व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वृद्ध सहविश्‍वासू बंधूभगिनींचा तुम्ही मान राखता का?

वृद्ध सहविश्‍वासू बंधूभगिनींचा तुम्ही मान राखता का?

वृद्ध सहविश्‍वासू बंधूभगिनींचा तुम्ही मान राखता का?

प्राचीन इस्राएलच्या लोकांबरोबर देवाने करार केला तेव्हा त्यांना अशी आज्ञा देण्यात आली होती: “पिकल्या केसासमोर उठून उभा राहा; वृध्दाला मान दे; आपल्या देवाचे भय बाळग.” (लेवीय १९:३२) वृद्धांबद्दल आदर बाळगणे हे एक पवित्र कर्तव्य होते, देवाच्या अधीन राहण्याशी त्याचा जवळून संबंध होता. आज ख्रिस्ती लोक मोशेच्या नियमशास्त्राधीन नसले तरीसुद्धा, यावरून यहोवा आपल्या वृद्ध सेवकांना मौल्यवान व किमती समजत असल्याची आठवण आपल्याला करून दिली जाते. (नीतिसूत्रे १६:३१; इब्री लोकांस ७:१८) आपला देखील यहोवाप्रमाणे दृष्टिकोन आहे का? आपण आपल्या वृद्ध ख्रिस्ती बंधूभगिनींना मौल्यवान समजतो का?

त्याने आपल्या वृद्ध मित्राला मौल्यवान समजले

बायबलमध्ये वृद्धांबद्दल आदर दाखवण्यावर जोर देणारा एक अहवाल दुसरे राजे नावाच्या पुस्तकात आहे. या अहवालात, संदेष्टा एलीया नंतर, त्याच्यापेक्षा वयाने तरुण असलेला अलीशा संदेष्टा कसा झाला त्याचे वर्णन दिले आहे. इस्राएलच्या दहा-गोत्र राज्यात एलीयाने संदेष्टा या नात्याने शेवटल्या दिवशी सेवा केली तेव्हा काय झाले त्याचा विचार करा.

त्या दिवशी यहोवाने, वृद्ध संदेष्टा एलीयाला, गिलगालहून बेथेलला, बेथेलहून यरीहोला आणि यरीहोहून यार्दन नदीपर्यंत प्रवास करण्यास सांगितले. (२ राजे २:१, २, ४, ६) जवळजवळ ३० किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान एलीयाने तीन वेळा अलीशाला आपल्या बरोबर न येण्याची गळ घातली. परंतु, अनेक शतकांपूर्वी रूथने जसे नामीला सोडावयास नकार दिला त्याचप्रकारे अलीशाने वृद्ध संदेष्टा एलीयाला सोडून जाण्यास नकार दिला. (रूथ १:१६, १७) अलीशाने तीन वेळा असे म्हटले: “परमेश्‍वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडावयाचा नाही.” (२ राजे २:२, ४,) त्या क्षणापर्यंत, अलीशाने एलीयाला सहा वर्षांपर्यंत साहाय्य केले होते. पण तो पुढेही होता होईल तितक्या काळापर्यंत त्याची सेवा करू इच्छित होता. अहवाल पुढे म्हणतो: “ते बोलत चालले असता, पाहा, . . . एलीया वावटळीतून स्वर्गास गेला.” (वचन ११) इस्राएलमध्ये एलीयाच्या सेवेच्या अगदी शेवटल्या घटकेपर्यंत, एलीया आणि अलीशा एकमेकांबरोबर बोलत होते. तरुण संदेष्टा अलीशा, वृद्ध व आपल्यापेक्षा अधिक अनुभवी असलेल्या एलीया संदेष्ट्याकडून होता होईल तितके प्रशिक्षण व उत्तेजन प्राप्त करण्यास आतुर होता. होय, त्याने आपल्या वृद्ध मित्राला मौल्यवान समजले.

‘बापासमान व मातासमान’

अलीशाचे वृद्ध एलीयावर मित्र म्हणून, नव्हे आध्यात्मिक पिता म्हणून इतके प्रेम का होते ते समजणे कठीण नाही. (२ राजे २:१२) इस्राएलमधील एलीयाची नेमणूक संपण्याच्या थोड्या काळाआधी तो अलीशाला म्हणाला: “मला तुजपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुजसाठी काय करू ते मला सांग.” (वचन ९) अगदी शेवटपर्यंत, एलीयाने आपल्या वारसाच्या आध्यात्मिक कल्याणाबद्दल आणि देवाचे कार्य पुढे चालू राहावे म्हणून कळकळ व्यक्‍त केली.

आज, आपले वृद्ध ख्रिस्ती बंधूभगिनी अशाचप्रकारे, त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांना ज्ञानाच्या व बुद्धीच्या अनेक गोष्टी सांगून कळकळ व्यक्‍त करतात, हे पाहून आपल्याला किती आनंद वाटतो. उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरांत अनेक वर्षांपासून सेवा करणारे स्वयंसेवक, बेथेल कुटुंबात सामील होणाऱ्‍या नवीन सदस्यांना, आपली सेवा पार पाडण्यासाठी लागणारी कौशल्ये प्राप्त करण्यास स्वखुशीने मदत करतात. तसेच, अनेक वर्षांपासून मंडळ्यांना भेटी देणारे प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नी, प्रवासी पर्यवेक्षक म्हणून ज्यांना प्रशिक्षण दिले जाते त्यांना आपल्या अनुभवाच्या संपत्तीचा वाटा आनंदाने देतात. याशिवाय, संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांत शतकानुशतकांपासून यहोवाची विश्‍वासू सेवा करत असलेले वृद्ध बांधव आणि भगिनी आहेत ज्यांना, मंडळीत येणाऱ्‍या नवीन सदस्यांना आपल्या व्यावहारिक बुद्धीचा व अनुभवाचा वाटा देण्यास आनंद वाटतो.—नीतिसूत्रे २:७; फिलिप्पैकर ३:१७; तीत २:३-५.

हे प्रेमळ वृद्ध ख्रिश्‍चन, काळजी दाखवत असल्यामुळे, त्यांचा मान राखण्यास आपल्याला मनापासून आनंद वाटतो. यास्तव, वृद्ध सहविश्‍वासू बंधूभगिनींचा मनापासून मान राखण्यासंबंधी अलीशाने मांडलेल्या उदाहरणाचे आपण पालन केले पाहिजे. प्रेषित पौल आपल्याला आठवण करून देतो त्याप्रमाणे आपण, “वडील माणसाला . . . बापासमान” तर “वडील स्त्रियांस मातासमान” मानू या. (१ तीमथ्य ५:१, २) असे केल्याने आपण, संपूर्ण जगभरातील ख्रिस्ती मंडळ्यांच्या उचित कार्यास व प्रगतीस मोठा हातभार लावू.

[३० पानांवरील चित्र]

अलीशा, होता होईल तितक्या काळपर्यंत एलीयाची सेवा करू इच्छित होता

[३१ पानांवरील चित्रे]

वृद्ध ख्रिश्‍चनांपासून, त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेले पुष्कळ काही शिकू शकतात