युवकांच्या हृदयाला स्पर्श करेल असा व्हिडिओ
युवकांच्या हृदयाला स्पर्श करेल असा व्हिडिओ
पुष्कळ तरुण, तरुण लोक विचारतात—मला खरे मित्र कसे बनवता येतील? (इंग्रजी) हा व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या वर्तनाचा गंभीर विचार करायला प्रवृत्त झाले. * या व्हिडिओत, उत्कृष्ट शास्त्रवचनीय सल्ला, तरुण ख्रिश्चनांचे मनोगत आणि बायबलमधील दीनाच्या अहवालावर आधारित एक आधुनिक नाटक आहे जे अतिशय हृदयस्पर्शी आहे. (उत्पत्ति अध्याय ३४) व्हिडिओविषयीचे पुढील मनोगत मेक्सिकोहून आले आहेत.
मार्ता म्हणते: “या व्हिडिओने जणू काय माझ्या हृदयाला स्पर्श केला. मला वाटलं, की हा व्हिडिओ माझ्यासाठीच बनवला होता. माझ्या शिक्षकांना आणि शाळासोबत्यांना, मी एक यहोवाची साक्षीदार आहे इतकं माहीत असणं पुरेसं आहे असं पूर्वी मला वाटायचं. पण त्यांना साक्ष देऊन हे सिद्ध करून दाखवण्यास मी चुकले. यहोवा पुरवत असलेल्या सर्व माहितीबद्दल, जसे की खासकरून या व्हिडिओत असलेल्या व आपल्या मनाला स्पर्श करणाऱ्या माहितीबद्दल मी त्याचे आभार मानते.”
ह्वान कार्लोस म्हणतो: “हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतो. मी माझ्या तारुण्यात काही चुका केल्या आहेत आणि नाटकातील काही पात्रांद्वारे त्या जेव्हा दाखवण्यात आल्या तेव्हा त्या लगेच मला जाणवल्या. काही वर्षांपूर्वी मी दुहेरी जीवन जगत होतो, पण नंतर मला समजलं की अशा प्रकारच्या जीवनशैलीचे वाईट परिणाम होऊ शकतात. हा व्हिडिओ पाहिल्यापासून मी यहोवाशी विश्वासू राहण्याचा निश्चय केला आहे.”
सुलेम कबूल करते: “हा व्हिडिओ पाहिल्यावर माझ्या भावनांना जणू चेतना मिळाली. पूर्वी, मी बायबल वाचण्याचं सोडून दिलं होतं आणि मी यहोवाला नियमित प्रार्थना करत नव्हते. पण या व्हिडिओतील तरुणांनी काढलेले उद्गार ऐकल्यावर मला बायबलचा अभ्यास करण्याचं आणि यहोवाला नियमित प्रार्थना करण्याचं प्रोत्साहन मिळालं.”
तरुणांना आज अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते आणि त्यांनी निवडलेल्या मित्रांचा त्यांच्या जीवनशैलीवर जबरदस्त प्रभाव पडतो. (स्तोत्र २६:४; नीतिसूत्रे १३:२०) या बाबतीत योग्य निर्णय घेण्यासाठी तरुण लोक विचारतात—मला खरे मित्र कसे बनवता येतील? (इंग्रजी) हा व्हिडिओ अनेकांना मदत करीत आहे.
[तळटीप]
^ परि. 2 यहोवाच्या साक्षीदारांनी तयार केला आहे.