व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वचने पूर्ण होतील तेव्हा

वचने पूर्ण होतील तेव्हा

वचने पूर्ण होतील तेव्हा

इतिहास, अपुऱ्‍या वचनांनी भरलेला आहे. राष्ट्रांनी, इतर राष्ट्रांचे आक्रमण टाळण्यासाठी गंभीरपणे वचने दिली परंतु ती पूर्ण केली नाहीत यामुळे त्यांच्या लोकांनी भयंकर युद्धे केली आहेत. नेपोलियनने एकदा असे म्हटले: “सरकारांवर दबाव आणला जातो किंवा त्यांचा फायदा होणार असेल तेव्हाच ते आपली वचने पूर्ण करतात.”

लोकांनी दिलेल्या वचनांविषयी काय? एखादी व्यक्‍ती दिलेले वचन पाळत नाही तेव्हा किती वाईट वाटते! खासकरून ती आपल्या ओळखीची किंवा आपण जिच्यावर भरवसा करतो अशी व्यक्‍ती असते तेव्हा. अर्थात, लोकांना आपले वचन एकतर पाळावयास जमत नसेल किंवा त्यांची इच्छा नसेल.

मानवांनी दिलेली वचने आणि देवाने दिलेली वचने यांत किती फरक आहे! देवाने दिलेली वचने पूर्णपणे खरी व विश्‍वासयोग्य असतात. देवाने दिलेले कोणतेही वचन खात्रीलायक असते. ते नक्कीच पूर्ण होते. देवाच्या अटळ वचनाविषयी यशया ५५:११ म्हणते: “त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”

मग, बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आलेल्या देवाने दिलेल्या वचनांना आपण कसे लेखले पाहिजे? आपण त्यांच्यावर नक्कीच भरवसा ठेवू शकतो. जसे की, प्रेषित योहानाने लिहिले: “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:३, ४) या आशीर्वादांचा आनंद तुम्ही तेव्हा लुटू शकाल जेव्हा तुम्ही येशूच्या पुढील शब्दांच्या अनुषंगात कार्य कराल: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.