व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दयाळुपणाचे महत्त्व काय आहे?

दयाळुपणाचे महत्त्व काय आहे?

दयाळुपणाचे महत्त्व काय आहे?

“मनुष्याच्या इच्छेवरून त्याच्या दयाळूपणाचे मान समजते” असे बायबलमध्ये म्हटले आहे. (नीतिसूत्रे १९:२२) होय, प्रेमाने प्रवृत्त होऊन केलेली दयाळू कार्ये खरोखरच प्रिय असतात. परंतु, बायबलमध्ये वापरण्यात आलेला ‘दयाळुपणा’ हा शब्द, आधीपासून असलेल्या नातेसंबंधावर आधारित असलेल्या दयेला सूचित करतो; जसे की एखाद्याने केलेल्या दयाळू कार्याची जाण राखणे. यास्तव, यामध्ये एकनिष्ठेचा देखील समावेश होतो.

यहुदाचा राजा योवाश, हा प्रिय गुण दाखवण्यात उणा पडला. त्याची आत्या आणि मामा यहोयादा यांचे त्याच्यावर खूप उपकार होते. योवाश अजून वर्षाचाही झाला नव्हता तोच त्याची दुष्ट आजी स्वतः राणी बनली आणि योवाशाच्या इतर सर्व भावांचा तिने वध केला; कारण ते सिंहासनाचे वारस होते. परंतु ती लहानग्या योवाशला ठार मारू शकली नाही कारण, त्याच्या आत्याने व मामाने त्याला लपवून ठेवले होते. इतकेच नव्हे तर, त्यांनी त्याला देवाचे नियमशास्त्रही शिकवले. योवाश सात वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या मामाने आपल्या महायाजक पदाचा उपयोग करून दुष्ट राणीला ठार मारले आणि योवाशला सिंहासनावर बसवले.—२ इतिहास २२:१०-२३:१५.

आपले मामा हयात होते तोपर्यंत तरुण योवाशने राजा या नात्याने उत्तमरीत्या राज्य केले; पण मामाच्या मृत्यूनंतर तो मूर्तीपूजेकडे वळाला. योवाशला त्याच्या धर्मत्यागाची ताकीद देण्याकरता यहोवाने यहोयादाचा पुत्र जखऱ्‍या याला त्याच्याकडे पाठवले. योवाशने जखऱ्‍याला दगडमार करून ठार मारले. ऋण फेडण्याऐवजी योवाशाने आपल्या मामाच्या कुटुंबाशी बेईमानी केली; किती हे धक्केदायक कृत्य!—२ इतिहास २४:१७-२१.

बायबल म्हणते: “[जखऱ्‍याचा] बाप यहोयादा याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्रास वधिले.” जखऱ्‍याने मृत्यूसमयी म्हटले: “परमेश्‍वरा हे अवलोकन करून याचे उसने फेड.” जखऱ्‍याच्या शब्दांनुसार योवाश खूप आजारी पडला आणि त्याच्याच सेवकांनी त्याचा वध केला.—२ इतिहास २४:१७-२५.

राजा योवाशप्रमाणे होण्याऐवजी पुढील वचनात दिलेल्या सल्ल्यानुसार जे वागतील त्यांचे भवितव्य आशीर्वादित ठरेल: ‘दया व सत्य ही तुला न सोडोत; . . . म्हणजे तुला देव व मनुष्य यांजकडून, अनुग्रह . . . प्राप्त होईल.’—नीतिसूत्रे ३:३, ४.