व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भरवशालायक कोणी आहे का?

भरवशालायक कोणी आहे का?

भरवशालायक कोणी आहे का?

एकोणीसशे एकोणनव्वद साली, बर्लिन भिंत पडल्यावर कित्येक वर्षांपासून लपून राहिलेल्या अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट झाला. उदाहरणार्थ, लिडियाला * समजले की, पूर्व जर्मनीतील समाजवादी शासनादरम्यान, श्‍टॉझी किंवा राष्ट्र संरक्षण सेवेच्या लोकांनी तिच्या खासगी कार्यहालचालींची नोंद ठेवली होती. याविषयी ऐकून लिडियाला आश्‍चर्य वाटले परंतु श्‍टॉझींना माहिती देणारी व्यक्‍ती तिचाच पती होता हे ऐकून तिला धक्काच बसला. ज्याच्यावर ती पूर्ण भरवसा ठेवू शकत होती त्यानेच तिला दगा दिला होता.

रॉबर्ट, या वृद्ध गृहस्थाला आपल्या डॉक्टरविषयी “खूप आदर आणि कौतुक वाटायचे; त्यांना त्यांच्यावर पूर्ण भरवसा होता,” असे लंडनच्या ट टाईम्सने वृत्त दिले. हे डॉक्टर अत्यंत “चांगले आणि सहानुभूतीशील” होते असे म्हटले जात होते. मग अनपेक्षितपणे रॉबर्ट यांचा मृत्यू झाला. याला कारण हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात होते का? नाही. अधिकाऱ्‍यांनुसार, ते डॉक्टर, रॉबर्ट यांच्या घरी गेले, आणि रॉबर्ट किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणालाही नकळत त्यांनी एक प्राणघातक इंजेक्शन दिले. अशारीतीने, ज्या व्यक्‍तीवर रॉबर्ट यांचा पूर्ण भरवसा होता तिनेच त्यांचा खून केला.

लिडिया आणि रॉबर्ट या दोघांचाही विश्‍वासघात करण्यात आला होता आणि याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागले. काही बाबींमध्ये, परिणाम इतके भयंकर नसतात. तथापि, कोणा भरवशाच्या व्यक्‍तीकडून फसवले जाण्याचा अनुभव आज असामान्य राहिलेला नाही. आलन्सबाखर यारबुख डेर डेमोस्कोपी १९९८-२००२, या जर्मन अग्रेसर सर्वेक्षण संस्थेने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार एका सर्वेक्षणात असे प्रकट झाले की, ८६ टक्के लोकांना त्यांच्या भरवशाच्या व्यक्‍तीने निराश केले होते. कदाचित तुम्हाला देखील हाच अनुभव आला असेल. नोई सुरखर त्सायतुंग या स्वीस बातमीपत्राने २००२ मध्ये, “पाश्‍चात्त्य औद्योगिक राष्ट्रांमध्ये परस्परांमधील भरवशाचा संबंध गेल्या कित्येक दशकांपासून नाहीसा होत चालला आहे,” असा अहवाल दिला याचे आपल्याला आश्‍चर्य वाटण्याची गरज नाही.

वाढायला वेळ लागतो पण झटक्यात नाहीसा होतो

भरवसा म्हणजे काय? एका शब्दकोशानुसार, इतरांवर भरवसा ठेवणे म्हणजे, ते प्रामाणिक आणि निष्कपट आहेत व तुम्हाला इजा पोहंचवण्यासाठी मुद्दामहून काही करत नाहीत असा विश्‍वास करणे. भरवसा वाढायला वेळ लागतो पण क्षणात नाहीसा होऊ शकतो. आपल्या भरवशाची निराशा झाल्याची जाणीव अनेकांना होऊ लागल्यामुळे लोकांना इतरांवर विश्‍वास ठेवायला कठीण जाते यात काही नवल नाही. जर्मनीत २००२ साली प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, “३ पैकी १ तरुणापेक्षाही कमी तरुणांना इतरांवर विश्‍वास राहिला आहे.”

आपण कदाचित असा प्रश्‍न विचारू: ‘कोणावर भरवसा ठेवणे खरोखर शक्य आहे का? निराशा होण्याची शक्यता असतानाही कोणावर भरवसा ठेवणे योग्य आहे का?’

[तळटीप]

^ परि. 2 नावे बदलण्यात आली आहेत.

[३ पानांवरील संक्षिप्त आशय]

एका सर्वेक्षणात असे प्रकट झाले की, ८६ टक्के लोकांना त्यांच्या भरवशाच्या व्यक्‍तीने निराश केले होते