व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘शलमोन त्यातल्या एकासारखा सजला नव्हता’

‘शलमोन त्यातल्या एकासारखा सजला नव्हता’

‘शलमोन त्यातल्या एकासारखा सजला नव्हता’

येथे दिसणारी ही जंगली फुले दक्षिण आफ्रिकेत रस्त्यालगत सर्रासपणे दिसतात. त्यांना कॉसमॉस म्हटले जाते आणि ते मूळचे अमेरिकन उष्णकटिबंधातील आहेत. डोळ्यांचे पारणे फेडणारी ही फुले येशूने शिकवलेल्या एका धड्याची आठवण करून देतात. येशूच्या श्रोत्यांमधील पुष्कळ लोक गरीब होते, त्यांना आपल्या शारीरिक गरजांची, आपल्या भोजनाची, कपड्यालत्त्याची काळजी होती.

येशूने त्यांना विचारले: “वस्त्राविषयी का चिंता करीत बसता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत व सूत कातीत नाहीत; तरी मी तुम्हास सांगतो, शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारिखा सजला नव्हता.”—मत्तय ६:२८, २९.

येशूच्या मनात नेमक्या कोणत्या प्रकारची फुले होती यावर विविध मते मांडण्यात आली आहेत. परंतु येशूने त्याची तुलना सामान्य झाडपाल्याशी करून म्हटले: “जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोषाख घालतो, तर, अहो तुम्ही अल्पविश्‍वासी, तो विशेषेकरून तुम्हाला पोषाख घालणार नाही काय?”—मत्तय ६:३०.

कॉसमॉस फुले मूळची इस्राएलची नसली तरीसुद्धा ती, येशूने शिकवलेल्या धड्यास दुजोरा देतात. या फुलांना दुरून पाहिले किंवा अगदी जवळ जाऊनही त्यांचे निरीक्षण केले तरी आपल्याला दिसून येईल की ती खरोखरच किती सुंदर आहेत आणि हा छायाचित्रकारांचा व कलाकरांचा आवडता विषय आहे. होय, “शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारिखा सजला नव्हता” असे येशूने म्हटले तेव्हा तो अतिशयोक्‍ती करत नव्हता.

आज आपल्यासाठी काय धडा आहे? देवाची सेवा करणारे ही खात्री बाळगू शकतात की देव त्यांना, कठीण काळांतही लागणाऱ्‍या वस्तू मिळवण्यास अवश्‍य मदत करील. येशूने म्हटले: “तुम्ही [देवाचे] राज्य मिळविण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर ह्‍याहि गोष्टी [जसे की अन्‍न व वस्त्र] तुम्हास मिळतील.” (लूक १२:३१) होय, देवाचे राज्य मिळवल्यामुळे खरे लाभ मिळतात. देवाचे राज्य काय आहे आणि ते मानवजातीसाठी काय करणार आहे हे तुम्हाला माहीत आहे का? यहोवाच्या साक्षीदारांना, तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरे शोधायला मदत करण्यास आनंद वाटेल.