व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

इब्री लोकांस २:१४ [NW] मध्ये, सैतानाला “मरण घडवून आणणारा” असे का म्हटले आहे?

थोडक्यात सांगायचे तर, पौलाला असे म्हणायचे होते, की सैतान व्यक्‍तिशः किंवा आपल्या हस्तकांमार्फत मानवांचा शारीरिक मृत्यू घडवून आणू शकतो. याच अनुषंगाने येशूने, सैतान “प्रारंभापासून मनुष्यघातक” आहे असे म्हटले.—योहान ८:४४.

इब्री लोकांस २:१४ वचनाविषयी गैरसमज होण्याची शक्यता आहे कारण काही अनुवादांमध्ये, सैतानाला “मरणावर सत्ता” आहे, किंवा “मृत्यूचे सामर्थ्य” आहे असा अनुवाद करण्यात आला आहे. (मराठी कॉमन लँग्वेज; मराठी सुबोध भाषांतर; पं.र.भा.; ईजी-टू-रीड व्हर्शन) या अनुवादांमुळे असे वाटते, की सैतानाजवळ, त्याला वाटेल त्या व्यक्‍तीला ठार मारण्याचे असीमित सामर्थ्य आहे. परंतु, हे मुळीच बरोबर नाही. असे असते, तर सैतानाने नक्कीच यहोवाच्या सर्व उपासकांचा पृथ्वीवरून केव्हाच नायनाट केला असता.—उत्पत्ति ३:१५.

काही अनुवादांमध्ये “मरणावर सत्ता” गाजवणारा आणि न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन मध्ये “मरण घडवून आणणारा” असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे तो ग्रीक वाक्यांश, क्राटोसटुथानाटु हा आहे. टाऊथानाटाऊ या एका वाक्यांशाच्या रूपाचा अर्थ “मृत्यू” असा होतो. क्राटोस याचा मूळ अर्थ “शक्‍ती, बल, सामर्थ्य” असा होतो. नवीन कराराचा धर्मसिद्धांतिक कोश (इंग्रजी) नुसार, क्राटोस “शक्‍ती किंवा बल यांचा वापर नव्हे तर शक्‍ती किंवा बल यांचे अस्तित्व व महत्त्व” सूचित करतो. यास्तव, इब्री लोकांस २:१४ मध्ये पौल असे सूचित करत नव्हता, की सैतानाकडे मृत्यूचे संपूर्ण सामर्थ्य आहे. उलट तो हे दाखवत होता, की सैतानाजवळ मृत्यू घडवून आणण्याचे सामर्थ्य किंवा शक्यता आहे.

‘मृत्यू घडवून आणण्यासाठी’ सैतान आपल्या सामर्थ्याचा उपयोग कसा करतो? ईयोबाच्या पुस्तकात आपण एका प्रसंगाविषयी वाचतो जो एक अपवाद असू शकतो. तेथील अहवाल म्हणतो, की सैतानाने ईयोबाच्या मुलांचा ‘मृत्यू घडवून आणण्याकरता’ प्रचंड वाऱ्‍याचा उपयोग केला. पण या गोष्टीची नोंद घ्या, की सैतान असे केवळ यहोवाच्या परवानगीनेच करू शकत होता; आणि ही परवानगी यहोवाने त्याला यासाठी दिली होती, कारण एक अतिमहत्त्वपूर्ण वादविषयाचा निकाल लागणार होता. (ईयोब १:१२, १८, १९) होय, सैतान ईयोबाला ठार मारू शकला नाही. असे करण्याची त्याला परवानगी नव्हती. (ईयोब २:६) यावरून असे दिसते, की कधीकधी सैतानाने विश्‍वासू मानवांचा मृत्यू घडवून आणला असला तरी, त्याच्या मर्जीस येईल त्याला तो ठार मारू शकतो अशी भीती आपण बाळगण्याची गरज नाही.

सैतानाने मानवी हस्तकांमार्फतही मृत्यू घडवून आणला आहे. म्हणूनच तर अनेक ख्रिस्ती आपल्या विश्‍वासासाठी मरण पावले आहेत; काहींना माथेफिरू लोकांच्या समूहाने ठार मारले आहे किंवा सरकारी अधिकाऱ्‍यांच्या अथवा भ्रष्ट वकीलांच्या हुकूमामुळे अन्यायीपणे मृत्यूदंड देण्यात आला आहे.—प्रकटीकरण २:१३.

शिवाय, सैतानाने कधीकधी मानवी कमतरतांचा गैरफायदा घेऊन मृत्यू घडवून आणला आहे. इस्राएल लोकांच्या दिवसांत, संदेष्टा बलामाने मवाबी लोकांना असा सल्ला दिला की ते इस्राएली लोकांना “परमेश्‍वराशी फितुरी” करण्यास भुलवू शकतात. (गणना ३१:१६) यामुळे २३,००० पेक्षा अधिक इस्राएली लोक मृत्यूमुखी पडले. (गणना २५:९; १ करिंथकर १०:८) आजही, काही जण अशाचप्रकारे सैतानाच्या ‘डावपेचांना’ बळी पडतात आणि अनैतिक कृत्य करण्याचा किंवा इतर अभक्‍त कार्ये करण्याचा त्यांना मोह होतो. (इफिसकर ६:११) असे लोक लगेचच आपला प्राण गमवत नाहीत हे खरे आहे. पण, ते सार्वकालिक जीवनाची संधी गमावतात व अशाप्रकारे सैतान त्यांचा मृत्यू घडवून आणतो.

आपल्याला इजा पोहंचवण्याची सैतानाजवळ शक्‍ती आहे हे आपल्याला माहीत असले तरीसुद्धा आपण विनाकारण त्याच्याविषयीचे भय मनात बाळगण्याची गरज नाही. सैतानाजवळ मृत्यू घडवून आणण्याची शक्‍ती आहे असे जेव्हा पौलाने म्हटले तेव्हा त्याने असेही म्हटले की “सैतान, ह्‍याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्‍त करावे” म्हणून ख्रिस्त मरण पावला. (इब्री लोकांस २:१४, १५) होय, येशूने खंडणीची किंमत चुकती करून विश्‍वासू मानवजातीला पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वातून मुक्‍त केले आहे.—२ तीमथ्य १:१०.

सैतानाजवळ मृत्यू घडवून आणण्याची शक्‍ती आहे, यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज असली तरी, आपण हा आत्मविश्‍वास बाळगू शकतो, की यहोवा सैतानाने व त्याच्या हस्तकांनी आपल्याला पोहंचवलेली इजा भरून काढू शकतो. यहोवा आपल्याला आश्‍वासन देतो, की पुनरुत्थित येशू “सैतानाची कृत्ये नष्ट” करील. (१ योहान ३:८) यहोवाच्या शक्‍तीद्वारे येशू मृतांचे पुनरुत्थान करेल आणि मृत्यू नाहीसा करेल. (योहान ५:२८, २९) सरतेशेवटी तो, सैतानाला अथांग डोहात टाकून त्याची मर्यादित शक्‍ती नाट्यमयरीत्या उघडकीस आणील. मग त्याचा सर्वकाळासाठी नाश केला जाईल.—प्रकटीकरण २०:१-१०.