व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्वोच्च प्रतीची प्रीती

सर्वोच्च प्रतीची प्रीती

सर्वोच्च प्रतीची प्रीती

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये किंवा नव्या करारात बहुतांश वेळा, “प्रीती” हा शब्द आघापी या ग्रीक शब्दाचे भाषांतर आहे.

त्या संज्ञेचा अर्थ समजावून सांगताना, शास्त्रवचनावरील सूक्ष्मदृष्टी * (इंग्रजी) हा संदर्भ ग्रंथ म्हणतो: “[आघापी] म्हणजे लोकांचा समज असतो त्याप्रमाणे केवळ एका व्यक्‍तीसोबत जवळीक असल्यामुळे दाखवली जाणारी भावनाविवशता नाही तर जे योग्य आहे त्यानुसार दुसऱ्‍याचे हित खरोखर साधण्यासाठी तत्त्व, कर्तव्य आणि उचितपणामुळे मुद्दामहून इच्छेनुसार वागण्यावर आधारित असलेली ती नैतिक किंवा सामाजिक स्वरूपाची प्रीती आहे. आघापी (प्रीती), आपसांतील वैरभावाच्या पलीकडे जाते व वैरभावामुळे कोणालाही योग्य तत्त्वांचा त्याग करण्यास किंवा जशास तशी वागणूक देण्यास अनुमती देत नाही.”

आघापी यात गहिरी भावना देखील असू शकते. प्रेषित पेत्राने आर्जवले, “मुख्य म्हणजे एकमेकांवर जीवेभावे प्रेम करीत राहा.” (१ पेत्र ४:८, मराठी आर.व्ही.) त्यामुळे असे म्हणता येईल की, आघापीमध्ये हृदय आणि मन दोन्ही सामील होतात. या उत्कृष्ट प्रतीच्या प्रीतीची शक्‍ती आणि व्यापकता दाखवणारी काही शास्त्रवचने आपण पाहू या. पुढील संदर्भ उपयुक्‍त ठरतील: मत्तय ५:४३-४७; योहान १५:१२, १३; रोमकर १३:८-१०; इफिसकर ५:२, २५, २८; १ योहान ३:१५-१८; ४:१६-२१.

[तळटीपा]

^ परि. 3 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.