कर्ष काढू नये की गरीबांसाठी कसलीच आशा नाही.

मानवी प्रयत्न आणि दारिद्र्‌य मिटवण्याविषयी मानवांनी दिलेली वचने नेहमी फोल ठरली असली तरीसुद्धा, देवाचे वचन बायबल आपल्याला असे आश्‍वासन देते, की लवकरच असा काळ येणार आहे जेव्हा कोणीही गरीब नसेल. खरे तर, येशूने ‘दीनांस सुवार्ता सांगितली.’ (लूक ४:१८) या सुवार्तेत, दारिद्र्‌याचा लवकरच अंत केला जाईल या अभिवचनाचा देखील समावेश होतो. देवाचे राज्य पृथ्वीवर नीतिमान परिस्थिती आणेल तेव्हा हे शक्य होईल.

किती वेगळे जग असेल ते! स्वर्गीय राजा येशू ख्रिस्त “दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर . . . दया करील, दरिद्रयांचे जीव तो तारील.” होय, “जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील.”—स्तोत्र ७२:१३, १४.

त्या काळाविषयी मीखा ४:४ म्हणते: “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही; कारण सेनाधीश परमेश्‍वराच्या तोंडची ही वाणी आहे.” देवाचे राज्य मानवजातीला पीडित करणाऱ्‍या सर्व समस्यांचे निरसन करील; इतकेच नव्हे तर आजारपण व मृत्यू यांनाही ते काढून टाकील. देव ‘मृत्यू कायमचा नाहीसा करेल, प्रभू यहोवा सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रू पुसेल.’—यशया २५:८.

तुम्ही या अभिवचनांवर भरवसा ठेवू शकता कारण स्वतः देवाने ही अभिवचने लिहिण्याची प्रेरणा दिली होती. बायबल भविष्यवाण्या विश्‍वासयोग्य आहेत हे सिद्ध करणाऱ्‍या पुराव्यांचे परीक्षण करायला तुम्हाला आवडेल का?

[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]

FAO photo/M. Marzot