व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘विजोड होऊ नका’

‘विजोड होऊ नका’

‘विजोड होऊ नका’

या पानावरील चित्रात एक ऊंट आणि एक बैल नांगराला जुंपल्याचे दिसत आहे; किती विचित्र वाटते ही जोडी! दोघांना एकत्र ठेवण्यासाठी अर्थात एकाच उंचीच्या व शक्‍तीच्या दोन प्राण्यांसाठी बनवण्यात आलेल्या त्यांच्या मानेवरील जोखडामुळे दोघांनाही त्रास होतो. अशाप्रकारचे जू ज्या प्राण्यांना लावले जात, त्या प्राण्यांच्या हिताविषयी, देवाने इस्राएली लोकांना असे सांगितले, की “बैल व गाढव ह्‍यांची जोडी जुंपून जमीन नांगरू नको.” (अनुवाद २२:१०) हेच तत्त्व बैल आणि उंटाच्या जोडीला देखील लागू होते.

सहसा, एक शेतकरी आपल्या प्राण्यांना असा त्रास देणार नाही. पण त्याच्याकडे जर दोन बैल नसतील तर तो कदाचित त्याच्याकडे असलेल्या दोन प्राण्यांना जोखडाला जुंपेल. असे दिसते, की या चित्रातील या १९ व्या शतकातील शेतकऱ्‍याने हेच करायचे ठरवले. प्राण्यांची उंची आणि वजन यांत फरक असल्यामुळे, कमी शक्‍तीच्या प्राण्याला, जास्त शक्‍तीच्या प्राण्याच्या बरोबरीने चालायला खूप प्रयास करावा लागत असेल आणि जास्त शक्‍तीच्या प्राण्यावर अधिक ओझे आले असेल.

आपल्याला एक महत्त्वपूर्ण धडा शिकवण्यासाठी प्रेषित पौलाने विजोड जोखडीच्या दाखल्याचा उपयोग केला. “तुम्ही विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीति व स्वैराचार ह्‍यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार?” (२ करिंथकर ६:१४) एक ख्रिस्ती विजोड कसा होऊ शकतो?

एक मार्ग आहे, ख्रिश्‍चन व्यक्‍तीने तिच्याप्रमाणे विश्‍वास न करणाऱ्‍याला आपला वैवाहिक सोबती म्हणून निवडण्याद्वारे. अशाप्रकारच्या विवाहामुळे दोन्ही सोबत्यांचे वैवाहिक जीवन कठीण होऊ शकेल, मूलभूत विषयांवर दोघांचे दुमत होऊ शकेल.

यहोवाने विवाहाची सुरवात केली तेव्हा त्याने पत्नीला, ‘साहाय्यक’ अथवा मदतनीस अशी भूमिका दिली. (उत्पत्ति २:१८) तसेच, संदेष्टा मलाखीद्वारे देवाने पत्नीला “सहकारिणी” असे संबोधले. (मलाखी २:१४) आपल्या निर्माणकर्त्याची इच्छा आहे, की वैवाहिक दांपत्याने, त्यांच्या संसाराचा गाडा, एकाच दिशेने ओढावा, सर्व ओझे एकत्र वाहावे आणि मिळणाऱ्‍या लाभांचा एकत्र फायदा मिळवावा.

“केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याद्वारे एक ख्रिश्‍चन व्यक्‍ती आपल्या स्वर्गीय पित्याच्या सल्ल्याचा आदर करते. (१ करिंथकर ७:३९) यामुळे संयुक्‍त विवाहाचा पाया रचला जातो ज्यामुळे दोघे सोबती एका खास अर्थाने ‘खरे सोबती’ होऊन देवाची स्तुती आणि त्याचा सन्मान करू शकतील.—फिलिप्पैकर ४:३.

[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]

उंट आणि बैल: From the book La Tierra Santa, Volume १, १८३०