‘सत्याचे वचन नीट हाताळणे’
‘सत्याचे वचन नीट हाताळणे’
“तू सत्याचे वचन नीट हाताळणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.” —२ तीमथ्य २:१५, NW.
१, २. (अ) कामकऱ्यांना हत्यारांची का गरज असते? (ब) ख्रिस्ती लोकांवर कोणती जबाबदारी आहे आणि ते पहिल्याने राज्य मिळविण्यास झटतात हे कसे दाखवतात?
कामकऱ्यांना आपली कामे करण्याकरता हत्यारांची गरज असते. पण कोणतेही हत्यार असून चालत नाही. योग्य हत्यार असणे आणि ते योग्य प्रकारे वापरणेही महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला एक शेड बांधायचे आहे आणि त्याकरता तुम्हाला दोन लाकडी फळ्या जोडायच्या आहेत. अर्थातच, केवळ एक हातोडी आणि खिळे तुमच्याजवळ असणे पुरेसे नाही. खिळा न वाकवता तो लाकडी फळीत कसा ठोकायचा हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. हातोडी कशी वापरायची हे माहीत नसताना, जर तुम्ही खिळा ठोकण्याचा प्रयत्न करू लागला, तर साहजिकच तुम्हाला ते कठीण जाईल आणि कदाचित तुम्ही निराश व्हाल. पण हत्यारे योग्य प्रकारे हाताळल्याने आपल्याला बरीच कामे समाधानकारकरित्या साध्य करता येतात.
२ ख्रिस्ती या नात्याने आपल्यालाही एक काम देण्यात आले आहे. हे काम सर्वात महत्त्वाचे आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना ‘पहिल्याने राज्य मिळविण्यास झटण्याचा’ आग्रह केला. (मत्तय ६:३३) हे आपण कसे करू शकतो? एक मार्ग म्हणजे राज्य प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात आवेशाने सहभाग घेणे. दुसरा, आपल्या सेवाकार्याला देवाच्या वचनाचा भक्कम आधार देणे. आणि तिसरा म्हणजे, उत्तम आचरण राखणे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०; प्रेषितांची कृत्ये ८:२५; १ पेत्र २:१२) आपल्याला नेमण्यात आलेल्या या ख्रिस्ती कार्यात परिणामकारक आणि आनंदी होण्याकरता आपल्याजवळ आवश्यक हत्यारे आणि ती कशी हाताळायची याविषयी पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. या संदर्भात, प्रेषित पौलाने ख्रिस्ती कामकरी या नात्याने उल्लेखनीय आदर्श आपल्यासमोर ठेवला आणि सह विश्वासू बांधवांनाही आपले अनुकरण करण्याचे प्रोत्साहन दिले. (१ करिंथकर ११:१; १५:१०) तर मग, आपला सहकामकरी पौल याच्यापासून आपण काय शिकू शकतो?
पौल—एक आवेशी राज्य उद्घोषक
३. प्रेषित पौल राज्याचा एक आवेशी कामकरी होता असे का म्हणता येईल?
३ पौल कशाप्रकारचा कामकरी होता? तो निश्चितच आवेशी होता. त्याने अतिशय परिश्रमपूर्वक, भूमध्य सागराच्या जवळच्या विस्तारित प्रदेशात सुवार्तेचा प्रसार केला. राज्याची घोषणा आपण इतक्या आवेशाने का करतो याचे कारण सांगताना, अथक परिश्रम करणाऱ्या या प्रेषिताने म्हटले: “मी १ करिंथकर ९:१६) पण पौलाला केवळ आपला जीव वाचवण्याशी कारण होते का? नाही. तो स्वार्थी नव्हता. उलट, इतरांनाही सुवार्तेमुळे लाभ व्हावा अशी त्याची इच्छा होती. त्याने लिहिले: “मी सर्व काही सुवार्तेकरिता करितो, अशासाठी की, मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे.”—१ करिंथकर ९:२३.
सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरविण्याचे कारण नाही; कारण मला ती सांगणे भाग आहे; कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार!” (४. ख्रिस्ती कामकरी खासकरून कोणते साधन बहुमोल समजतात?
४ प्रेषित पौल विनयशील होता कारण केवळ स्वतःच्या वैयक्तिक कौशल्यांवर विसंबून राहणे पुरेसे नाही याची त्याला जाणीव होती. ज्याप्रकारे सुताराला हातोडीची गरज असते त्याचप्रकारे आपल्या श्रोत्यांच्या अंतःकरणावर देवाच्या सत्याची छाप पाडण्याकरता पौलालाही योग्य साधनाची गरज होती. त्याने कोणत्या साधनाचा खासकरून उपयोग केला? ते साधन म्हणजे देवाचे वचन अर्थात पवित्र शास्त्र. त्याचप्रकारे शिष्य बनवण्याकरता आपल्याला मदत करण्यासाठी उपलब्ध असलेले प्रमुख साधन म्हणजे संपूर्ण बायबल.
५. परिणामकारक सेवक होण्याकरता वचने उद्धृत करण्याव्यतिरिक्त आपण आणखी काय केले पाहिजे?
५ देवाचे वचन नीट हाताळण्यात केवळ त्यातून वचने उद्धृत करणे इतकेच समाविष्ट नाही याची पौलाला जाणीव होती. तर त्याने ‘मन वळवण्याच्या’ कलेचा वापर केला. (प्रेषितांची कृत्ये २८:२३, NW) तो कसा? राज्य संदेशाचा स्वीकार करण्यास अनेकांचे मन वळवण्याकरता पौलाने अतिशय परिणामकारक पद्धतीने देवाच्या लिखित वचनाचा उपयोग केला. त्याने त्यांच्यासोबत युक्तिवाद केला. इफिसस येथील एका सभास्थानात पौल तीन महिन्यांपर्यंत “देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत व प्रमाण पटवीत [“मन वळवीत,” NW]” होता. काहीजण “कठोर व विरोधी” झाले पण इतरांनी पौलाचे ऐकले. इफिसस येथे पौलाच्या सेवाकार्यामुळे “प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले.”—प्रेषितांची कृत्ये १९:८, ९, २०.
६, ७. पौलाने आपल्या सेवेला कशाप्रकारे मोठेपणा दिला आणि आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो?
६ राज्याचा आवेशी उद्घोषक या नात्याने पौलाने “आपल्या सेवेला मोठेपणा” दिला. (रोमकर ११:१३) कशाप्रकारे? त्याला मानसन्मान मिळवण्याची अपेक्षा नव्हती; शिवाय, देवाचा सहकारी या नात्याने ओळखले जाण्यास त्याला लाज वाटली नाही. उलट आपले सेवाकार्य हे सर्वात मानाचे काम आहे असे तो समजत होता. पौलाने देवाचे वचन वाकबगारपणे आणि परिणामकारकपणे हाताळले. त्याच्या फलदायी कार्यामुळे इतरांनाही प्रोत्साहन मिळाले आणि आपली सेवा अधिक चांगल्याप्रकारे पार पाडण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. या अर्थानेही त्याच्या सेवेला मोठेपणा मिळाला.
७ पौलाप्रमाणे आपणही देवाच्या वचनाचा अधिक वेळा आणि परिणामकारक पद्धतीने उपयोग करण्याद्वारे आपल्या सेवाकार्याला मोठेपणा देऊ शकतो. क्षेत्र सेवेच्या सर्व प्रकारांत सहभागी होताना, शक्य तितक्या लोकांना शास्त्रवचनांतून काहीतरी सांगण्याचे आपले ध्येय असले पाहिजे. त्यांचे मन वळेल अशाप्रकारे हे आपल्याला कसे करता येईल? तीन महत्त्वाचे मार्ग लक्षात घ्या: (१) देवाच्या वचनाबद्दल ऐकणाऱ्यांच्या मनात आदर निर्माण होईल अशाप्रकारे त्यांचे लक्ष त्याकडे वेधा. (२) बायबल काय म्हणते आणि ते तुम्ही सांगितलेल्या मुद्द्याला कसे लागू होते, हे विचारपूर्वक शब्द निवडून स्पष्ट करा. (३) तर्काला पटेल अशा रितीने शास्त्रवचनांतून युक्तिवाद करा.
८. आज आपल्याकडे राज्य प्रचाराकरता कोणती साधने उपलब्ध आहेत आणि तुम्ही त्यांचा कशाप्रकारे वापर केला आहे?
८ सध्याच्या काळात राज्य उद्घोषकांजवळ अशी अनेक साधने आहेत जी पौलाला त्याच्या सेवा कार्यादरम्यान उपलब्ध नव्हती. यात पुस्तके, नियतकालिके, माहितीपत्रके, हस्तपत्रिका, पत्रिका, आणि ऑडियो व व्हिडिओ कॅसेट्सचा समावेश आहे. मागील शतकात, टेस्टिमनी काड्र्स, फोनोग्राफ, साउन्ड कार्स आणि रेडिओ कार्यक्रम देखील वापरण्यात आले. अर्थात हे सर्व असूनही आपले सर्वात उत्तम हत्यार बायबलच आहे आणि आपण या अत्यावश्यक हत्याराचा चांगला आणि योग्य वापर केला पाहिजे.
आपले सेवाकार्य देवाच्या वचनावर आधारित असले पाहिजे
९, १०. देवाच्या वचनाच्या उपयोगासंबंधी, पौलाने तीमथ्याला दिलेल्या सल्ल्यावरून आपण काय शिकू शकतो?
९ देवाच्या वचनाचा एका प्रभावी हत्याराच्या रूपात आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो? पौलाने आपला सहकारी तीमथ्य याला दिलेल्या या सल्ल्याचे पालन करण्याद्वारे आपण असे करू शकतो: “तू सत्याचे वचन नीट हाताळणारा, लाज २ तीमथ्य २:१५) ‘देवाचे वचन नीट हाताळण्यात’ कशाचा समावेश आहे?
वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.” (१० ‘नीट हाताळणे’ असे भाषांतर केलेल्या ग्रीक संज्ञेचा शाब्दिक अर्थ “सरळ कापणे” अथवा “सरळ दिशेने मार्ग तयार करणे” असा होतो. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत केवळ पौलाने तीमथ्याला दिलेल्या या सल्ल्यातच या संज्ञेचा वापर करण्यात आला आहे. हाच शब्द एखाद्या शेतातून सरळ रेषेत नांगरणाऱ्या शेतकऱ्याचे वर्णन करतानाही वापरता येतो. अनुभवी शेतकऱ्याचा नांगर वाकडा गेल्यास त्याला नक्कीच लाजिरवाणे होईल. त्याअर्थी, पौल तीमथ्याला आठवण करून देत होता, की “लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला . . . कामकरी” होण्याकरता त्याने देवाच्या वचनाच्या सत्य शिकवणींपासून जराही विचलित होता कामा नये. त्याने आपल्या शिकवणुकींना वैयक्तिक दृष्टिकोनांनुसार बदलण्याचा प्रयत्न करू नये असे पौल सुचवीत होता. त्याचे प्रचार व शिक्षण कार्य केवळ शास्त्रवचनांवर केंद्रित असावे. (२ तीमथ्य ४:२-४) अशा रितीने प्रामाणिक मनाच्या व्यक्ती जगिक तत्त्वज्ञानानुसार नव्हे, तर यहोवाच्या दृष्टिकोनानुरूप विचार करण्यास शिकतील. (कलस्सैकर २:४, ८) आजही हेच खरे आहे.
आपले आचरण उत्तम असले पाहिजे
११, १२. देवाचे वचन नीट हाताळण्याशी आपल्या आचरणाचा कसा संबंध आहे?
११ देवाच्या वचनातील सत्ये घोषित करण्याद्वारे ते नीट हाताळणेच केवळ पुरेसे नाही. तर आपले आचरण देखील आपल्या शिकवणुकींनुसार असणे महत्त्वाचे आहे. “देवाचे सहकारी” असल्यामुळे आपण ढोंगी असता कामा नये. (१ करिंथकर ३:९) देवाचे वचन म्हणते: “दुसऱ्याला शिकविणारा तू स्वतःलाच शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करितोस काय? व्यभिचार करू नये असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करितोस काय? मूर्तींचा विटाळ मानणारा तू स्वतःच देवळे लुटतोस काय?” (रोमकर २:२१, २२) देवाचे आधुनिक काळातील कामकरी या नात्याने त्याचे वचन नीट हाताळण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे पुढील सल्ल्याचे पालन करणे: “आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—नीतिसूत्रे ३:५, ६.
१२ देवाचे वचन नीट हाताळल्यास आपण कोणत्या परिणामांची अपेक्षा करू शकतो? देवाच्या लिखित वचनाचा प्रामाणिक अंतःकरणाच्या व्यक्तींच्या जीवनात किती सामर्थ्यशाली प्रभाव पडू शकतो याचा विचार करा.
देवाच्या वचनात परिवर्तन करण्याची शक्ती आहे
१३. देवाच्या वचनाचे पालन केल्यामुळे एका व्यक्तीवर काय परिणाम होऊ शकतो?
१३ देवाचे वचन विश्वासार्ह आहे हे जेव्हा एक व्यक्ती स्वीकारते तेव्हा देवाचे वचन त्या व्यक्तीला तिच्या जीवनात विलक्षण बदल घडवून आणण्याकरता जोरदारपणे प्रभावित करते. देवाचे वचन किती परिणामकारक आहे हे पौलाने प्रत्यक्ष पाहिले होते आणि प्राचीन थेस्सलनीका शहरातील ज्या लोकांनी ख्रिस्ती विश्वास स्वीकारला होता त्यांच्यावर देवाच्या वचनाने कसा प्रभाव केला हे देखील त्याने स्वतः पाहिले होते. म्हणूनच त्याने त्यांना असे सांगितले, “ह्या कारणामुळे आम्हीहि देवाची निरंतर उपकारस्तुति ह्यामुळे करितो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते असेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांत कार्य करीत आहे.” (१ थेस्सलनीकाकर २:१३) त्या ख्रिश्चनांकरता, अर्थात, ख्रिस्ताच्या सर्व खऱ्या उपासकांकरता तुच्छ मानवी तत्त्वज्ञानाची देवाच्या सर्वोच्च कोटीच्या बुद्धीशी तुलना होऊ शकत नाही. (यशया ५५:९) थेस्सलनीकाकरांनी ‘फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारले’ आणि यामुळे इतर विश्वासू बांधवांकरता त्यांनी एक आदर्श ठेवला.—१ थेस्सलनीकाकर १:५-७.
१४, १५. देवाच्या वचनातील संदेश किती शक्तिशाली आहे आणि का?
१४ देवाचे वचन आणि त्याचा उगम यहोवा शक्तिशाली आहे. ज्याच्या शब्दाने “आकाश निर्माण झाले” त्या ‘जिवंत देवापासून’ ते वचन आहे आणि हे वचन ‘ज्या कार्याकरिता पाठविले जाते ते केल्यावाचून विफल होऊन परत येत नाही.’ (इब्री लोकांस ३:१२; स्तोत्र ३३:६; यशया ५५:११) एका बायबल विद्वानाने असे म्हटले: “देव स्वतःला त्याच्या वचनापासून विलग करत नाही. त्यास परके समजून तो त्याच्यापासून कधीही आपला संबंध तोडत नाही. . . . त्यामुळे त्याच्या वचनासोबत काहीही करण्यात आले तरीसुद्धा ते कधीही एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे, निरर्थक असे बनत नाही कारण ते जिवंत देवाशी जुळलेले आहे.”
१५ देवाच्या वचनातून निघणारा संदेश कितपत शक्तिशाली आहे? त्यात प्रचंड शक्ती आहे. म्हणूनच पौलाने लिहिले: “देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्यांचे परीक्षक असे आहे.”—इब्री लोकांस ४:१२.
१६. देवाचे वचन एका व्यक्तीला कितपत बदलू शकते?
१६ देवाच्या लिखित वचनातील संदेश “कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण” आहे. त्याअर्थी, त्याच्यात इतके प्रचंड सामर्थ्य आहे की त्याची तुलना कोणत्याही मानवी अवजाराशी अथवा हत्याराशी करता येत नाही. देवाचे वचन एका व्यक्तीच्या अगदी आंतरिक गाभ्यात प्रवेश करून तिच्यात आतून परिवर्तन घडवून आणू शकते; तिचे विचार, तिच्या आवडी-निवडी यांवर परिणाम करून तिला देवाचा एक स्वीकार्य कामकरी बनवू शकते. खरोखर हे सामर्थ्यशाली हत्यार नाही का?
१७. देवाच्या वचनात असलेल्या परिवर्तन करण्याच्या सामर्थ्याचे वर्णन करा.
१७ एक व्यक्ती स्वतःबद्दल विशिष्टप्रकारे विचार करत असेल, किंवा इतरांना ती आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विशिष्टच भाग दाखवत असेल, पण ती व्यक्ती आतून खरोखर कशी आहे हे देवाचे वचन उघडकीस आणते. (१ शमुवेल १६:७) कधीकधी एक दुष्ट व्यक्ती देखील चांगुलपणाचा अथवा धार्मिक प्रवृत्तीचा आव आणून आपले खरे व्यक्तिमत्त्व लपवू शकते. दुष्ट हेतू असलेले लोक आपले वाईट उद्देश साध्य करण्यासाठी चांगुलपणाचे ढोंग करतात. गर्विष्ठ लोक इतरांची प्रशंसा ऐकण्याची हौस असल्यामुळे बनावट नम्रतेचा दिखावा करतात. पण देवाचे वचन मनातील खरे हेतू प्रकाशात आणण्याद्वारे एका नम्र व्यक्तीला आपले जुने व्यक्तिमत्त्व काढून टाकून “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण” करण्याची जोरदार प्रेरणा देते. (इफिसकर ४:२२-२४) देवाच्या वचनातील शिकवणुकी, स्वभावाने लाजाळू असणाऱ्यांना यहोवाचे धैर्यवान व आवेशी राज्य प्रचारक बनवू शकतात.—यिर्मया १:६-९.
१८, १९. या परिच्छेदांतील अथवा क्षेत्रसेवेत आलेल्या वैयक्तिक अनुभवाच्या आधारावर, शास्त्रवचनांतील सत्य एका व्यक्तीच्या मनोवृत्तीवर कसा परिणाम करू शकते हे दाखवा.
१८ देवाच्या वचनातील परिवर्तन करण्याच्या शक्तीमुळे सबंध जगातील कित्येक लोकांवर चांगला परिणाम झाला आहे. उदाहरणार्थ, कंबोडियाच्या नॉम पे शहरातील राज्य प्रचारक काम्पाँग चाम नावाच्या क्षेत्रात महिन्यातून दोन वेळा प्रचाराला जात. इतर पाळक यहोवाच्या साक्षीदारांच्या विरोधात बोलतात हे पाहून, पाळक असलेल्या एका स्थानिक महिलेने साक्षीदारांच्या पुढच्या खेपेत त्यांना गाठले. तिने त्यांना एकापाठोपाठ एक प्रश्न विचारून भंडावून सोडले; सणवार इत्यादी विषयांवर प्रश्न विचारल्यावर तिने त्यांचे शास्त्रवचनांवर आधारित स्पष्टीकरण लक्षपूर्वक ऐकले. मग ती म्हणाली: “इतर पाळकांनी तुमच्याविषयी जे सांगितले ते मुळीच खरे नाही याची मला आता खात्री पटली आहे! त्यांचे म्हणणे होते, की तुम्ही बायबलचा वापर करत नाहीत, पण आज सकाळपासून तुम्ही फक्त बायबलच वापरले आहे!”
१९ या स्त्रीने साक्षीदारांसोबत बायबल चर्चा सुरू ठेवल्या आणि तिला पाळकपदावरून काढले जाण्याच्या धमक्यांमुळे ती घाबरली नाही. तिने आपल्या एका मैत्रिणीला साक्षीदारांसोबत केलेल्या चर्चांविषयी सांगितले तेव्हा ही मैत्रीणसुद्धा साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागली. ही मैत्रीण शिकत असलेल्या गोष्टींमुळे इतकी उत्साहित झाली की एकदा तिच्या चर्चमध्ये उपदेश चालत असताना तिने चक्क, “तुम्हीही या व यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करा!” असे घोषित केले. त्यानंतर लवकरच पूर्वी पाळक असलेली स्त्री आणि इतरजणही यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागले.
२०. घानामध्ये राहणाऱ्या एका स्त्रीच्या अनुभवावरून देवाच्या वचनाचे सामर्थ्य कशाप्रकारे दिसून येते?
२० घानामध्ये राहणाऱ्या पॉलीना नावाच्या एका स्त्रीच्या उदाहरणावरूनही, देवाच्या वचनात किती सामर्थ्य आहे हे स्पष्ट होते. पूर्ण वेळेची एक राज्य उद्घोषक, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातून तिच्यासोबत अभ्यास करू लागली. * पॉलीना एकापेक्षा अधिक पत्नी असलेल्या पुरुषाशी विवाहित होती. त्यामुळे तिला आपल्या जीवनात काही बदल करण्याची गरज जाणवली पण तिच्या पतीने आणि सर्व नातेवाईकांनी तिचा कडाडून विरोध केला. तिचे आजोबा हाय कोर्टातले जज होते आणि चर्चमध्येही जबाबदार पदावर होते; त्यांनी मत्तय १९:४-६ या वचनांचा चुकीचा अर्थ लावून तिचे मन बदलण्याचा प्रयत्न केला. ते अगदी खात्रीने बोलत होते, पण पॉलिनाला लगेच जाणीव झाली की सैतानाने येशू ख्रिस्ताला मोहात पाडण्याकरता शास्त्रवचनांना वाटेल तसे वळवले, तसाच हा प्रकार होता. (मत्तय ४:५-७) तिला विवाहाविषयी येशूने केलेले स्पष्ट विधान आठवले, ज्यात त्याने म्हटले की देवाने मानवांना, एक स्त्री व एक पुरुष असे निर्माण केले, एक पुरुष आणि अनेक स्त्रिया असे नव्हे आणि ते तिघे नव्हेत, तर दोघे एकदेह होतील. तिने आपला निर्णय बदलला नाही आणि शेवटी तिला बहुपत्नीकत्व विवाहातून घटस्फोट देण्यात आला. लवकरच ती बाप्तिस्मा घेऊन आनंदाने राज्याची घोषणा करू लागली.
देवाचे वचन नीट हाताळत राहा
२१, २२. (अ) राज्य उद्घोषक या नात्याने आपला काय संकल्प आहे? (ब) पुढील लेखात आपण काय विचारात घेणार आहोत?
२१ देवाचे लिखित वचन देवाच्या जवळ येण्याच्या उद्देशाने जीवनात बदल करण्यास इतरांना मदत करण्याकरता खरोखर एक प्रभावी साधन आहे. (याकोब ४:८) ज्याप्रकारे निपुण कामकरी उत्तम परिणाम मिळवण्याकरता साधनांचा उपयोग करतात त्याचप्रकारे राज्य उद्घोषक या नात्याने देवाने आपल्यावर सोपवलेल्या कार्यात त्याच्या वचनाचा अर्थात बायबलचा निपुणतेने वापर करण्याचा आपण दृढ संकल्प करू या.
२२ शिष्य बनवण्याच्या आपल्या कार्यात आपण शास्त्रवचनांचा अधिक परिणामकारक रितीने कशाप्रकारे वापर करू शकतो? एक पद्धत म्हणजे प्रभावशाली शिक्षक होण्याकरता आपले कौशल्य वाढवण्याद्वारे. पुढच्या लेखाकडे लक्ष द्या कारण त्यात राज्य संदेश स्वीकारण्याकरता इतरांना शिकवण्याच्या व मदत करण्याच्या पद्धती सुचवल्या आहेत.
[तळटीप]
^ परि. 20 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.
तुम्हाला आठवते का?
• राज्य उद्घोषकांकडे कोणकोणती साधने आहेत?
• पौलाने राज्याचा कामकरी या नात्याने कशाप्रकारचा आदर्श ठेवला?
• देवाचे वचन नीट हाताळण्यात कशाचा समावेश आहे?
• यहोवाचे लिखित वचन एक साधन या नात्याने कितपत प्रभावशाली आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१० पानांवरील चित्रे]
राज्य प्रचाराच्या कार्यात या साधनांचा वापर केला जातो