व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पक्षी आपल्याला काय शिकवू शकतात

पक्षी आपल्याला काय शिकवू शकतात

पक्षी आपल्याला काय शिकवू शकतात

“आकाशातील पाखरांकडे निरखून पाहा; ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत की कोठारात साठवीत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो; तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहा की नाही?” (मत्तय ६:२६) गालील समुद्राजवळील एका डोंगरावर दिलेल्या एका प्रसिद्ध प्रवचनांत येशू ख्रिस्ताने वरील शब्द उद्‌गारले होते. त्याच्या श्रोत्यांमध्ये केवळ त्याचे अनुयायीच नव्हते तर देशांतील सर्व भागांतून संभाव्य शिष्यांचा एक मोठा लोकसमुदाय तेथे उपस्थित होता. त्यांपैकी पुष्कळ लोक गरीब होते ज्यांनी आपल्याबरोबर आजारी लोकांना आणले होते जेणेकरून येशू त्यांना बरे करील.—मत्तय ४:२३-५:२; लूक ६:१७-२०.

सर्व दुखणाईतांना बरे केल्यावर येशूने अधिक महत्त्वाच्या आध्यात्मिक गोष्टींकडे आपले लक्ष वळवले. त्याने शिकवलेल्या धड्यांपैकी एका धड्याचा वर उल्लेख करण्यात आला आहे.

आकाशातील पक्षी दीर्घ काळापासून अस्तित्वात आहेत. यांपैकी काही पक्षी किड्यांवर गुजराण करतात तर काही फळे, बिया खातात. देवाने जर पक्ष्यांसाठी इतक्या विपुल प्रमाणात सोय करून ठेवली आहे तर आपल्या सेवकांना त्यांची दररोजची भाकर मिळण्यास त्यांना मदत करण्यासही तो समर्थ आहे. तो त्यांना कदाचित नोकरी मिळण्यास मदत करू शकतो जेणेकरून ते अन्‍नासाठी पैसे कमवू शकतील. किंवा कदाचित पीक काढून स्वतःचे अन्‍न मिळवण्यातही तो त्यांना यश देऊ शकतो. तातडीच्या काळात, देव, दयाळू शेजाऱ्‍यांना व मित्रांना आपल्या जवळ असलेले जे काही अन्‍न आहे ते गरजू लोकांबरोबर वाटून खाण्यास प्रवृत्त करू शकतो.

पक्षी-जीवनाचे बारकाईने परीक्षण केल्यास आपण पुष्कळ गोष्टी शिकू शकतो. देवाने या पक्ष्यांची अशी निर्मिती केली आहे, की त्यांना, आपल्या पिल्लांचे संगोपन करण्यासाठी घरटे बांधण्याची उपजत बुद्धी असते. चित्रात दोन प्रकारची घरटी दाखवण्यात आली आहेत. वर दिसणारे घरटे आफ्रिकन रॉक मार्टीन नावाच्या भांडीक पक्ष्याचे आहे. त्यांची घरटी खडकांना किंवा घराच्या एखाद्या भिंतीला चिकटलेली असतात. अशा घरट्यांचे छप्पर म्हणजे खडक, चित्रात दिसते त्याप्रमाणे येथे इमारतीचा कडाच या घरट्याचे छप्पर बनले आहे. पेल्याच्या आकाराचे घरटे चिखलाचे लहान लहान गोळे एकमेकांना चिकटवून बनवले जाते. दोघे नर व मादी चिखलाचे गोळे आणण्यासाठी कष्ट करतात आणि आपले घरटे पूर्ण करण्यासाठी त्यांना कदाचित एक महिन्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो. त्यानंतर घरट्याला आतून गवत व मऊ पिसांचे अस्तर लावले जाते. नर व मादी दोघेही पिल्लांना भरवतात. खाली दाखवण्यात आलेले घरटे सुगरण पक्ष्याचे आहे. हा कष्टाळू आफ्रिकन पक्षी, गवताच्या पातींनी किंवा इतर झाडपाल्याच्या धाग्यांनी आपले घरटे विणतो. एका दिवसात एक घरटे विणले जाऊ शकते आणि एका हंगामात ३० पेक्षा अधिक घरटी विणता येतात!

यांच्यापासून आपल्यासाठी काय धडा आहे? देव जर पक्षांना अशी कल्पकता व घरटी बनवण्यासाठी भरपूर साहित्य देऊ शकतो तर तो निश्‍चितच आपल्या सेवकांच्या राहण्याची सोय होण्यास मदत करू शकतो. परंतु, आपल्या भौतिक गरजा भागवण्यास यहोवा देवाने आपल्याला मदत करावी अशी आपली इच्छा असेल तर आपल्याला आणखी एक गोष्ट करावी लागेल असे येशूने म्हटले. त्याने असे वचन दिले: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:३३) तुम्ही कदाचित विचार कराल, की ‘पहिल्याने देवाचे राज्य मिळवण्यास झटण्यामध्ये कशाचा समावेश होतो?’ या मासिकाचे वितरण करणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला या प्रश्‍नाचे उत्तर द्यायला आनंद वाटेल.