व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आधी आणि पश्‍चात बायबलमधील तत्त्वांमुळे फरक पडला

आधी आणि पश्‍चात बायबलमधील तत्त्वांमुळे फरक पडला

“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल”

आधी आणि पश्‍चात बायबलमधील तत्त्वांमुळे फरक पडला

तरुणपणी एड्रीयन अत्यंत क्रोधिष्ट व रागीट होता. असा गरम डोक्याचा असल्यामुळे सहसा तो खूप संतापायचा. तो दारू प्यायचा, धूम्रपान करायचा आणि अनैतिक जीवन जगायचा. एड्रियनला पंक म्हणून ओळखले जायचे आणि आपला बंडखोरपणा दाखवण्यासाठी त्याने अंगावर गोंदून घेतले. त्या काळाविषयी त्याने म्हटले: “मी पंक स्टाईलची हेअरकट केली होती, आणि केसांना खूप ग्लू लावून केस ताठ उभे करायचो आणि काही वेळा केसांना लाल रंग किंवा दुसरा रंग लावायचो.” एड्रियनने नाक देखील टोचून घेतले.

एड्रियन, आणखी काही बंडखोर युवकांसोबत एका पडक्या घरात राहायला गेला. तेथे ते सगळे दारू पीत व ड्रग्ज घेत. एड्रियन आठवून सांगतो की, “मी स्पीड घ्यायचो, त्याच्याबरोबर वेलियम टोचायचो आणि दुसरे काही मिळेल तेही घ्यायचो. ड्रग्ज किंवा ग्लू उपलब्ध नसायचे तेव्हा मी लोकांच्या मोटारगाड्यांमधून पेट्रोल काढून त्याची नशा करायचो.” रस्त्यावर राहून गुन्हेगारीचे जीवन जगणाऱ्‍या एड्रियनची सर्वांना भीती वाटायची; तो अत्यंत हिंसक होता. सहसा लोक त्याच्या नादी लागत नसत. पण दुराचारी लोक मात्र त्याच्याकडे आकर्षित होत असत.

हळूहळू, एड्रियनच्या लक्षात आले की, त्याचे “मित्र” केवळ काही मिळवण्यासाठी त्याच्यासोबत असायचे. शिवाय, त्याला असे कळाले की, “कितीही राग करून आणि हिंसा करून शेवटी काहीच साध्य झाले नव्हते.” व्यर्थतेच्या भावनेमुळे व निराश होऊन त्याने आपल्या साथीदारांना सोडून दिले. बांधकाम चाललेल्या एका ठिकाणी त्याला टेहळणी बुरूजची एक प्रत सापडली; त्यातील बायबल आधारित संदेश त्याला खूप भावला आणि यामुळे यहोवाच्या साक्षीदारांशी तो बायबलचा अभ्यास करू लागला. “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल,” या आमंत्रणाला एड्रियनने उत्सुकतेने प्रतिसाद दिला. (याकोब ४:८) यामुळे, पवित्र शास्त्रवचनांमध्ये सापडणारी तत्त्वे अंमलात आणण्याची गरज आहे हे एड्रियनच्या लगेच लक्षात आले.

बायबलच्या वाढत्या ज्ञानाचा एड्रियनच्या विवेकावर चांगला परिणाम झाला आणि त्याच्या जीवनाला वेगळी दिशा मिळाली. आपल्या रागावर नियंत्रण राखण्यास आणि आत्मसंयमाचा गुण विकसित करण्यास त्याला मदत मिळाली. देवाच्या वचनाच्या सामर्थ्यामुळे, एड्रियनचे व्यक्‍तिमत्त्व पार बदलले.—इब्री लोकांस ४:१२.

बायबलचा इतका प्रभाव कसा होऊ शकला? शास्त्रवचनांचे ज्ञान आपल्याला “नवा मनुष्य” धारण करण्यास मदत करते. (इफिसकर ४:२४) होय, बायबलमधील अचूक ज्ञानाचा अंमल केल्याने आपले व्यक्‍तिमत्त्व बदलू शकते. परंतु या ज्ञानामुळे लोकांमध्ये बदल कसा घडून येतो?

सर्वप्रथम, आपल्या व्यक्‍तिमत्त्वातील कोणते वाईट गुण काढून टाकण्याची गरज आहे ते बायबल सांगते. (नीतिसूत्रे ६:१६-१९) दुसरे, शास्त्रवचने आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याचे इष्ट गुण दाखवण्यास आग्रह करतात. यामध्ये, “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” हे गुण आहेत.—गलतीकर ५:२२, २३.

देवाच्या अपेक्षांची गहन समज प्राप्त केल्यावर एड्रियनला स्वतःचे परीक्षण करता आले आणि कोणत्या सवयी विकसित करण्याची गरज आहे व कोणत्या सवयी सोडण्याची गरज आहे हे त्याला पाहता आले. (याकोब १:२२-२५) पण ही केवळ सुरवात होती. ज्ञानासोबत प्रेरणेची आवश्‍यकता होती; एड्रियनला बदलण्यास प्रवृत्त करेल अशा गोष्टीची गरज होती.

एड्रियनला कळाले की, हा उत्कृष्ट नवा मनुष्य “निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे” आकार घेतो. (कलस्सैकर ३:१०) त्याला हे समजले की, एका ख्रिस्ती व्यक्‍तीचे व्यक्‍तिमत्त्व देवाच्या व्यक्‍तिमत्त्वाशी जुळले पाहिजे. (इफिसकर ५:१) बायबलच्या अभ्यासाद्वारे एड्रियनला मानवजातीसोबत यहोवाच्या व्यवहारांबद्दल शिकायला मिळाले आणि प्रीती, दया, चांगुलपणा, कृपा आणि धार्मिकता यांसारख्या देवाच्या उत्तम गुणांची त्याने दखल घेतली. हे माहीत झाल्यामुळे एड्रियनला देवावर प्रेम करण्याची आणि यहोवाच्या दृष्टीत स्वीकारयोग्य अशी व्यक्‍ती बनण्याचा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली.—मत्तय २२:३७.

कालांतराने आणि देवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने एड्रियनला आपल्या रागावर ताबा मिळवता आला. आता तो व त्याची पत्नी इतरांना बायबलचे ज्ञान देऊन त्यांना आपल्या जीवनात सुधारणा करण्यासाठी मदत देण्यात व्यस्त आहेत. एड्रियन म्हणतो, “माझे पूर्वीचे बहुतेक सोबती आज जिवंत नाहीत, पण मी मात्र जिवंत आहे आणि माझ्या कुटुंबासोबत एक आनंदी जीवन जगत आहे.” लोकांचे जीवन सुधारण्याची शक्‍ती बायबलमध्ये आहे याचा तो जिवंत पुरावा आहे.

[२५ पानांवरील संक्षिप्त आशय]

“कितीही राग करून आणि हिंसा करून शेवटी काहीच साध्य झाले नव्हते”

[२५ पानांवरील चौकट]

उपयुक्‍त ठरणारी बायबलची तत्त्वे

पुढील बायबलच्या काही तत्त्वांमुळे रागीट व संतापी मनोवृत्तीच्या लोकांना शांतीपूर्ण बनण्यास मदत झाली आहे:

“सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या.” (रोमकर १२:१८, १९) कोणाचा सूड घ्यावा आणि केव्हा घ्यावा हे देवाला ठरवू द्या. कारण सर्व गोष्टींची माहिती राखून तो सूड घेऊ शकतो आणि त्याने दिलेल्या कोणत्याही शिक्षेतून त्याच्या परिपूर्ण न्यायाचाच गुण दिसेल.

“तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका, तुम्ही रागात असताना सुर्य मावळू नये, आणि सैतानाला वाव देऊ नका.” (इफिसकर ४:२६, २७) एका व्यक्‍तीला एखाद्या वेळी राग येईल आणि त्याचा राग योग्य देखील असेल. हे घडलेच तर त्याने तसेच “रागात” राहू नये. का? कारण यामुळे तो काही बरेवाईट करू शकेल आणि अशाप्रकारे तो “सैतानाला वाव” देईल व यहोवा देव त्याच्यावर नाखूष होईल.

“राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळूं नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ति होते.” (स्तोत्र ३७:८) भावनांवर ताबा नसल्यास कृत्यांवरही ताबा राहणार नाही. एखाद्याने राग अनावर होऊ दिला तर तो अविचारीपणे काही बोलण्याची किंवा कोणाला दुखापत होईल असे काही करण्याची शक्यता आहे.