व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“हे किती प्रबोधनकारक आहे!”

“हे किती प्रबोधनकारक आहे!”

राज्य घोषकांचा वृत्तान्त

“हे किती प्रबोधनकारक आहे!”

डोरोटा नावाच्या पोलंड येथील यहोवाच्या साक्षीदारांची एक पूर्ण वेळच्या सेविका, आपल्या १४ वर्षीय मुलासोबत नियमित तपासणीसाठी शाळेच्या दवाखान्यात गेल्या होत्या. तपासणीच्या वेळी, यानिन * नावाच्या महिला डॉक्टरने डोरोटा यांना, त्यांचा मुलगा घरी काय काय काम करतो असे विचारले.

डोरोटा म्हणाल्या: “मला जमत नाही तेव्हा तो, कुटुंबातील आमच्या सहाही जणांसाठी स्वयंपाक करतो. घर आवरतो, घरात काही दुरुस्तीचं काम असेल तर ते करतो. त्याला वाचन आवडते. तो हुशार विद्यार्थी आहे.”

“अरे वा! खूपच छान! मी इथं १२ वर्षांपासून काम करतेय. पण असं मी कधीच ऐकलं नव्हतं!” असे यानिन म्हणाल्या.

डोरोटाने साक्ष देण्याची ही उत्तम संधी असल्याचे ताडले व त्या पुढे म्हणाल्या: “पुष्कळ पालक आज आपल्या मुलांना व्यवस्थित प्रशिक्षण देत नाहीत. म्हणूनच त्यांच्या मुलांमध्ये स्वाभिमान नसतो.”

“तुम्हाला या गोष्टी कशा माहीत? पुष्कळ पालकांना याविषयी काहीच माहीत नसतं!” यानिन यांनी विचारले.

डोरोटा यांनी उत्तर दिले: “बायबल, या मौल्यवान माहितीचा उगम आहे. जसं की, अनुवाद ६:६-९ नुसार, मुलांना प्रशिक्षण देण्याआधी पालकांनी स्वतः हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आपल्या मुलांमध्ये आपण जी मूल्ये बिंबवू इच्छितो ती मूल्ये आधी आपण आपल्या हृदयात व मनात रुजवायला नको का?”

“वा! किती सुरेख!” असे म्हणत यानिन यांनी डोरोटाला विचारले, की बायबलने त्यांना आपल्या मुलांचे संगोपन करायला व शिक्षण द्यायला कशी मदत केली होती.

डोरोटा म्हणाल्या: “आम्ही दर आठवडी आमच्या मुलांबरोबर बायबलचा अभ्यास करतो. तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे या पुस्तकाचा आम्ही उपयोग करतो.” * त्यांनी पुस्तकातील माहिती आणि त्यात कोणकोणते विषय आहेत ते सांगितले.

यानिन म्हणाल्या: “हे किती प्रबोधनकारक आहे! मला ते पुस्तक पाहायला मिळेल का?”

एका तासाच्या आत, डोरोटो ते पुस्तक घेऊन आल्या.

यानिन यांनी डोरोटाला पुस्तक चाळत विचारले: “तुम्ही कोण आहात?”

“मी यहोवाची साक्षीदार आहे.”

“तुम्ही दुसऱ्‍या धर्माच्या लोकांशी कसे वागता?”

“तुमच्याशी आता जसं मी वागले—आदरानं!” असं म्हणत डोरोटा पुढे म्हणाल्या: “अर्थात, लोकांनीही बायबलमधील सत्य जाणावं अशी आमची इच्छा आहे.”

यानिन म्हणाल्या: “मला किती बरं वाटलं तुमच्याशी बोलून.”

भेटीच्या शेवटी, डोरोटाने यानिन यांना बायबल वाचायचा आग्रह केला. “यामुळे तुमच्या जीवनाला अर्थ मिळेल आणि तुमच्या कामातही त्याची मदत होऊ शकेल.”

यानिन यांनी कबूल केले: “तुमचं बोलणं ऐकून मला बायबल वाचायची खूपच प्रेरणा मिळाली आहे.”

व्यवहारचातुर्याचा उपयोग करून व निश्‍चयपूर्वकपणे डोरोटा यांनी डॉक्टरकडे नियमित तपासणीसाठी गेलेल्या असतानाही, संधीचा फायदा घेऊन उत्तम साक्ष दिली.—१ पेत्र ३:१५.

[तळटीपा]

^ परि. 3 नाव बदलण्यात आले आहे.

^ परि. 10 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.