नौकागतिची एक रोचक नोंदवही
नौकागतिची एक रोचक नोंदवही
शोधक रिचर्ड ई. बायर्ड यांनी १९२८ पासून १९५६ पर्यंत आन्टार्टिकात पाच शोधमोहिमा केल्या. डायरीत व नोंदवह्यांत तंतोतंत माहिती लिहून ठेवल्याने त्यांना आणि त्यांच्या गटाला वाऱ्याच्या हालचाली ओळखता आल्या, नकाशे बनवता आले आणि आन्टार्टिका खंडाबद्दल बरीच माहिती गोळा करता आली.
बायर्ड यांच्या शोधमोहिमा, नोंदवहीचे महत्त्व पटवून देतात. नोंदवहीत एखाद्या प्रवासाची किंवा उड्डाणाची तपशीलवार माहिती लिहून ठेवलेली असते. ही माहिती, घडलेल्या घटनांची उजळणी करण्यासाठी किंवा भावी यात्रांकरता उपयोगी ठरणाऱ्या माहितीचे परीक्षण करण्यासाठी भविष्यात वापरली जाऊ शकते.
शास्त्रवचनांमध्ये नोहाच्या काळातील जलप्रलयाचा रोचक अहवाल दिला आहे. हा जागतिक प्रलय एका वर्षाहून अधिक काळपर्यंत चालला. या प्रलयाच्या तयारीकरता नोहा, त्याची पत्नी, त्याची तीन मुले व त्याच्या सुना या सर्वांनी, ४०,००० घन मीटरचे एक विशाल तारू बांधण्यासाठी ५० ते ६० वर्षे घालवली. पण कशासाठी? जलप्रलयातून काही मानवांचा आणि प्राण्यांचा बचाव करण्यासाठी.—उत्पत्ति ७:१-३.
बायबलमधील उत्पत्ति नावाच्या पुस्तकाला नोहाची नोंदवही म्हणता येईल कारण त्यामध्ये प्रलयाच्या सुरवातीपासून नोहा व त्याचे कुटुंब तारवातून बाहेर पडेपर्यंतची माहिती दिली आहे. त्यामधील माहिती आज आपल्याकरता महत्त्वाची आहे का?