व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘या पुस्तकाने माझ्या मनातली पोकळी भरून काढली’

‘या पुस्तकाने माझ्या मनातली पोकळी भरून काढली’

‘या पुस्तकाने माझ्या मनातली पोकळी भरून काढली’

“यहोवाजवळ या’ या सुरेख पुस्तकाबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानू इच्छिते. या पुस्तकाने माझ्या मनातली पोकळी भरून काढली आहे. यहोवाने आपल्यावर प्रेम करावे आणि आपल्याला मोलवान लेखावे या इच्छेमुळे ही पोकळी निर्माण झाली होती. आता मला यहोवा व त्याचा प्रिय पुत्र यांच्या अगदी जवळ आल्यासारखे वाटते. मला ज्याला त्याला या पुस्तकाबद्दल सांगावेसे वाटते आणि माझ्या सर्व प्रियजनांना मी या पुस्तकाची प्रत देऊ इच्छिते.” यहोवाच्या साक्षीदारांपैकी एका व्यक्‍तीने २००२/०३ सालांदरम्यान संपन्‍न झालेल्या “आवेशी राज्य उद्‌घोषक” या प्रांतीय अधिवेशनांत प्रसिद्ध करण्यात आलेल्या नव्या ३२०-पानी पुस्तकाविषयी वरीलप्रमाणे आपल्या भावना व्यक्‍त केल्या. या नव्या पुस्तकाची काही खास वैशिष्ट्ये आणि ते का प्रकाशित करण्यात आले याविषयी पाहू या.

नव्या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये

या नव्या पुस्तकात काय आहे? या दोन अभ्यास लेखात सादर करण्यात आलेली माहिती आणि आणखी बरेच काही! या पुस्तकात ३१ अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्याय टेहळणी बुरूज यातील एका अभ्यास लेखाइतका आहे. प्रस्तावना व पहिल्या तीन अध्यायांनंतर हे पुस्तक चार भागांत विभाजित करण्यात आले आहे आणि प्रत्येक भागात यहोवाच्या प्रमुख गुणांपैकी एक गुण विचारात घेण्यात आला आहे. प्रत्येक भाग त्या विशिष्ट गुणाविषयीच्या माहितीने सुरू होतो. पुढील काही अध्यायांत यहोवा तो विशिष्ट गुण कशाप्रकारे प्रदर्शित करतो याविषयी चर्चा करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात एक अध्याय येशूविषयी आहे. का? कारण येशूने म्हटले होते: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहान १४:९) यहोवाची परिपूर्ण प्रतिकृती असल्यामुळे येशू आपल्याला देवाच्या गुणांना व्यवहारात पाहण्याकरता अनेक सजीव उदाहरणे पुरवतो. प्रत्येक विभागाच्या शेवटी एक अध्याय आहे ज्यात आपण तो विशिष्ट गुण प्रदर्शित करण्याद्वारे कशाप्रकारे यहोवाचे अनुकरण करू शकतो याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. यहोवाच्या गुणांची चर्चा करताना या नव्या पुस्तकात बायबलच्या प्रत्येक पुस्तकाचा संदर्भ घेण्यात आला आहे.

यहोवाजवळ या, या पुस्तकाची काही खास वैशिष्ट्ये देखील आहेत. दुसऱ्‍या अध्यायापासून प्रत्येक अध्यायात “मनन करण्याकरता प्रश्‍न” या नावाची एक पेटी आहे. यातील शास्त्रवचने व प्रश्‍न त्या अध्यायाच्या उजळणीकरता देण्यात आलेले नाहीत. तर त्या विषयावर सखोल मनन करण्याकरता तुम्ही बायबलचा कसा उपयोग करू शकता हे तुम्हाला दाखवण्याकरता दिलेले आहेत. यातील प्रत्येक अहवाल तुम्ही लक्षपूर्वक वाचावा असा सल्ला आम्ही देऊ इच्छितो. मग दिलेल्या प्रश्‍नावर विचार करा आणि तुमच्याकरता तो अहवाल कशाप्रकारे उपयोगी आहे याविषयी विचार करा. अशाप्रकारे मनन केल्यामुळे तुमचे अंतःकरण प्रेरित होईल आणि तुम्हाला यहोवाच्या अधिक जवळ येण्यास मदत होईल.—स्तोत्र १९:१४.

यहोवाजवळ या, या पुस्तकातील चित्रे बोधप्रद व प्रेरक ठरावीत या दृष्टीने विचारपूर्वक संशोधन करून तयार करण्यात आली आहेत. सतरा अध्यायांत बायबलमधील देखाव्यांची सुरेख पूर्ण पानी चित्रे आहेत.

प्रकाशित करण्याचा उद्देश

यहोवाजवळ या, हे पुस्तक का प्रकाशित करण्यात आले? या नव्या पुस्तकाचा मुख्य उद्देश यहोवाला अधिक चांगल्याप्रकारे ओळखण्यास आपली मदत करण्याचा आहे जेणेकरून आपल्याला देवासोबत एक घनिष्ट वैयक्‍तिक नातेसंबंध जोडता येईल.

यहोवाजवळ या, या पुस्तकाचा ज्याला फायदा होऊ शकेल अशा कोणाला तुम्ही ओळखता का? कदाचित तुमचा बायबल विद्यार्थी किंवा एखादा अक्रियाशील ख्रिस्ती बंधू अथवा बहीण? तुमच्याबद्दल काय—तुम्ही हे पुस्तक वाचण्यास सुरवात केली आहे का? नसल्यास लवकरात लवकर हे वाचण्याकरता एक निश्‍चित वेळ तुम्ही ठरवू शकता का? वाचत असलेल्या माहितीवर मनन करण्याकरता वेळ द्या. हे नवे प्रकाशन तुम्हाला यहोवा देवाच्या अधिकाधिक जवळ येण्यास मदत करो, जेणेकरून तुम्हाला त्याच्या राज्याची सुवार्ता नव्या उत्साहाने व जोमाने घोषित करता येईल!