तुम्ही “पराणीवर लाथ” मारत आहात का?
तुम्ही “पराणीवर लाथ” मारत आहात का?
बायबल काळात, प्राण्यांना वळण्यासाठी, टोकावर अणकुचीदार खिळा असलेल्या धातुच्या एका लांब दांड्याचा अर्थात पराणीचा उपयोग केला जाई. प्राण्याने जर या बोचण्याला जुमानले नाही तर परिणाम काय होत असे? आराम मिळण्याऐवजी तो प्राणी स्वतःलाच इजा करून घेत असे.
पुनरुत्थित येशूने, त्याच्या काही शिष्यांना अटक करायला निघालेल्या शौल नावाच्या एका मनुष्याला दर्शन दिले तेव्हा तो पराणींविषयी बोलला. डोळ्यांसमोर अंधारी आणणाऱ्या लख्ख प्रकाशातून शौलाने येशूला असे म्हणताना ऐकले: “शौला, शौला, माझा छळ का करितोस? पराणीवर लाथ मारणे तुला कठीण.” ख्रिश्चनांचा छळ करून शौल खरे तर देवाविरुद्ध लढत होता आणि यामुळे केवळ त्याचेच नुकसान होणार होते.—प्रेषितांची कृत्ये २६:१४.
आपणही कदाचित अजाणतेत “पराणीवर लाथ” मारत आहोत का? “ज्ञान्यांची वचने” पराण्यासारखी आहेत जी आपल्याला उचित मार्गाने चालण्यास वळवतात, असे बायबल म्हणते. (उपदेशक १२:११) देवाच्या वचनातील ईश्वरप्रेरित सल्ला आपल्याला उचित प्रकारे चालण्यास प्रवृत्त करू शकतो, मार्गदर्शित करू शकतो—पण आपण तसे करू दिले तरच. (२ तीमथ्य ३:१६) या वळणाचा आपण प्रतिकार केल्यास, आपलीच हानी होईल.
शौलाने येशूच्या शब्दांचे गांभिर्य जाणले, आपले मार्गाक्रमण बदलले आणि तो प्रेमळ ख्रिस्ती प्रेषित पौल बनला. देवाकडून मिळणाऱ्या सल्ल्याकडे आपण लक्ष दिल्यास आपल्याला देखील चिरकालिक आशीर्वाद मिळतील.—नीतिसूत्रे ३:१-६.
[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]
L. Chapons/Illustrirte Familien-Bibel nach der deutschen Uebersetzung Dr. Martin Luthers