“कृतज्ञ असा”
“कृतज्ञ असा”
“ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो; . . . आणि तुम्ही कृतज्ञ असा.” —कलस्सैकर ३:१५.
१. ख्रिस्ती मंडळी व सैतानाच्या कह्यात असलेल्या या जगात आपल्याला कोणता फरक दिसून येतो?
यहोवाच्या साक्षीदारांच्या जगभरातील ९४,६०० मंडळ्यांमध्ये आपल्याला कृतज्ञ प्रवृत्ती पाहायला मिळते. प्रत्येक सभेची सुरवात व सांगता प्रार्थनेने होते व या प्रार्थनेत यहोवाचे आभार मानले जातात. उपासना व आनंदी सहवासाकरता एकत्र आलेल्या मंडळीच्या तरुण व वृद्ध जनांच्या तसेच नवीन व जुन्या साक्षीदारांच्या तोंडून कित्येकदा “आभारी आहे” किंवा समान अर्थाच्या इतर अभिव्यक्ती ऐकण्यास मिळतात. (स्तोत्र १३३:१) “जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत” त्यांच्यामध्ये दिसणाऱ्या स्वार्थी प्रवृत्तीपेक्षा हे किती वेगळे आहे. (२ थेस्सलनीकाकर १:८) आपण एका कृतघ्न जगात राहतो. आणि यात नवल वाटण्यासारखे काहीही नाही कारण या जगाचे दैवत अर्थात दियाबल सैतान स्वतः स्वार्थाचा समर्थक आहे आणि त्याची गर्विष्ठ व विद्रोही प्रवृत्ती सबंध मानवी समाजात पसरलेली आहे.—योहान ८:४४; २ करिंथकर ४:४; १ योहान ५:१९.
२. आपण कोणत्या इशाऱ्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि कोणते प्रश्न आपण विचारात घेणार आहोत?
२ सैतानाच्या जगाचा प्रभाव सर्वत्र असताना, त्याच्या दुष्प्रवृत्तींचा आपल्यावर परिणाम होऊ नये म्हणून आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. पहिल्या शतकात, प्रेषित पौलाने इफिसकर ख्रिस्ती बांधवांना अशी आठवण करून दिली: “त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा इफिसकर २:२, ३) आज बऱ्याच जणांचा हा अनुभव राहिला आहे. मग आपण सतत एक कृतज्ञ प्रवृत्ती कशी बाळगू शकतो? याकरता यहोवाने आपल्याला कोणती मदत पुरवली आहे? आपण खरोखर कृतज्ञ आहोत हे कोणत्या व्याव्हारिक मार्गांनी आपण दाखवू शकतो?
अधिपति म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपति ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता; त्या लोकांत आम्हीहि सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करीत होतो व स्वभावत: इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.” (कृतज्ञ असण्याची कारणे
३. आपण यहोवाला कशाविषयी कृतज्ञ आहोत?
३ सर्वप्रथम यहोवा देव आपला निर्माणकर्ता व जीवनदाता याला कृतज्ञ असणे हे आपले कर्तव्य आहे कारण त्याने आपल्यावर विपुल आशीर्वादांचा वर्षाव केला आहे. (याकोब १:१७) दररोज आपण आपल्या जीवनाबद्दल यहोवाचे आभार मानतो. (स्तोत्र ३६:९) आपल्या सभोवती यहोवाच्या अनेक हस्तकृतींचे पुरावे आपण पाहतो, उदाहरणार्थ, सूर्य, चंद्र व तारे. आपल्या पृथ्वी ग्रहावर जीवनाला आवश्यक असणाऱ्या खनिजांचा भरपूर साठा आहे, वातावरणात जीवनावश्यक वायूंचा अचूक समतोल आहे आणि निसर्गात अनेक गुंतागुंतीची चक्रे अविरत सुरू आहेत. या सर्व गोष्टी दाखवतात की आपण आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याचे किती ऋणी आहोत. राजा दाविदाने एका स्तोत्रात असे म्हटले: “हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही; मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत.”—स्तोत्र ४०:५.
४. आपल्या मंडळ्यांमधील आनंदी सहवासाबद्दल आपण यहोवाचे आभार का मानले पाहिजेत?
४ शारीरिक परादीसमध्ये आपण राहात नसलो तरीसुद्धा यहोवाचे सेवक आज एका आध्यात्मिक परादीसमध्ये राहात आहेत. आपल्या राज्य सभागृहांत आणि आपल्या अधिवेशनांत व संमेलनांत आपण आपल्या सहविश्वासू बांधवांमध्ये देवाच्या आत्म्याच्या फळांचे कार्य प्रत्यक्षात पाहतो. काही साक्षीदार धार्मिक पार्श्वभूमी नसलेल्यांना प्रचार करताना गलतीकरांना लिहिलेल्या पत्रात पौलाने केलेल्या वर्णनाची मदत घेतात. आधी ते ‘देहाच्या कर्मांकडे’ या लोकांचे लक्ष वेधतात आणि यासंदर्भात त्यांचे काय निरीक्षण आहे हे त्यांना विचारतात. (गलतीकर ५:१९-२३) बरेचजण लगेच मान्य करतात की आजच्या मानवी समाजात या प्रवृत्ती सर्वत्र आढळतात. यानंतर देवाच्या आत्म्याच्या फळाचे वर्णन त्यांना दाखवून प्रत्यक्षात याचा अनुभव घेण्याकरता जेव्हा त्यांना स्थानिक राज्य सभागृहात निमंत्रित केले जाते तेव्हा बरेच जण लगेच कबूल करतात की “तुम्हामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे.” (१ करिंथकर १४:२५) आणि हे स्थानिक राज्य सभागृहापुरतेच मर्यादित नाही. तुम्ही जगाच्या पाठीवर कोठेही गेलात आणि ६० लाख साक्षीदारांपैकी कोणालाही भेटलात तरीसुद्धा तुम्हाला त्याच आनंदी प्रवृत्तीचा प्रत्यय येईल. खरोखर हे प्रोत्साहनदायक साहचर्य यहोवाचे आभार मानण्याचे एक कारण आहे कारण त्याच्या आत्म्यामुळेच हे साध्य होते.—सफन्या ३:९; इफिसकर ३:२०, २१.
५, ६. देवाचे सर्वश्रेष्ठ दान, अर्थात खंडणी याकरता आपण कृतज्ञ आहोत हे आपण कसे दाखवू शकतो?
५ यहोवाने दिलेले सर्वात मोठे व परिपूर्ण दान म्हणजे त्याचा पुत्र येशू, ज्याच्या माध्यमातून खंडणी बलिदान देण्यात आले आहे. प्रेषित योहानाने लिहिले: “देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीति केली तर आपणहि एकमेकांवर प्रीति केली पाहिजे.” (१ योहान ४:११) होय आपण केवळ यहोवाबद्दल प्रेम व कृतज्ञता दाखवण्याद्वारे नव्हे तर इतरांबद्दलही प्रेम प्रदर्शित होईल अशाप्रकारे आपले जीवन व्यतीत करण्याद्वारे खंडणी बलिदानाबद्दल आभार व्यक्त करू शकतो.—मत्तय २२:३७-३९.
६ कृतज्ञता दाखवण्याच्या संबंधात, यहोवाने प्राचीन इस्राएलांशी कशाप्रकारे व्यवहार केला याकडे लक्ष दिल्यास आपण कृतज्ञता दाखवण्यासंबंधी बरेच काही शिकू शकतो. इस्राएल राष्ट्राला मोशेद्वारे दिलेल्या नियमशास्त्राच्या माध्यमाने यहोवाने आपल्या लोकांना बरेच काही शिकवले. ‘नियमशास्त्रात उपलब्ध झालेले ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप’ याद्वारे पौलाने “कृतज्ञ असा” हा जो सल्ला दिला त्याचे पालन करण्यास बरीच मदत मिळू शकते.—रोमकर २:२०; कलस्सैकर ३:१५.
मोशेच्या नियमशास्त्रातून तीन धडे
७. दशमांश देण्याच्या तरतुदीने इस्राएल लोकांना यहोवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी कशाप्रकारे दिली?
७ मोशेच्या नियमशास्त्रात, यहोवाने तीन मार्ग पुरवले होते ज्याद्वारे इस्राएल लोक त्याच्या चांगुलपणाविषयी मनःपूर्वक कदर व्यक्त करू शकत होते. पहिला म्हणजे दशमांश. जमिनीच्या उपजेचा दहावा भाग तसेच, ‘गुरेढोरे अथवा शेरडेमेंढरे ह्यांपैकी प्रत्येक दहांपैकी एकएक परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र’ समजायचा होता. (लेवीय २७:३०-३२) इस्राएलांनी या आज्ञेचे पालन केले तोपर्यंत यहोवाने त्यांना उदंड आशीर्वाद दिले. “सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ‘माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीति पाहा.’”—मलाखी ३:१०.
८. ऐच्छिक दाने दशमांशापेक्षा कशी वेगळी होती?
८ दुसरे म्हणजे, दशमांशाच्या आज्ञेसोबतच यहोवाने इस्राएलांना ऐच्छिक दाने देता यावीत म्हणून तरतूद केली होती. त्याने मोशेला इस्राएलांना असे सांगण्याची आज्ञा केली: “ज्या देशात मी तुम्हाला नेत आहे तेथे तुम्ही आल्यावर त्या देशातले अन्न खाल तेव्हा तुम्ही त्यातला काही भाग समर्पण म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पण करावा.” ‘मळलेल्या कणकेच्या पोळ्यांतून’ काही भाग त्यांना “परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पण म्हणून” यहोवाला पिढ्यान्पिढ्या द्यायचा होता. या पहिल्या भागातून विशिष्ट प्रमाणात अर्पण द्यायचे नव्हते याकडे लक्ष द्या. (गणना १५:१८-२१, NW) पण जेव्हा उपकारस्तुतीकरता इस्राएल लोक अर्पण वाहतील तेव्हा त्यांना आशीर्वाद मिळेल असे यहोवाने त्यांना आश्वासन दिले होते. यहेज्केलच्या दृष्टान्तातील मंदिराच्या संबंधातही अशीच तरतूद होती. त्यात असे सांगितले आहे: “सर्वप्रथम फळांचा प्रथम भाग, समर्पित अंश म्हणून अर्पण करावयाची प्रत्येक वस्तु याजकांची व्हावी; तुम्ही तिंबलेल्या कणिकेचा पहिला गोळा याजकांस द्यावा म्हणजे तुमच्या घराला बरकत येईल.”—यहेज्केल ४४:३०.
९. यहोवाने सरवा वेचण्याच्या तरतुदीद्वारे काय शिकवले?
९ तिसरे म्हणजे सरवा वेचण्याची तरतूद यहोवाने केली होती. देवाने अशी आज्ञा दिली होती, “तुम्ही आपल्या भूमीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तू आपल्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील पीक झाडून सारे कापू नको आणि पीक काढून घेतल्यावर त्यातील सरवा वेचू नको. आपला द्राक्षमळाहि झाडून सारा खुडू नको. तशीच द्राक्षमळ्यात पडलेली फळे गोळा करू नको; गरीब व उपरी ह्यांच्यासाठी ती राहू द्यावी; मी परमेश्वर तुमचा देव आहे.” (लेवीय १९:९, १०) पुन्हा एकदा विशिष्ट प्रमाण सांगण्यात आले नव्हते. गरजू लोकांसाठी किती पीक राहू द्यायचे हे प्रत्येक इस्राएली व्यक्तीच्या इच्छेवर सोडण्यात आले होते. सुज्ञ राजा शलमोन याने अगदी योग्यपणे म्हटले: “जो दरिद्र्यावर दया करितो तो परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्याची फेड तो करील.” (नीतिसूत्रे १९:१७) अशारितीने यहोवाने गरीब व गरजू लोकांबद्दल करूणा व विचारीपणा दाखवण्यास इस्राएलांना शिकवले.
१०. इस्राएल लोकांनी कृतज्ञता दाखवण्यात कुचराई केली तेव्हा काय परिणाम झाला?
१० इस्राएलांनी विश्वासूपणे दशमांश दिले, ऐच्छिक दाने दिली आणि गरिबांना मदत केली तेव्हा यहोवाने त्यांनाही आशीर्वादित केले. पण त्यांनी कृतज्ञता दाखवण्यात कुचराई केली तेव्हा मात्र त्यांना यहोवाची कृपा प्राप्त झाली नाही. यामुळे त्यांच्यावर संकटे आली आणि शेवटी त्यांना परदेशी बंदिवासात जावे लागले. (२ इतिहास ३६:१७-२१) मग यातून आपण काय शिकू शकतो?
आपली कृतज्ञतादर्शक कृत्ये
११. आपण कोणत्या मुख्य मार्गाने यहोवाला आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतो?
११ यहोवाची स्तुती करण्याचा आणि त्याला आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रमुख मार्ग ‘अर्पणांशी’ संबंधित आहे. ख्रिस्ती या नात्याने आज आपण मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही हे खरे आहे आणि त्याअर्थी प्राण्यांचे अथवा उपजेचे बलिदान देण्याचे बंधन आपल्यावर नाही. (कलस्सैकर २:१४) पण प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्चनांना असा आग्रह केला: “त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.” (इब्री लोकांस १३:१५) यहोवाला स्तुतीचा यज्ञ, मग तो सार्वजनिक सेवाकार्याच्या माध्यमाने असो किंवा सह ख्रिस्ती बांधवांच्या ‘जनसभेत’ असो, तो अर्पण करण्याकरता आपण आपल्या कौशल्यांचा व साधनांचा उपयोग करतो तेव्हा आपण आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याला, अर्थात यहोवा देवाला मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करत असतो. (स्तोत्र २६:१२) यासंदर्भात, इस्राएल लोकांना यहोवाला कृतज्ञता दाखवण्याचे जे मार्ग दाखवण्यात आले होते त्यांवरून आपण काय शिकू शकतो?
१२. आपल्या ख्रिस्ती जबाबदारीच्या संदर्भात दशमांशाच्या तरतुदीतून आपण काय शिकू शकतो?
१२ सर्वप्रथम आपण पाहिल्याप्रमाणे, दशमांशाची व्यवस्था ही ऐच्छिक नव्हती; दशमांश देणे हे प्रत्येक इस्राएली व्यक्तीचे कर्तव्य होते. ख्रिस्ती या नात्याने आपल्यावर सेवाकार्यात सहभाग घेण्याची व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याची जबाबदारी आहे. ही कार्ये ऐच्छिक नाहीत. शेवटल्या काळाविषयीच्या महान भविष्यवाणीत येशूने स्पष्टपणे म्हटले: “सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४; २८:१९, २०) ख्रिस्ती सभांच्या संदर्भात प्रेषित पौलाला असे लिहिण्यास प्रेरित करण्यात आले: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्री लोकांस १०:२४, २५) प्रचार करण्याची व शिकवण्याची तसेच मंडळीच्या सभांमध्ये आपल्या बांधवांशी नियमित संगती करण्याची आपली जबाबदारी एक सुहक्क व बहुमान समजून आपण आनंदाने स्वीकारतो तेव्हा आपण यहोवाला आपली कृतज्ञता दाखवत असतो.
१३. ऐच्छिक दाने आणि सरवा वेचण्याच्या तरतुदींतून कोणता धडा शिकण्यास मिळतो?
१३ याशिवाय, इस्राएल लोक ज्या इतर दोन मार्गांनी आपली कृतज्ञता दाखवायचे, अर्थात ऐच्छिक दाने आणि सरवा वेचणे, या तरतुदींचे परीक्षण केल्यानेही आपल्याला फायदा होऊ शकतो. दशमांशाची आज्ञा ही एक सुस्पष्ट बाध्यता होती, पण ऐच्छिक दाने आणि सरवा वेचण्याची तरतूद यांकरता विशिष्ट रक्कम अथवा प्रमाण निश्चित करण्यात आले नव्हते. उलट, यहोवाच्या एखाद्या सेवकाच्या मनात किती कृतज्ञता आहे त्याच्या आधारावर कृती करण्यास या दोन्ही तरतुदींमध्ये वाव होता. त्याचप्रकारे, सेवाकार्यातील सहभाग व ख्रिस्ती सभांची उपस्थिती ही यहोवाच्या प्रत्येक सेवकाची जबाबदारी आहे हे ओळखण्यासोबतच आपण त्यांमध्ये मनःपूर्वक व उत्सुक मनोवृत्तीने सहभाग घेतो का? यहोवाने आपल्याकरता जे काही केले आहे त्याबद्दल आपली मनःपूर्वक कृतज्ञता दाखवण्याची संधी या दृष्टीने आपण त्यांकडे पाहतो का? आपल्या वैयक्तिक परिस्थितीला अनुलक्षून होता होईल तितका आपण या कार्यांत सहभाग घेतो का? की केवळ कर्तव्य आहे म्हणून पार पाडायचे या दृष्टीने आपण त्यांकडे पाहतो? अर्थात या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण वैयक्तिकरित्या देऊ शकतो. प्रेषित पौलाने याविषयी असे म्हटले: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.”—१४. यहोवा आपल्याकडून त्याच्या सेवेच्या संदर्भात काय अपेक्षा करतो?
१४ यहोवाला आपल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. त्याला आपल्या अडचणींचीही कल्पना आहे. त्याचे सेवक जे काही त्याग करतात, मग ते लहान असोत अथवा मोठे, त्यांची तो कदर करतो. आपण सर्वजण सारख्या प्रमाणात देऊ शकत नाही आणि तशी तो अपेक्षाही करत नाही. आर्थिक दान करण्यासंबंधी चर्चा करताना प्रेषित पौलाने करिंथ येथील ख्रिश्चनांना असे सांगितले: “उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते; नसेल तसे नाही.” (२ करिंथकर ८:१२) हेच तत्त्व देवाच्या सेवेलाही लागू होते. आपण किती सेवा करतो याच्या आधारावर नव्हे तर कोणत्या मनोवृत्तीने करतो, अर्थात आनंदाने व पूर्ण मनाने करतो किंवा नाही या आधारावर यहोवा आपली सेवा मान्य करतो.—स्तोत्र १००:१-५; कलस्सैकर ३:२३.
पायनियर मनोवृत्ती निर्माण करा व जोपासा
१५, १६. (अ) पायनियर सेवा आणि कृतज्ञता यात काय संबंध आहे? (ब) ज्यांना पायनियर सेवा करणे शक्य नाही तेसुद्धा पायनियर प्रवृत्ती कशाप्रकारे दाखवू शकतात?
१५ यहोवाला आपली कृतज्ञता दाखवण्याचा एक समाधानदायक मार्ग म्हणजे पूर्ण वेळेची सेवा हाती घेणे. यहोवाबद्दल असलेल्या प्रेमाने व त्याच्या अपात्री कृपेबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेने प्रवृत्त होऊन अनेक समर्पित सेवकांनी आपल्या जीवनात मोठे फेरबदल केले आहेत जेणेकरून त्यांना यहोवाची सेवा करण्याकरता अधिक वेळ मिळेल. काहीजणांना सामान्य पायनियरिंग करणे शक्य आहे, ज्यात ते दर महिन्याला सुवार्तेची घोषणा करण्यात व लोकांना सत्याचे ज्ञान देण्यात सरासरी ७० तास खर्च करतात. इतरांना त्यांच्या परिस्थितीमुळे असे करणे शक्य नसले तरीसुद्धा ते वेळोवेळी सहायक पायनियर सेवा अर्थात महिन्याला ५० तास सेवा करण्याचा प्रयत्न करतात.
१६ पण यहोवाच्या काही सेवकांना तर सामान्य अथवा सहायक पायनियर सेवा करणेही शक्य नाही, त्यांच्याविषयी काय? असे बांधव पायनियर मनोवृत्ती निर्माण करून व जोपासून आपली कृतज्ञता दाखवू शकतात. कशी? जे पायनियर सेवेत आहेत अशांना प्रोत्साहन देण्याद्वारे, पूर्ण वेळेच्या सेवेला आपली कारकीर्द बनवण्याची इच्छा आपल्या मुलांमध्ये निर्माण करण्याद्वारे आणि आपल्या परिस्थितीनुसार प्रचार कार्यात होईल तितका सहभाग घेण्याद्वारे. आपण आपल्या सेवाकार्याच्या रूपात किती देतो हे आजपर्यंत यहोवाने आपल्याकरता जे केले आहे, आज जे तो करत आहे आणि पुढेही करणार आहे त्याबद्दल आपल्या मनात किती कदर आहे यावर अवलंबून आहे.
आपल्या “द्रव्याने” कृतज्ञता व्यक्त करणे
१७, १८. (अ) आपल्या “द्रव्याने” आपण आपली कृतज्ञता कशी दाखवू शकतो? (ब) विधवेच्या दानाविषयी येशूने काय निष्कर्ष काढला आणि का?
१७ नीतिसूत्रे ३:९ म्हणते, “तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर.” यहोवाच्या सेवकांना आता दशमांश देण्याची गरज उरली नाही. उलट पौलाने करिंथकरांच्या मंडळीला लिहिल्याप्रमाणे “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” (२ करिंथकर ९:७) जागतिक राज्य प्रचार कार्याला साहाय्य करण्याकरता ऐच्छिक वर्गण्या देण्याद्वारेही आपण आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतो. मनःपूर्वक कृतज्ञता आपल्याला हे नियमितरित्या करण्यास प्रवृत्त करते; काही आरंभीच्या ख्रिश्चनांनी केल्याप्रमाणे आपण दर आठवड्याला या कामासाठी काही पैसे वेगळे ठेवू शकतो.—१ करिंथकर १६:१, २.
१८ आपण किती रक्कम देतो त्यावरून आपली कृतज्ञता दिसून येत नाही. तर आपण कोणत्या मनोवृत्तीने देतो त्यावरून ती दिसून येते. मंदिराच्या भांडारांत आपली दाने टाकणाऱ्या लोकांकडे पाहताना येशूने हेच निरीक्षण केले. त्याने एका गरजू विधवेला भांडारांत “दोन टोल्या” टाकताना पाहिले तेव्हा त्याने म्हटले: “मी तुम्हाला खरे सांगतो, ह्या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानांत टाकले; हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे.”—लूक २१:१-४.
१९. आपण कोणत्या मार्गांनी कृतज्ञता व्यक्त करतो याचे परीक्षण करून पाहणे का महत्त्वाचे आहे?
१९ आपण कशाप्रकारे आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतो याविषयी आतापर्यंत आपण केलेल्या या चर्चेने आपण स्वतः कोणकोणत्या मार्गांनी आपली कृतज्ञता व्यक्त करतो त्याचे परीक्षण करण्यास मदत केली पाहिजे. यहोवाला अधिक स्तुतीरूपी यज्ञे आपण कदाचित अर्पण करू शकतो का? तसेच जागतिक कार्याला आर्थिकरित्या अधिक साहाय्य आपण करू शकतो का? आपण जितके अधिक असे करू तितकाच आपला उदार प्रेमळ पिता यहोवा, आपण दाखवलेल्या या कृतज्ञतेविषयी संतुष्ट होईल.
तुम्हाला आठवते का?
• आपण कोणकोणत्या कारणांसाठी यहोवाला कृतज्ञ असले पाहिजे?
• दशमांश देणे, ऐच्छिक दाने देणे आणि सरवा वेचणे यांवरून आपण काय शिकू शकतो?
• पायनियर मनोवृत्ती आपण कशी निर्माण करू शकतो?
• यहोवाला कृतज्ञता दाखवण्याकरता आपण आपल्या ‘द्रव्याचा’ कशाप्रकारे उपयोग करू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील चित्रे]
“प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे”
[१६ पानांवरील चित्रे]
नियमशास्त्रातून शिकता येण्यासारखे कोणते तीन धडे येथे चित्रित करण्यात आले आहेत?
[१८ पानांवरील चित्रे]
आपण कोणती बलिदाने करू शकतो?