व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

युक्रेनमधील यहोवाचे साक्षीदार एक विश्‍वासवर्धक व उत्तेजनदायक कहाणी

युक्रेनमधील यहोवाचे साक्षीदार एक विश्‍वासवर्धक व उत्तेजनदायक कहाणी

युक्रेनमधील यहोवाचे साक्षीदार एक विश्‍वासवर्धक व उत्तेजनदायक कहाणी

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी छळाचा सामना केला तसाच आजही देवाच्या लोकांनी केला आहे. (मत्तय १०:२२; योहान १५:२०) क्वचितच युक्रेनसारखा असा दुसरा देश असेल ज्याने दीर्घ-काळपर्यंत किंवा कठोर छळ सहन केला आहे; युक्रेनमध्ये ५२ वर्षांपर्यंत राज्य प्रचार-कार्यावर बंदी होती.

२००२ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिकपुस्तक (इंग्रजी), यात युक्रेनमधील देवाच्या लोकांची कहाणी सांगण्यात आली आहे. कडाक्याच्या विरोधात दाखवण्यात आलेल्या विश्‍वासाची, धैर्याची आणि बलाची ही कहाणी आहे. खाली, यहोवाच्या साक्षीदारांच्या युक्रेनमधील शाखा दफ्तराला मिळालेल्या कृतज्ञता व्यक्‍त करणाऱ्‍या काही टिपणी दिल्या आहेत:

“माझं २००२ वार्षिकपुस्तक वाचून झालं. युक्रेनमधील तुमच्या कार्याविषयी वाचल्यावर माझे अश्रू थांबेनात. तुमच्या आवेशी उदाहरणातून व भक्कम विश्‍वासातून मला खूप उत्तेजन मिळालं आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. तुमच्याप्रमाणेच मीही त्याच आध्यात्मिक कुटुंबाचा भाग आहे, याचा मला गर्व आहे. मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते!”—ॲन्ड्रे, फ्रान्स.

२००२ वार्षिकपुस्तकाबद्दल मी तुमची आणि यहोवाची किती आभारी आहे, हे व्यक्‍त करण्यासाठी माझ्याजवळ शब्दच नाहीत. तुरुंगांमध्ये व छळछावण्यांमध्ये आपले ऐन तारुण्य घालवणाऱ्‍या बांधवांचे अनेक अनुभव वाचत असताना मी रडले. त्यांचे धैर्य वाखाणण्याजोगे आहे. मी २७ वर्षांपासून साक्षीदार असले तरीसुद्धा या बंधूभगिनींपासून मला पुष्कळ काही शिकण्याचा वाव आहे. त्यांच्यामुळे आपला स्वर्गीय पिता यहोवा याच्यावरील माझा विश्‍वास पक्का झाला.”—व्यरा, भूतपूर्व युगोस्लाव्हिया.

“विरोधाच्या त्या काळात तुमच्या सहनशक्‍तीच्या व विश्‍वासूपणाच्या उत्तम उदाहरणामुळे मी तुम्हाला हे पत्र आनंदाने लिहीत आहे. यहोवावरील तुमचा संपूर्ण भरवसा आणि विश्‍वासू राहण्याचा तुमचा दृढनिश्‍चय यांमुळे तुम्ही सन्मानित होता. शिवाय, विरोधात तुम्ही दाखवलेली नम्रता, यहोवा आपल्या लोकांचा त्याग करत नाही हा विश्‍वास पक्का करते. धैर्य, पक्केपणा आणि चिकाटीच्या तुमच्या उत्तम उदाहरणामुळे आम्ही लहानसहान समस्या अधिक सहजपणे हाताळू शकतो.”—टुटेरिहिआ, फ्रेन्च पोलिनेशिया.

वार्षिकपुस्तक वाचल्यानंतर, मला तुम्हाला लिहावंसंच वाटलं. त्यातील सर्व सुरेख अनुभवांचा माझ्या मनावर गहिरा प्रभाव पडला. एका प्रेमळ, आधार देणाऱ्‍या व उचित वेळी शक्‍ती देणाऱ्‍या पित्याच्या मार्गदर्शनाखाली अशा एका एकनिष्ठ, संयुक्‍त संघटनेचा सदस्य असण्याचा मला गर्व वाटला. यहोवाच्या किती तरी धैर्यवान व आवेशी सेवकांना छळ सहन करावा लागला, आपले प्राण गमवावे लागले हे वाचल्यावर मला वाईट वाटलं. पण, त्यांच्या धैर्यामुळे व त्यांच्या आवेशामुळे कितीतरी लोक सत्य शिकले व आपल्या प्रेमळ पित्याला ओळखू शकले याबद्दल मला आनंद वाटला.”—कोलेट, नेदरलँड.

“मी व माझ्या पत्नीनं केवळ हे सांगण्यासाठी पत्र लिहिलं आहे, की वार्षिकपुस्तकातील युक्रेनविषयीची माहिती आमच्या अंतःकरणापर्यंत पोहंचली. दीर्घकाळ चाललेल्या व कठीण काळातही तुम्ही विश्‍वासू बांधवांनी सहनशीलतेचे उल्लेखनीय उदाहरण मांडले आहे. नीतिसूत्रे २७:११ मधील शब्दांच्या अनुषंगात, युक्रेनमधील इतक्या विश्‍वासू बांधवांनी दियाबलाच्या सर्व दुष्कृत्यांतही अतूट एकनिष्ठा दाखवली हे पाहून यहोवाला किती आनंद वाटला असेल!”—ॲलन, ऑस्ट्रेलिया.

“युक्रेनमधील बांधवांबद्दल वाचल्यावर माझ्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांनी किती तरी गोष्टी सहन केल्या होत्या—अनेक वर्षांचा तुरुंगवास, छळ, जुलूम, कुटुंबांची ताटातूट. तुमच्या मंडळ्यांमध्ये सेवा करणाऱ्‍या सर्व बांधवांना मी सांगू इच्छितो, की मला त्यांच्यावर खूप प्रेम आहे व मी त्यांचा आदर करतो. त्यांच्या धाडसीपणाचा व अविचलतेचा मला आनंद वाटतो. त्यांना यहोवाच्या आत्म्याद्वारे शक्‍ती मिळाली आहे, हे मला माहीत आहे. यहोवा आपल्या निकट आहे आणि तो आपल्याला मदत करू इच्छितोय.”—स्यिरगे, रशिया.

“मी २००२ वार्षिकपुस्तक वाचलं आणि रडले. आमच्या मंडळीतील पुष्कळ बंधूभगिनी तुमच्याविषयी बोलले. तुम्ही खरोखरच खूप मोलवान आहात. अशा आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग असण्याचा मला खूप आनंद होतोय.”—युनही, दक्षिण कोरिया.

“तुमच्या विश्‍वासाचा, सहनशीलतेचा, यहोवा आणि त्याचे राज्य यांबद्दल ज्वलंत प्रेमाचे रेकॉर्ड पाहून मी खूप प्रभावित झालो. कधीकधी आम्ही, असलेल्या स्वातंत्र्याची आणि यहोवा आम्हाला देत असलेल्या विपुल आध्यात्मिक अन्‍नाची किंमत जाणण्यात उणे पडतो. परंतु तुमच्याबाबतीत असे झाले नाही. विश्‍वासाच्या तुमच्या उदाहरणामुळे आम्हाला ही जाणीव झाली की देवाबरोबर आपण जवळचा नातेसंबंध ठेवला तर तो आपल्याला सर्व प्रकारच्या परीक्षांचा सामना करण्याची शक्‍ती देईल.”—पाऊलो, ब्राझील.

२००२ वार्षिकपुस्तकामधील अनुभव वाचण्याची मला संधी मिळाली. ते अनुभव माझ्या मनाला भिडले; खासकरून भगिनी लिडिया कुरदास हिचा हृदयस्पर्शी अनुभव. मला ही भगिनी अगदी आपलीशी वाटू लागली.”—निड्या, कोस्टा रिका.

“आज माझं २००२ वार्षिकपुस्तक वाचून संपलं. यहोवावरचा माझा विश्‍वास यामुळे भक्कम झाला. या अहवालातली एक गोष्ट मी विसरणार नाही; ती म्हणजे, पुढाकार घेणाऱ्‍यांविषयी शंकेचे बीज मनात रुजवले जाते तो अहवाल. यावरून मी हे शिकले, की पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांबद्दल केव्हाही आपल्या मनात शंका बाळगू नये. मी तुमचे आभार मानते! हे आध्यात्मिक अन्‍न हृदयासाठी पोषक आहे; ते, आपल्या विश्‍वासाची परीक्षा घेतली जाईल तेव्हाच्या काळासाठी आपल्याला तयार करते.”—लेटिस्या, अमेरिका.

वार्षिकपुस्तकाबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. पुष्कळ प्रचारकांनी पहिल्यांदाच, युक्रेनमधील आपल्या बांधवांच्या कार्याविषयी वाचले होते. इथल्या बांधवांना हे अनुभव वाचून खूप बळ मिळाले. पुष्कळांनी, खासकरून तरुणांनी क्षेत्र सेवेतील त्यांचा सहभाग वाढवला आहे. काहींनी सामान्य किंवा सहायक पायनियरींग सुरू केली. बंदीच्या काळात यहोवाची सेवा करणाऱ्‍या बंधूभगिनींच्या अनुभवांवरून सर्वांना उत्तेजन मिळालं.”—एका मंडळीतील सेवा समिती, युक्रेन.

युक्रेनमधील आपल्या बांधवांचा विश्‍वासूपणा, संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांसाठी उत्तेजनाचा एक स्रोत ठरला आहे. खरे तर, प्रत्येक वार्षिकपुस्तकात येणाऱ्‍या उत्साहवर्धक अहवालांचे नियमित वाचन करणे, या कठीण काळांत आपला विश्‍वास आणि सहनशीलता आणखी मजबूत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.—इब्री लोकांस १२:१.