व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकच ‘खरे चर्च’ आहे का?

एकच ‘खरे चर्च’ आहे का?

एकच ‘खरे चर्च’ आहे का?

“जसा एकच ख्रिस्त आहे, तसेच ख्रिस्ताचे एकच शरीर आहे, ख्रिस्ताची एकच वधू अर्थात ‘एकच कॅथलिक व प्रेषितीय चर्च’ आहे.”—डोमिनूस येसूस.

असे म्हणून, योसेफ रॅटझिंगर नावाच्या एका रोमन कॅथलिक कार्डिनलने आपल्या चर्चची ही शिकवण दिली, की एकच खरे चर्च असू शकते. हे चर्च, “ख्रिस्ताचे एकच चर्च आहे, आणि ते म्हणजे कॅथलिक चर्च,” असे ते म्हणाले.

“खऱ्‍या अर्थाने चर्चेस नाहीत”

डोमिनूस येसूस या लेखात “इतर धर्मांना कमी लेखले नव्हते किंवा त्यांच्याबद्दल अनादराची भावना नव्हती” असा पोप जॉन पॉल दुसरे यांनी दावा केलेला असला तरी, प्रॉटेस्टंट चर्चच्या नेत्यांनी यावर कडाडून प्रतिक्रिया व्यक्‍त केली. जसे की, जून २००१ साली, उत्तर आयर्लंडच्या बेलफास्ट येथे भरवण्यात आलेल्या प्रिसबेटेरियन जनरल असेंब्लीत एका पाद्रीने म्हटले, की डोमिनूस येसूस हा लेख, “रोमन कॅथलिक चर्चमधील एका शक्‍तिशाली गटाने तयार केला आहे . . . जो, दुसऱ्‍या व्हॅटिकन सभेत मांडलेल्या मोकळ्या मताने अवाक झाला आहे.”

चर्च ऑफ आर्यलंडचे बिशप रॉबिन एम्स यांनी म्हटले, की हा लेख “दुसऱ्‍या व्हॅटिकन सभेच्या आधीच्या विचारसरणीचा असेल” तर मी “खूपच निराश” होईन. विशिष्ट कॅथलिक सिद्धान्त अमान्य करणारे चर्चेस, “खऱ्‍या अर्थाने चर्चेस नाहीत” या व्हॅटिकनच्या दाव्यावर मत मांडताना एम्स म्हणाले, की “हे मला अपमानजनक वाटते.”

डोमिनूस येसूस मागचा हेतू काय होता? असे दिसते, की रोमन कॅथलिक क्यूरिया, ज्याला धार्मिक सापेक्षतावाद म्हणतात त्यावर निराश होते. आयरीश टाईम्सनुसार, “सर्व धर्म चांगले आहेत या बहुसत्तावादी सिद्धान्ताच्या उगमामुळे, कार्डिनल रॅटझिंगर अस्वस्थ झाले आहेत.” असे दिसते, की धार्मिक सापेक्षतावादाचा विषय निघाल्यामुळे, त्यांनी एकाच खऱ्‍या चर्चविषयी टिपणी मांडली.

तुम्ही कोणत्या चर्चचे आहात हे महत्त्वाचे आहे का?

अर्थात, काहींना, एकच खरे चर्च असू शकते असे सुचवण्यापेक्षा “धार्मिक सापेक्षतावाद” किंवा “बहुसत्तावादी सिद्धान्त” जास्त तर्कशुद्ध व आकर्षक वाटतो. अशा लोकांसाठी धर्म हा पूर्णपणे व्यक्‍तिगत आवडीचा प्रश्‍न असला पाहिजे. सरतेशेवटी ते म्हणतात, ‘तुम्ही कोणत्या चर्चचे आहात हे महत्त्वाचे नाही.’

असा दृष्टिकोन, अधिक सोशिक वाटेल; मग याचा एक परिणाम, धर्माचे हजारो तुकडे होऊन विभिन्‍न पंथ निर्माण झाले तरीसुद्धा. काही जण म्हणतील: ‘धर्मातील अशाप्रकारची विभिन्‍नता ही व्यक्‍तिगत स्वातंत्र्याची केवळ एक महत्त्वपूर्ण अभिव्यक्‍ती आहे.’ परंतु, स्टीव्ह ब्रुस नावाच्या एका लेखकानुसार, अशाप्रकारचा “धार्मिक सोशिकपणा” वास्तविकतेत, “धार्मिक बेफिकीरपणा” आहे.—विभाजित घर: प्रोटेस्टंटवाद, विभाजन आणि धर्मनिरपेक्षीकरण.

मग उचित दृष्टिकोन काय आहे? एकच खरे चर्च आहे का? आणि ते एकच चर्च म्हणजे फक्‍त रोमन कॅथलिक चर्च का? इतर चर्चेस देवाला तितकेच मान्य आहेत का? या सर्व प्रश्‍नांचा संबंध, निर्माणकर्त्याबरोबरील आपल्या नातेसंबंधाशी असल्यामुळे, या बाबतीत त्याचा काय दृष्टिकोन आहे हे माहीत करून घेणे महत्त्वाचे आहे. ते आपण कसे करू शकतो? देवाचे प्रेरित वचन बायबल यात परीक्षण करण्याद्वारे. (प्रेषितांची कृत्ये १७:११; २ तीमथ्य ३:१६, १७) एकाच खऱ्‍या चर्चविषयी बायबल काय म्हणते त्याचा आपण विचार करू या.