व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरी उपासना कुटुंबात ऐक्य आणते

खरी उपासना कुटुंबात ऐक्य आणते

खरी उपासना कुटुंबात ऐक्य आणते

मारीया १३ वर्षांची होती जेव्हा तिने व तिची धाकटी बहीण लूसी, हिने आपल्या एका नातेवाईकाकडून यहोवाविषयी ऐकले; त्याने पृथ्वीवरील परादीसविषयी देखील सांगितले होते. उत्सुकतेपोटी त्या यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात गेल्या. तिथे दिलेल्या स्पष्ट सूचना ऐकून मारीया प्रभावित झाली. हे चर्चपासून किती वेगळे होते, कारण चर्चमध्ये बहुतेकदा नुसती गाणीच गायिली जायची! काही काळातच, या दोघी, यहोवाची साक्षीदार असलेल्या एका बहिणीबरोबर बायबलचा अभ्यास करू लागल्या.

त्यांचा थोरला भाऊ युगो याला तत्त्वज्ञान आणि उत्क्रांतीवाद यांत आवड होती. तो स्वतःला नास्तिक समजायचा. पण लष्करी सेवा करताना त्याने जीवन—कसे आले? उत्क्रांतीने की उत्पत्तीने? (इंग्रजी) * हे पुस्तक वाचले. त्याला अशा प्रश्‍नांची उत्तरे मिळाली जी इतर कोणताही धर्म देऊ शकत नव्हता. आपली लष्करी सेवा पूर्ण केल्यानंतर त्याने, नव्याने गवसलेला देवाविषयीचा विश्‍वास आणखी वाढवण्यासाठी आपल्या बहिणींबरोबर बायबलचा अभ्यास करण्यास व सभांना जाण्यास सुरवात केली. सत्याविषयी प्रथम ऐकल्यानंतर दोन वर्षांनी अर्थात १९९२ मध्ये मारीया आणि लूसीचा बाप्तिस्मा झाला आणि याच्या दोन वर्षांनंतर युगोचा बाप्तिस्मा झाला.

या दरम्यान, कॅथलिक परंपरा आचरणाऱ्‍या त्यांच्या पालकांनी सत्यात कसलीच आवड दाखवली नाही. त्यांना यहोवाच्या साक्षीदारांचा राग यायचा खरा परंतु, आपली मुले ज्या तरुण साक्षीदारांना घरी बोलवत असत त्या तरुणांच्या उत्तम आचरणाची आणि सभ्य पेहरावाची ते प्रशंसा करायचे. शिवाय, जेवणाच्या वेळी, ही मुले सभांमध्ये शिकलेल्या गोष्टींची चर्चा करायचे तेव्हा या पालकांची उत्सुकता वाढू लागली.

परंतु दोघांनाही जादूटोण्याची आवड होती. वडील दारूडे होते आणि ते आईला मारहाण करायचे. हे कुटुंब विभक्‍त होण्याच्या मार्गावर होते. मग, दारू पिऊन धिंगाणा केल्यामुळे वडिलाला दोन आठवडे तुरुंगाची हवा खावी लागली. तुरूंगात असताना त्यांनी बायबल वाचायला सुरवात केली. वाचता वाचता त्यांनी शेवटल्या दिवसांविषयी येशूने दिलेल्या चिन्हांविषयी वाचले. त्यांच्या डोक्यात प्रश्‍नांचे मोहळ उठले; आई-वडील दोघेही राज्य सभागृहात जाऊ लागले आणि त्यांनी गृह बायबल अभ्यास स्वीकारला. सत्य शिकल्यावर त्यांनी भुताटकीवर असलेली सर्व पुस्तके नष्ट केली आणि यहोवाचे नाव घेतल्यामुळे त्यांना दुरात्मिक हल्ल्यांपासून सुटका मिळाली. आपल्या व्यक्‍तिमत्त्वात ते बरेच बदल करू लागले.

१९९९ साली, बोलिव्हिया येथे झालेल्या एका प्रांतीय अधिवेशनांत युगोला, आपल्या आई-वडिलांना बाप्तिस्मा देत असल्याचे पाहून मारीया आणि लूसीला कसे वाटले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? नऊ वर्षांआधी मारीया आणि लूसीने यहोवा व त्याच्या अभिवचनांबद्दल पहिल्यांदा ऐकले होते. आता, आपला भाऊ युगो याच्याबरोबर त्याही पूर्ण-वेळेच्या सेवेत आहेत. खऱ्‍या उपासनेने त्यांच्या कुटुंबात ऐक्य आणल्यामुळे ते सर्वजण आज आनंदी आहेत!

[तळटीप]

^ परि. 3 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.