व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सांत्वन धावा करणाऱ्‍यांना

सांत्वन धावा करणाऱ्‍यांना

सांत्वन धावा करणाऱ्‍यांना

बायबल हे मानसशास्त्राचे पुस्तक नाही. तरीपण ते वाचल्याने आपल्याला सांत्वन मिळते आणि आपल्याला अनेक त्रास भोगावे लागत असले तरीसुद्धा जीवनाचा आनंद लुटण्यास ते आपल्याला मदत करते. वास्तविकतेत, शास्त्रवचने असे म्हणतात: “स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो.” (ईयोब १४:१) आपल्या स्वतःच्या अपरिपूर्णताच आपल्या काही परीक्षांना कारणीभूत ठरतात. परंतु मानवाला सहन कराव्या लागणाऱ्‍या दुःखास प्रामुख्याने कोण कारणीभूत आहे?

बायबल त्याची ओळख, दियाबल व सैतान म्हटलेला एक दुष्ट आत्मिक व्यक्‍ती, अशी करते. तो ‘सर्व जगाला ठकवित’ आहे आणि मानवजातीच्या पीडादायक त्रासाला तोच जबाबदार आहे. पण बायबल आपल्याला असेही सांगते की सैतान जास्त काळ राहणार नाही. (प्रकटीकरण १२:९, १२) लवकरच, देव हस्तक्षेप करून पृथ्वीच्या रहिवाशांवर सैतानाने आणलेल्या सर्व दुःखापासून त्यांना मुक्‍त करणार आहे. बायबलमध्ये, ज्यात नीतिमत्त्व वास करीते असे नवे जग येईल, हे अभिवचन देव देतो; हे जग, निराशा व हताशा असलेल्या जगाची जागा घेईल.—२ पेत्र ३:१३.

मानवाला सहन करावा लागणारा त्रास हा तात्पुरता आहे, हे माहीत होणे किती सांत्वनदायक आहे! येशू ख्रिस्ताच्या अधिकारात असलेल्या देवाच्या स्वर्गीय राज्य शासनात, अन्याय व दुःख कायमचे निघून जाईल. देवाच्या नियुक्‍त राजाविषयी शास्त्रवचनांमध्ये म्हटले आहे, की: “धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्‍यांना तो सोडवील. दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर तो दया करील, दरिद्र्‌यांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्‍त अमोल ठरेल.”—स्तोत्र ७२:१२-१४.

या भविष्यसूचक शब्दांच्या पूर्णतेचा काळ फार जवळ आला आहे. परादीस पृथ्वीवर सुखी परिस्थितीत आपण सार्वकालिक जीवनाचा आनंद लुटू शकू. (लूक २३:४३; योहान १७:३) शास्त्रवचनांतील या सांत्वनदायक अभिवचनांविषयीची माहिती मिळाल्यामुळे, धावा करणाऱ्‍यांना आशा व सांत्वन मिळते.

[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]

तणावग्रस्त मुलगी: Photo ILO/J. Maillard