व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“देवाचं वचन खरोखरच किती शक्‍तिशाली आहे!”

“देवाचं वचन खरोखरच किती शक्‍तिशाली आहे!”

“देवाचं वचन खरोखरच किती शक्‍तिशाली आहे!”

“देवाचे वचन सजीव, सक्रिय,” अर्थात शक्‍तिशाली आहे. (इब्री लोकांस ४:१२) यहोवाच्या साक्षीदारांचे २००३ कॅलेंडर (इंग्रजी) यांमध्ये संपूर्ण जगभरातील सहा सत्य-घटनांचा जो अहवाल दिला आहे तो देवाच्या वचनातील अखंड शक्‍तीचा पुरावा देतो. कॅलेंडरमध्ये, “आधी आणि पश्‍चात” या मथळ्याखाली, यहोवाच्या साक्षीदारांच्या शैक्षणिक कार्यामुळे लोकांना आपली नैतिकता सुधारण्यास, नाशाकडे नेणारी जीवनशैली सोडून देण्यास, आपले कौटुंबिक जीवन मजबूत करण्यास व देवाबरोबर व्यक्‍तिगत नातेसंबंध जोडण्यास मदत कशी मिळाली ते सांगण्यात आले आहे.

२००३ कॅलेंडरविषयी अनेक प्रशंसापत्रे मिळाली आहेत. काहींनी पुढीलप्रमाणे आपले मनोगत व्यक्‍त केले:

“हे कॅलेंडर खऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी एक पुरावा आहे, की त्यांच्यासारखे इतरही आहेत ज्यांना आपल्या विश्‍वासासाठी लढा द्यावा लागला आहे. काहींना कोणकोणते बदल करावे लागले याची आठवण व्हावी म्हणून आता ते कॅलेंडरमधील चित्रं पाहू शकतात.”—स्टीवन, अमेरिका.

“२००३ कॅलेंडरनं माझ्या अंतःकरणाला स्पर्श केला आहे हे सांगण्यासाठी मला चार शब्द लिहावेसेच वाटले. कोणत्याही कॅलेंडरचा माझ्यावर इतका प्रभाव पडला नव्हता. २००३ कॅलेंडरमधल्या जीवन-कथा माझ्या साक्षकार्याच्या बॅगेतील इतर साहित्याबरोबर मी ठेवल्या आहेत जेणेकरून बायबलचा लोकांवर प्रभाव कसा पडतो हे घरमालकाला दाखवण्यासाठी मी त्यांचा ठोस पुरावा म्हणून उपयोग करू शकेन.”—मार्क, बेल्जियम.

“कॅलेंडर पाहून मी खूप प्रभावित झाले. यहोवानं या लोकांमध्ये परिवर्तन कसे घडवून आणले, हे वाचून मला गहिवरून आलं. यामुळे आता मी स्वतःत बदल करण्यास प्रवृत्त झाले आहे. मी आपल्या जगव्याप्त बंधूसमाजाचा भाग आहे, असं मला पहिल्यापेक्षा अधिक जाणवतं.”—मेरी, अमेरिका.

“लोकसमुदायाची आध्यात्मिक दयनीय स्थिती पाहून येशूला कळवळा आला. आपल्या २००३ कॅलेंडरमध्ये जीवन-कथा छापण्याद्वारे ख्रिस्ताचे अनुकरण केल्याबद्दल मी आभारी आहे. यापूर्वी कधीही एखाद्या कॅलेंडरनं माझ्या डोळ्यांत पाणी आणलं नव्हतं.”—कसॅन्ड्रा, अमेरिका.

“मी ११ वर्षांची होते तेव्हा सिगारेट ओढायला लागले; नंतर ड्रग्ज घेऊ लागले. पुष्कळदा मी माझं जीवन संपवण्याचा विचार केला. पण यहोवाची ओळख घडल्यावर या सवयी सोडण्यास मला मदत मिळाली. हे कॅलेंडर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. संपूर्ण जगभरातील माझ्या बंधूभगिनींच्या अनुभवानं मला शक्‍ती मिळते. आता मला माहीत आहे की या लढ्यात मी एकटीच नाही व यहोवाबद्दल प्रेम बाळगणे व मनापासून त्याची सेवा करणे या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत.”—मार्ग्रेट, पोलंड.

“देवाचं वचन खरोखरच किती शक्‍तिशाली आहे!” २००३ कॅलेंडर मिळालं तेव्हा मी माझे अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत होते. यांतले अनुभव, चित्रं विश्‍वास मजबूत करणारे आहेत.”—डार्लीन, अमेरिका.

“यांतील काहींची गत जीवनशैली, माझ्या गत जीवनशैलीशी मिळती-जुळती होती. यहोवानं मलाही अशा सवयी सोडायला शक्‍ती दिली ज्या सवयी सोडणे मला फार कठीण वाटत होतं. या जीवन-कथांबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो.”—विल्यम, अमेरिका.