व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गुन्हेगारी नसलेले जग भवितव्यात येणार आहे

गुन्हेगारी नसलेले जग भवितव्यात येणार आहे

गुन्हेगारी नसलेले जग भवितव्यात येणार आहे

गुन्हेगार नसलेल्या जगाची तुम्ही कल्पना करू शकता का? तेव्हा पोलिसांची, तुरूंगांची किंवा महागड्या व जटील गुन्हा न्यायालयीन व्यवस्थांची आवश्‍यकता भासणार नाही. प्रत्येक जण इतरांच्या जीवाचा व मालमत्तेचा आदर करेल. हे अशक्य वाटते का? कदाचित तुम्हाला अशक्य वाटण्याची शक्यता आहे परंतु याच आश्‍चर्यकारक परिवर्तनाचे बायबल अभिवचन देते. पृथ्वीवरील गुन्हेगारी आणि इतर वाईट कार्यांविषयी शास्त्रवचनांत काय भाकीत केले आहे त्यांचा आपण जरा विचार करू या का?

स्तोत्रांच्या पुस्तकात आपण असे वाचतो: “दुष्कर्म्यांवर जळफळूं नको; अन्याय करणाऱ्‍यांचा हेवा करूं नको. कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात. पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्र ३७:१, २, ११) होय, देवाने दिलेले हे आणि इतर अनेक अभिवचने पूर्ण करण्यापासून कोणीही त्याला अडवू शकत नाही.

देव हे आशीर्वाद त्याच्या राज्यामार्फत आणणार आहे. प्रभूच्या प्रार्थनेत, येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना हे राज्य यावे आणि “जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि” देवाच्या इच्छेप्रमाणे व्हावे अशी प्रार्थना करण्यास शिकवले. (मत्तय ६:९, १०) या राज्यात पृथ्वीवर कोणालाही दारिद्र्‌य, जुलूम किंवा स्वार्थीपणा यांमुळे गुन्हे करावेसे वाटणार नाहीत. देवाचे वचन म्हणते: “भूमीत भरपूर पीक येवो, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलो.” (स्तोत्र ७२:१६) होय, यहोवा देव पृथ्वीवरील सर्वांना भरपूर प्रमाणात चांगल्या गोष्टी देत राहील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मानव समाजाला देव आणि शेजारी यांच्याबद्दल प्रेम असेल; गुन्हेगारीमुळे जगात पुन्हा गोंधळ माजणार नाही.