व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आधी आणि पश्‍चात बायबलमुळे या मनुष्याच्या जीवनात बदल कसा झाला

आधी आणि पश्‍चात बायबलमुळे या मनुष्याच्या जीवनात बदल कसा झाला

“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल”

आधी आणि पश्‍चात बायबलमुळे या मनुष्याच्या जीवनात बदल कसा झाला

रॉल्फ मिखाएलसाठी संगीत म्हणजे जीव की प्राण. मादक पदार्थांचे त्याला वेड लागले होते. जर्मनीत, तरुणपणी त्याने मोठ्या प्रमाणात मद्यार्काचे सेवन केले होते, एलएसडी, कोकेन, हाशिश आणि नशा आणणाऱ्‍या पदार्थांचे अनिर्बंधपणे सेवन केले होते.

एका आफ्रिकन देशात ड्रग्ज चोरून नेत असताना रॉल्फ-मिखाएलला अटक करण्यात आली आणि १३ महिने तो तुरुंगात होता. तुरुंगात असताना त्याला जीवनाच्या खऱ्‍या उद्देशाचा विचार करायची संधी मिळाली.

रॉल्फ-मिखाएलने आणि त्याची पत्नी उर्सुला हिने, जीवनाचा उद्देश समजण्याचा व सत्य शोधण्याचा बराच प्रयत्न केला. ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍या चर्चेसकडून दुःखद अनुभव आले असतानाही त्यांना देव कोण आहे हे जाणून घ्यायची तीव्र इच्छा होती. त्यांच्या मनात अनेक प्रश्‍न होते पण विविध धार्मिक गटांकडून त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नव्हती. शिवाय, या धर्मांनी त्यांना त्यांच्या जीवनात बदल करण्याची कोणतीही शक्‍तिशाली प्रेरणा दिली नव्हती.

सरतेशेवटी, रॉल्फ-मिखाएल आणि उर्सुला यांचा यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क आला. बायबलचा अभ्यास सुरू केल्यानंतर, रॉल्फ-मिखाएलला पुढील सल्ला खूप भावला: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.” (याकोब ४:८) त्याने आपल्या ‘पुर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा त्याग करून सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करण्याचा’ निश्‍चय केला.—इफिसकर ४:२२-२४.

रॉल्फ-मिखाएल नवे मनुष्यत्व धारण कसे करू शकला? त्याला बायबलमधून हे दाखवण्यात आले, की ‘अचूक ज्ञानाद्वारे’ एखाद्या व्यक्‍तीचे व्यक्‍तिमत्त्व ‘आपल्या निर्माणकर्त्याच्या [यहोवा देवाच्या] प्रतिरूपाप्रमाणे . . . नवे केले जाऊ शकते.’—कलस्सैकर ३:९-११.

अचूक ज्ञान घेत असताना रॉल्फ-मिखाएलने देवाच्या वचनातील तत्त्वांच्या एकवाक्यतेत आपले जीवन आणण्याचा प्रयत्न केला. (योहान १७:३) रॉल्फ-मिखाएलला ड्रग्ज घेण्याचे थांबवणे कठीण जात होते; पण त्याने या गोष्टीबद्दल यहोवाला प्रार्थना करण्याचे आणि यहोवाचे साहाय्य अनुभवण्याचे मूल्य जाणले. (१ योहान ५:१४, १५) यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास झटत असलेल्या आधीपासूनच यहोवाचे साक्षीदार असलेल्यांबरोबर सहवास राखल्याने रॉल्फ-मिखाएलला आणखी मदत मिळाली.

हे जग नाहीसे होत चालले आहे आणि देवाची इच्छा करणारे सदासर्वकाळ राहतील हे माहीत झाल्यावरही रॉल्फ-मिखाएलला बरीच मदत झाली. यामुळे त्याला, जगाबद्दल तात्पुरते प्रेम निवडण्यापेक्षा प्रेमळ देव यहोवा याच्याशी जवळचा नातेसंबंध जोडल्याने मिळणारे चिरकाल आशीर्वाद निवडण्यास मदत मिळाली. (१ योहान २:१५-१७) नीतिसूत्रे २७:११ मधील या शब्दांचा रॉल्फ-मिखाएलवर गहिरा परिणाम झाला: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्‍यास मी प्रत्युत्तर देईन.” कृतज्ञ अंतःकरणाने तो आता म्हणतो: “या वचनावरून यहोवाच्या प्रीतीची सखोलता दिसते; कारण, त्याचे मन आनंदित करण्याची तो मानवांना संधी देतो.”

रॉल्फ-मिखाएल, त्याची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांप्रमाणे हजारो लोकांना बायबलच्या तत्त्वांनुसार जीवन जगल्याने फायदा झाला आहे. हे लोक तुम्हाला संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमध्ये दिसून येतील. दुःखाची गोष्ट अशी, की काही देशांमध्ये साक्षीदारांवर असा आरोप लावला जातो की ते एका घातक पंथाचे सदस्य आहेत जे कुटुंबे मोडतात. परंतु, रॉल्फ-मिखाएलचा अनुभव तर हा आरोप खोटा असल्याचे सिद्ध करतो.—इब्री लोकांस ४:१२.

रॉल्फ-मिखाएल म्हणतो, की आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देण्याविषयी असलेले मत्तय ६:३३ हे वचन, त्याच्या कुटुंबाचे योग्य मार्गदर्शन करणारे जणू “होकायंत्र” आहे. तो आणि त्याचे कुटुंब, ख्रिस्ती या नात्याने, अनुभवत असलेल्या सुखी कौटुंबिक जीवनाबद्दल यहोवाचे मनापासून आभार मानतात. “परमेश्‍वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ?” असे गाणाऱ्‍या स्तोत्रकर्त्याप्रमाणे त्यांनाही वाटते.—स्तोत्र ११६:१२.

[९ पानांवरील संक्षिप्त आशय]

देव मानवांना त्याचे मन आनंदित करण्याची संधी देतो

[९ पानांवरील चौकट]

बायबल तत्त्वांचा परिणाम

अनेकांना घातक सवयी सोडण्यास प्रेरित करणाऱ्‍या बायबल तत्त्वांपैकी काही पुढीलप्रमाणे आहेत:

“अहो परमेश्‍वरावर प्रीति करणाऱ्‍यांनो, वाइटाचा द्वेष करा.” (स्तोत्र ९७:१०) घातक प्रथांच्या वाईटपणाची खात्री पटून त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण केल्यानंतर एखाद्या व्यक्‍तीला देव ज्याने संतुष्ट होतो ते करायला सोपे जाते.

सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०) ड्रग्ज आणि इतर वाईट सवयींना नकार देण्यासाठी एखाद्या व्यक्‍तीने काळजीपूर्वक आपले सोबती निवडले पाहिजेत. वाईट सवयींचा प्रतिकार करण्यास मदत करणाऱ्‍या ख्रिश्‍चनांबरोबर मैत्री केल्यास बराच फायदा होतो.

“कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) अशाप्रकारची मानसिक शांती कोणत्याही कृत्रिम गोष्टींपासून मिळत नाही. आणि देवावर विसंबून राहिल्याने एखाद्याला जीवनातील समस्या, व्यसन जडवणाऱ्‍या ड्रग्जचा वापर न करता सोडवण्यास मदत मिळते.