गरिबांचा खरा वाली
गरिबांचा खरा वाली
येशू ख्रिस्त, देवाचा पुत्र पृथ्वीवर होता तेव्हा त्याने गरिबांना मदत करण्यात मनापासून आवड बाळगली. येशूच्या सेवेविषयी, एका साक्षीदाराने म्हटले: “आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांस सुवार्ता सांगण्यात येते.” (मत्तय ११:५) पण आज जे लाखो गरीब लोक आहेत त्यांच्याबद्दल काय? त्यांच्यासाठी कोणती आनंदाची बातमी आहे का? होय, त्यांच्यासाठी एक आशेचा संदेश आहे.
जगातील लोक, सर्वसामान्यपणे गरीब लोकांकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना विसरून जातात; परंतु देवाचे वचन बायबल असे वचन देते: “कंगालाचे नेहमीच विस्मरण होणार नाही दीनांच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही.” (स्तोत्र ९:१८) या सांत्वनदायक शब्दांची पूर्ती, देवाचे राज्य अर्थात एक अस्सल स्वर्गीय सरकार जेव्हा सर्व मानवी शासनांची जागा घेईल तेव्हा होईल. (दानीएल २:४४) त्या स्वर्गीय सरकारचा राजा या नात्याने येशू, ‘दुबळे व दरिद्री ह्यांच्यावर दया करील, दरिद्रयांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्यांपासून त्यांचे जीव तो मुक्त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्त अमोल ठरेल.’—स्तोत्र ७२:१३, १४.
ख्रिस्त पृथ्वीवर राज्य करेल तेव्हा परिस्थिती कशी असेल? ख्रिस्ताच्या राज्यातील प्रजेला आपल्या हातच्या परिश्रमाचे फळ खायला मिळेल. मीखा ४:३, ४ येथे बायबल म्हणते: “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही; कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.” देवाचे राज्य आजारपण आणि मृत्यू याजशी संबंधित असलेल्या सर्व समस्यांचे निरसन करील. (यशया २५:८) किती वेगळे तेव्हाचे ते जग असेल! आपण बायबलमधील या अभिवचनांवर विश्वास ठेवू शकतो कारण स्वतः देवाने ही वचने दिली आहेत.
आशेचा संदेश देण्याव्यतिरिक्त बायबल आपल्याला, दैनंदिन समस्यांचा सामना कसा करायचा ते शिकवते; जसे की गरीब असल्यामुळे स्वाभीमान गमावल्याच्या भावनेवर कसे मात करायचे. बायबलचा अभ्यास केल्यावर एखाद्या गरजू ख्रिश्चन व्यक्तीला कळते, की तोही श्रीमंत असलेल्या ख्रिश्चन व्यक्तीप्रमाणेच देवाच्या नजरेत मौल्यवान आहे. बायबलमधील ईयोब नावाच्या पुस्तकात म्हटले आहे, की देव “श्रीमंताला गरिबांहून अधिक मानीत नाही, (कारण ते सर्व त्याच्या हाताने निर्माण झाले आहेत.)” (ईयोब ३४:१९) देव दोघांवरही सारखेच प्रेम करतो.—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.