वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
एखाद्या ख्रिश्चन व्यक्तीला विचित्र आवाज ऐकू येत असतील तर याचा अर्थ असा होतो का, की दुरात्मे त्याच्यावर हल्ला करीत आहेत?
नाही. दुरात्म्यांनी असा व्यवहार केल्याची उदाहरणे असली तरी, ज्यांना विचित्र आवाज ऐकू येतात किंवा वर्णन करता येणार नाही असे किंवा अस्वस्थ करणारे अनुभव येतात त्यांनी याबाबतीत आणखी जरा तपास केल्यावर, त्यांना वैद्यकीय समस्या होती, असे दिसून आले.
पहिल्या शतकातही, लोकांनी हे स्पष्टपणे ओळखले, की दुरात्म्यांकडून होणारा हल्ला आणि आरोग्यविषयक समस्या यांचे कधीकधी सारखेच परिणाम घडत होते. मत्तय १७:१४-१८ मध्ये आपण एका तरुण मुलाविषयी वाचतो ज्याला येशूने बरे केले. त्या मुलाच्या आजाराच्या लक्षणांवरून त्याला तीव्र फेपऱ्याचा रोग असल्यासारखे वाटत असले तरी खरे तर त्याला एका दुरात्म्याकडून त्रास होत होता. पण, आधीच्या एका प्रसंगी जेव्हा अनेक पीडितांना येशूकडे बरे करण्यासाठी आणले गेले तेव्हा या लोकांमध्ये काही “भूतग्रस्त, व फेपरेकरी” देखील होते. (तिरपे वळण आमचे.) (मत्तय ४:२४, पं.र.भा.) यावरून स्पष्ट होते, की फेपरे झालेल्या काहींवर दुरात्मिक प्रभाव नसल्याचे लोकांना माहीत होते. तर त्यांना वैद्यकीय समस्या होती.
असे सांगितले जाते, की छिन्नमनस्कता हा आजार झालेल्यांना आवाज ऐकू येतात किंवा त्यांना विचित्र अनुभव येतात; हा आजार बहुतेकदा औषधोपचाराने बरा होऊ शकतो. * इतर बाबतीत शारीरिक परिस्थितींमुळे एखादी व्यक्ती मानसिकरीत्या गोंधळून जाऊन विचित्र वागू शकते, ज्यामुळे लोकांचा असा चुकीचा ग्रह होऊ शकतो, की त्या व्यक्तीला दुरात्म्यांकडून त्रास होत आहे. यास्तव एखाद्या व्यक्तीला आवाज ऐकू येत असल्यास किंवा इतर अस्वस्थ करणारे अनुभव येत असल्यास आपल्याला दुरात्म्यांकडून त्रास होत असावा याकडे तिला दुर्लक्ष करावेसे वाटत नसले तरीपण ही शारीरिक समस्या आहे का हे तपासून पाहायला तिला निश्चित उत्तेजन दिले जावे.
[तळटीप]
^ परि. 5 टेहळणी बुरूज या नियतकालिकाच्या सोबतचे नियतकालिक, सावध राहा! याच्या सप्टेंबर ८, १९८६ (इंग्रजी) अंकामधील, “मनोरोगांमधील गूढतेचे स्पष्टीकरण” हा लेख पाहा.