व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न अनेक समाधानकारक उत्तरे मोजकी

प्रश्‍न अनेक समाधानकारक उत्तरे मोजकी

प्रश्‍न अनेक समाधानकारक उत्तरे मोजकी

नोव्हेंबर १, १७५५ रोजी, ऑल सेंट्‌स डेच्या निमित्ताने सकाळी, लिस्बन शहराचे बहुतेक रहिवासी चर्चमध्ये गोळा झालेले असताना त्या शहराला भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या, लाखो लोक ठार झाले.

या दुर्घटनेनंतर, फ्रेंच लेखक वोल्टे याने पोएम सुए ला डेझासट्रे द लिस्बॉन (लिस्बन दुर्घटनेवर काव्य) प्रकाशित केले ज्यात त्याने, लोकांच्या पापांमुळे देवाकडून शिक्षा म्हणून हे अरिष्ट आले होते हा दावा खोटा असल्याचे म्हटले होते. अशी संकटप्रसंगे मानवी समज किंवा स्पष्टीकरणाच्या पलीकडच्या आहेत असा दावा करत वोल्टेने लिहिले:

निसर्ग मूक आहे, आपण त्याला व्यर्थ प्रश्‍न करतो;

मानवजातीशी बोलणारा एक देव आपल्याला हवा आहे

देवाबद्दल शंका व्यक्‍त करणारा वोल्टे काही पहिला नव्हता. संपूर्ण मानव इतिहासात दुर्घटना घडतात, विपत्ती येतात तेव्हा लोकांच्या मनात प्रश्‍नांचे मोहळ उठते. हजारो वर्षांआधी, कुलपिता ईयोब ज्याची सर्व मुले ठार झाली आणि ज्याला एका भयंकर रोगाने ग्रासले होते त्याने विचारले: “[देवाने] कष्टी असलेल्याला उजेड व खिन्‍न आत्म्याला जीवन का दिले आहे.” (ईयोब ३:२०, पं.र.भा.) आज, इतके दुःख आणि अन्याय असताना एक चांगला व प्रेमळ देव शांत कसा राहू शकतो हा प्रश्‍न अनेकांना पडतो.

दुष्काळ, युद्ध, आजारपण आणि मृत्यू या वास्तविकतेचा सामना करावा लागल्यावर पुष्कळजण मानवजातीची काळजी करणारा निर्माणकर्ता आहे ही कल्पनाच थेट नाकारतात. एका नास्तिक तत्त्वज्ञान्याने म्हटले: “लहान मुलाला दुःख सोसायला लावणारा देव मुळीच निर्दोष नाही . . . तो अस्तित्वात नसेल तर गोष्ट वेगळी आहे.” दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान हिटलरने केलेले हत्याकांड यांसारख्या मोठ्या दुर्घटनांमुळेही असेच निष्कर्ष निघतात. एका यहुदी लेखकाने एका बातमीपत्रात असे म्हटले: “ऑश्‍वीट्‌झमध्ये घडलेल्या घटनेसाठी एक साधे सोपे स्पष्टीकरण हे की, मानवांच्या व्यवहारांमध्ये दखल घेण्यासाठी देव अस्तित्वातच नाही.” बहुसंख्य कॅथलिक असलेल्या फ्रान्स देशात घेतलेल्या १९९७ च्या एका सर्वेक्षणानुसार, सुमारे ४० टक्के लोक १९९४ साली रवांडा येथे झालेल्या जातीसंहारामुळे देवाच्या अस्तित्वाविषयी शंका करू लागले.

विश्‍वासाला अडसर?

वाईट गोष्टी रोखण्यासाठी देव हस्तक्षेप का करत नाही? ऐतिहासिक घटनांची नोंद ठेवणाऱ्‍या एका कॅथलिकाच्या मते, हा प्रश्‍न पुष्कळांच्या “विश्‍वासाला मोठा अडसर” आहे. तो विचारतो: “करोडो निष्पाप लोक ठार होताना आणि अखंड जातींच्या जातींचा संहार होताना मूग गिळून गप्प बसणाऱ्‍या व हे थांबवण्यासाठी काहीच न करणाऱ्‍या देवामध्ये खरोखर विश्‍वास करणे शक्य आहे का?”

अशाचप्रकारे, ला क्र्‌वा या कॅथलिक दैनिकातील एका अग्रलेखात असे म्हटले होते: “इतिहासातील दुर्घटना असोत, तंत्रज्ञानामुळे घडणाऱ्‍या घटना असोत, नैसर्गिक विपत्ती असोत, संघटित गुन्हेगारी असो किंवा आपल्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू असो; या प्रत्येक प्रसंगी सर्वांचे डोळे वरच उठतात. देव कोठे आहे? त्यांना उत्तर हवे असते. तो असंवेदनशील, बेपर्वा नाही का?”

पोप जॉन पॉल दुसरे यांनी साल्व्हीफीकी डोलोरीस या आपल्या १९८४ च्या प्रेषितीय पत्रात या विषयावर लिहिले. त्यांनी लिहिले: “जगाचे अस्तित्व मानवी नेत्रांना जणू देवाचे अस्तित्व, त्याची बुद्धी, शक्‍ती आणि महानता प्रदर्शित करत असले तरी दुष्टाई आणि दुःखामुळे त्याचे हे रूप झाकले जाते; काही वेळा याचा जोरदार परिणाम घडतो, खासकरून, अन्यायामुळे दुःख सोसावे लागण्याच्या असंख्य घटना घडतात आणि कितीतरी चुकीची कृत्ये शिक्षेविना सुटतात तेव्हा.”

बायबलनुसार सर्वप्रेमी आणि सर्वशक्‍तिशाली देवाचे अस्तित्व मानवी दुःखाने भरलेल्या स्थितीशी सुसंगत आहे का? एखाद्या व्यक्‍तीवरील किंवा सामूहिकरित्या दुर्घटना टाळण्यासाठी तो हस्तक्षेप करतो का? आज तो आपल्याकरता काही करतो का? या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्याकरता, वोल्टेच्या शब्दांत, “मानवजातीशी बोलणारा देव” आहे का? याचे उत्तर मिळवण्याकरता कृपया पुढील लेख वाचा.

[३ पानांवरील चित्रे]

१७५५ सालाच्या लिस्बनच्या नाशामुळे वोल्टेने असा दावा केला की, या घटना मानवी समजबुद्धीच्या पलीकडच्या आहेत

[चित्राचे श्रेय]

वोल्टे: From the book Great Men and Famous Women; लिस्बन: J.P. Le Bas, Praça da Patriarcal depois do terramoto de १७५५. Foto: Museu da Cidade/Lisboa

[४ पानांवरील चित्र]

रवांडामध्ये घडला त्याप्रमाणे जातीसंहारांच्या भयंकर परिणामांमुळे अनेकांना देवाच्या अस्तित्वाविषयी शंका वाटते

[चित्राचे श्रेय]

AFP PHOTO