व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दूरदर्शनवरील एक कार्यक्रम पाहून तिने देवाचे गौरव केले

दूरदर्शनवरील एक कार्यक्रम पाहून तिने देवाचे गौरव केले

राज्य घोषकांचा वृत्तान्त

दूरदर्शनवरील एक कार्यक्रम पाहून तिने देवाचे गौरव केले

प्रेषित पौलाने म्हटले, की “कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करितात; आणि कित्येक सद्‌भावाने करितात.” (फिलिप्पैकर १:१५) कधीकधी, यहोवाच्या लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्‍यांनी अजाणतेत, उचित मनोवृत्तीच्या लोकांना सत्याकडे वळण्यास प्रवृत्त केले आहे.

१९९८ सालच्या नोव्हेंबर महिन्यात, फ्रेन्च राष्ट्रीय दूरदर्शनवर लुविया, फ्रान्स येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा संकुलाची अर्थात बेथेलची चित्रे दाखवण्यात आली. या कार्यक्रमामुळे लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद दिला तरीसुद्धा, अनपेक्षितपणे चांगलेच परिणाम घडले.

कार्यक्रम पाहणाऱ्‍यांपैकी एक होती ॲना-पोला; ती बेथेलपासून केवळ ६० किलोमीटर दूर राहत होती. ॲना-पोला ही घटस्फोटित स्त्री आपल्या दोन मुलांबरोबर राहते व ती नोकरीच्या शोधात होती. कार्यक्रम पाहिल्यानंतर दुसऱ्‍याच दिवशी तिने बेथेलला फोन लावला आणि मला नोकरी मिळेल का अशी विचारणा केली. ती म्हणाली: “टीव्हीवर पाहिलेल्या बेथेलच्या चित्रांवरून माझा असा ग्रह झाला की हे चांगलं ठिकाण आहे व तिथं केलं जाणारं काम उपयोगी आहे.” पण, तिला जेव्हा कळाले, की बेथेलमध्ये काम करणारे सर्व स्वयंसेवक आहेत तेव्हा तिला खूप आश्‍चर्य वाटले! यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यांविषयी संक्षिप्त चर्चा केल्यानंतर, साक्षीदारांनी तिला भेट द्यावी अशी संमती तिने दर्शवली.

स्थानीय मंडळीतील लेना नावाची एक पूर्ण वेळेची सेविका तिला भेटण्यासाठी गेली तेव्हा त्या दोघींची खूप वेळपर्यंत चर्चा झाली आणि ॲना-पोलाने सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान * हे पुस्तक स्वीकारले. दुसऱ्‍या भेटीपर्यंत ॲना-पोलाने या पुस्तकाचे पान अन्‌ पान वाचून काढले होते व आता तिच्या मनात अनेक प्रश्‍न होते. ती लगेच बायबल अभ्यास करायला तयार झाली. ॲना-पोला म्हणते: “मला, देवाच्या वचनाचा शोध घेण्याची संधी मिळाली. मी पूर्वी बायबल हातात घेतलं नव्हतं.”

१९९९ सालच्या जानेवारी महिन्यात, ॲना-पोला बेथेल पाहायला आली आणि पुढील आठवडी पहिल्यांदा ख्रिस्ती सभांना गेली. त्यानंतर काही काळातच तिने आपल्या मुलांबरोबर बायबलचा अभ्यास करायला आणि आपल्या मित्रपरिवाराला साक्ष द्यायला सुरवात केली. ती म्हणते: “मी जे शिकत होते ते मी माझ्या पुरतेच ठेवू शकत नव्हते. मला लोकांना बायबलमधील सत्य सांगून त्यांना सांत्वन द्यावं असं वाटू लागलं.” आपल्या अनेक व्यक्‍तिगत समस्या सोडवल्यानंतर ॲना-पोला सभांना नियमितरीत्या उपस्थित राहू लागली. तिने खूप लवकर प्रगती केली आणि मे ५, २००२ साली तिचा बाप्तिस्मा झाला.

इतकेच नव्हे तर, ॲना-पोलाचे उत्तम उदाहरण व प्रचार कार्य ती किती आवेशाने करते हे पाहून तिच्या आईने बायबलचा अभ्यास सुरू केला आणि तिचाही बाप्तिस्मा झाला. ॲना-पोला म्हणते: “मला किती आनंद होत आहे हे सांगण्यासाठी माझ्याजवळ शब्दच नाहीत. यहोवानं मला त्याची ओळख घडवल्याबद्दल व त्यानं मला दिलेल्या आशीर्वादांबद्दल मी त्याचे दररोज आभार मानते.”

[तळटीप]

^ परि. 6 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

[८ पानांवरील चित्रे]

वर: ॲना-पोला

खाली: फ्रान्स येथील शाखा संकुलाकडे जाणारा प्रवेशमार्ग